रिया...अग ये...रिया.... अग दोन दिवसांपासून तुझे कपडे बाथरूम मध्ये भिजत घातलेले आहेत ; ते जरा हाता खालून घाल ना.. न सुकत टाक की झटकन.....वास यायला लागला आहे आता . "
अंगण झाडता झाडता विद्या ने आपल्या सुनेला सांगितलं...
" घालते हो घालते..., अशा हात धुवून मागे काय लागता? "
संतापून रिया जवळजवळ त्यांच्यावर ओरडली...
"ओरडू नकोस ग....! सांगते फक्त....तेसुद्धा वास येतो म्हणून....."
" ओरडू नकोस काय? कपडे माझे आहेत..... मग ते वाळतील नाहीतर कुजतील..... तुम्हाला काय त्रास आहे? तेच मला समजत नाही..... आणि मुळात ते कपडे काय मी तुमच्याकडे मागायला येणार नाही..ज्याने माझा हात धरला आहे तो देईल ना आणून...... मग तुमच्या का पोटात दुखायला पाहिजे...... तोच मोठा प्रश्न आहे माझ्यापुढे....... "
आपले तोंड वाजवत वेडे वाकडे करत रिया पाय आपटत बाथरूम मध्ये शिरली अन मग आपला सगळा राग तिने त्या कपड्यांवर काढायला सुरुवात केली .कपडे धुताना देखील तिची बडबड चालूच होती.
" देवा.....या घरात राहणे हि अवघड झालं आहे मला ...... जरा कुठे विश्रांती घेऊ ,म्हंटल तर ह्यांच लगेच पोट दुखत........ मग काय नोकर ठेवायचे नाहीत.....सुनेलाच मोलकरीण म्हणून राबवून घ्यायचं दिवसभर.... वरून बोलणी सुद्धा ऐका........एकतर घरादाराची स्वच्छता करा , सासूसाऱ्यांची सेवा करा ...सकाळी उठा..... पूर्ण दिवस राब राब राबा..... आणि वरून ही बोलणी.........मी म्हणजे निर्जीव रोबोट वाटले का ह्यांना ? फक्त सतत काम करत राहावे ..."
तिने बडबड करत कसे तरी कपडे धुतले आणि आपल्या रूम मध्ये जाऊन तिने धाडकन दरवाजा लावून घेतला... आणि इकडे विद्या ताई बघतच राहिल्या.....
आदित्य आणि अदिती श्रीधर राव आणि विद्या ह्यांची मुलं...... अदितीच्या लग्नानंतर आदित्य च त्यांच्यासाठी सगळं काही होता..... त्यामुळेच त्याच्यासाठी मुलगी निवडताना विद्या ने खूपच चोखंदळपणा केला होता . किती तरी मुली नाकारल्यावबर तिला रिया पसंत पडली होती......गोरीपान , उंच, सडसडीत, लांब केसांची , मोहक चेहऱ्याची बीए झालेली रिया बघताच क्षणी त्या मायलेकांना पसंत पडली होती....श्रीधर राव देखील खूप खुश होते , फक्त त्यांना रिया च्या घरातले वातावरण फारसे काही आवडले नव्हते .
रिया च्या वडिलांचं त्यांच्या घरात काहीच चालत नसे तिची आई लीला अत्यन्त डॉमिनेट व्यक्ती होती आणि कदाचित ह्याच मुळे रिया सुद्धा प्रचंड हट्टी आणि अहंकारी वृत्तीची झाली होती. या गोष्टी श्रीधर रावांना ठाऊक होत्या. आणि तेव्हाच ते आपल्या पत्नीशी म्हणजे विद्याशी ह्या बद्दल बोलले होते.... पण त्यांच म्हणणे होते कि एकदा का आपल्या घरात आली कि ती बरोबर निवलेल आणि आपल्यासारखी होईल . आपल्या ह्या घराच्या वातावरणात ती रमेल ..हे घर तिला आपलेसे करेल मग ती तशी नाही वागणार .
दोन वर्षापूर्वीच रिया आणि आदित्य च लग्न झालं होत . आणि इकडे लग्न ठरल्या नंतरच तिच्या आईने तिचे कान भरायला सुरुवात केली होती , लग्नानंतर लगेचच आपला संसार वेगळा थाट ..नाहीतर कायम तुला एकत्र राहावं लागेल आणि एकत्र राहिलीस तर तुला सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल ...तुझा नवरा तुझ्या मुठीत राहणार नाही ..तो तुझ्या मुठीत राहायला हवा असं काही बाही सांगून त्यांनी तिचे कान भरले होते..... आणि आपली आई म्हणते तेच खरं असं मानणाऱ्या रिया ला आई चुकीचं म्हणते ह्याची जाणीव करून देणारे कोणच नव्हते.... खरं तर नवरा मुठीत नाही तर मिठीत ठेवायचा असतो.... पण हेच सांगायला तिची आई विसरली.....
तस तर विद्या आणि श्रीधर च खाऊन पिऊन सुखी कुटुंब..
तर रिया च्या घरचे आदित्य च्या घरच्यांपेक्षा जास्त श्रीमंत होते . श्रीधर आदित्य चे बाबा शिक्षक म्हणून कार्यरत होते होते तर विद्या गृहिणी होत्या .त्यांनी मोट्या काटकसरीने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले होते आणि खूप साऱ्या संसाराला उपयोगी गोष्टी सुद्धा आणल्या होत्या .आदित्य हुशार होता तो आपल्या कंपनी मध्ये खूप कमी कालावधी मध्ये मॅनेजर झाला होता. त्यामुळे त्याला त्याच्या कंपनी च्या कामा निम्मिताने दुसऱ्या शहरात आणि परदेशात देखील बऱ्याचदा दौऱ्यावर जावे लागत असे . अदिती अभ्यासात बरी होती त्यामुळे तीच ग्रॅज्युएशन होताच श्रीधर रावांनी तीच लग्न चांगल्या घरात लावून दिल .
विद्या ताईंनी आपल्या दोन्ही मुलांवर संस्कार मात्र उत्तम केले होते . त्यामुळेच अदिती तीच घर सांभाळून होती .
तर आदित्य ला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची पुरेपूर जाणीव होती . आणि त्यामुळेच तो आपला पगार झाल्यावर त्यातली काही रक्कम आपल्या आई वडिलांच्या हाती द्यायचा ...तर काही पैसे तो आपल्या बायको कडे देत होता ..आणि काही स्वतःच्या खर्चासाठी काढून ठेवता होता ...नेमकी हीच गोष्ट तिला खटकली ...तिच्या आई ने सांगितलं होत तिला नवऱ्याचा सगळा पगार बायकोच्याच हातात आला पाहिजे ..पण तस घडत नव्हतं ..आणि इकडे ती आपल्या आई ला घरात घडलेल्या अत्यंत शुल्लक गोष्टी सुद्धा फोन करून सांगत होती...आणि तिची आई तिला उलट सुलट शिकवत होती......
रिया ला तिच्या चुकीची जाणीव होईल का?
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
