Login

दुरावलेलं प्रेम भाग आठ

सायली आदित्यला रंगेहात पकडते

मागील भागात आपण पाहिलं कि रात्री सायलीने आदित्यला डेटिंग अॅपवर अनेक मुलींशी चॅट करताना पाहिलं. तिचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखा वाटला. तरीही तिने कोणताही गोंधळ न घालता शांत राहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी आदित्यचा पाठलाग करत ती त्या कॅफेत पोहोचली, जिथे तो एका तरुणीला भेटायला आला होता. आता पाहूया पुढे,


सायलीने स्वतःला सावरलं आणि कॅफेमध्ये प्रवेश केला. आदित्यच्या नजरेस न पडेल अशा पद्धतीने ती त्यांच्या मागच्या टेबलावर जाऊन बसली. आरोहीला तिने idli देऊन शांतपणे शेजारच्या खुर्चीवर बसवलं.

तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती खूपच नर्वस फील करत होती.

आणि इकडे समोर मात्र आदित्य आणि ती तरुणी निवांत गप्पा मारत होते. सायलीने पाहिलं तर ती मुलगी वयाने आदित्यपेक्षा लहान वाटत होती.

काही वेळाने त्या मुलीने हळू आवाजात आदित्यला विचारलं,

"आदित्य... मला एक प्रश्न विचारायचा आहे."

"विचार ना."

आदित्य एक्ससिटेड होऊन म्हणाला.


"ते आपण एवढे दिवस एकमेकांशी बोलतोय, भेटतोय... त्यामुळे मला तू खूप आवडायला लागलायस. तू माझ्याशी लग्न करशील का ?"

हे शब्द ऐकताच सायलीच्या डोळ्यांत अश्रू आले . तिने श्वास रोखून आदित्यच्या उत्तराची वाट पाहिली.

आदित्य काही क्षण शांत राहिला. मग तो अतिशय गंभीर स्वरात म्हणाला,

"हे शक्य नाही, रिया..."

"का?"

तिने आश्चर्याने विचारलं.

त्यावर आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला, तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,


"कारण... माझं आधीच लग्न झालं आहे. मला बायको आहे... आणि एक गोड मुलगीही आहे."

ते ऐकून रिया काही क्षण स्तब्ध झाली.

"मग हे सगळं काय होत ..?"

आदित्यने तिच्या डोळ्यांत पाहत उत्तर दिलं,

"मी खोटं बोलणार नाही... तू मला खूप आवडतेस. तुझ्यासोबत वेळ घालवायला मला आवडतं. पण माझं आयुष्य आधीच एका नात्याशी जोडलेलं आहे... तरीही मी तुला सोडणार नाही "

एवढं बोलून त्याने तिच्या हाताला किस घेतलं... आणि हे ऐकताच सायलीचं हृदय अक्षरशः तुटलं.

तिला एका क्षणासाठी वाटलं होतं की कदाचित हा गैरसमज असेल पण आदित्यच्या तोंडून "तू मला खूप आवडतेस" हे शब्द ऐकताच तिच्या मनात उरलेली शेवटची आशाही संपली.

तिने डोळे घट्ट मिटले. अश्रू गालावरून ओघळू लागले...आदित्यला त्या मुलीच्या हाताला किस घेताना पाहून ती आतून खवळली..ती आता आणखी शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती.

आरोहीला तिथेच basvun ती त्यांच्या टेबलाजवळ जाऊन उभी राहिली. आदित्यने वर पाहिलं आणि समोर सायलीला पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला.

"सायली... तू इथे कशी काय ?"


तो अडखळत म्हणाला.

सायलीच्या डोळ्यांत रागापेक्षा तुटलेल्या विश्वासाचं दुःख जास्त होतं.

"हा प्रश्न मी तुला नको का विचारायला ... कॉलेज सोडून तू इथे काय करतोस....?? तुला माहित असावं म्हणून सांगते आली मी तुझ्या मागोमाग तुझ्या प्रत्येक खोट्यामागचं सत्य पाहायला..."

नंतर ती त्या मुलीकडे वळली.


"ह्यात तुझी काहीच चूक नाही. याने स्वतःचं लग्न झालंय, एक गोड मुलगी आहे, हे आधीच सांगायला हवं होतं.. पण आता ही वेळ नाही गेलेली.. तू स्वतःला सावर... आणि एक ताई म्हणून तुलाही सल्ला देते, स्वतःच्या पायावर उभी राहा.. नाहीतर हे असे पुरुष टपलेले असतात कधीही विश्वासघात करायला..."

तशी ती मुलगी आश्चर्याने आदित्यकडे पाहू लागली.

सायलीने पुढे काहीही न बोलता आदित्यचा हात धरला व त्याला रोखून

"चल... इथून.... आता इथे काहीही तमाशा मला करायचा नाही आहे... पण ताबोडतोब ही सगळी थेरे थांबवायची.. तो अँप आधी डिलिट करायचा तो ही कायमचा...."

असं म्हणून ती आरोहीच्या जवळ गेली..इडलीचे पैसे देऊन तिने आदित्यला एक असा लुक दिला कि आदित्य निःशब्दपणे तिच्या मागे चालत राहिला.

काय वाटतंय सायली त्याला माफ करेल का???

क्रमश :-
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →