( जलद कथामालिका लेखन स्पर्धा)
"आई चार दिवस माहेरी जाईन म्हणते, जावून येवू का ओ??"
घाबरतच आरतीने सासूला प्रश्न विचारला.
"जायचे असेल तर जा पण लगेच ये. चार दिवस अजिबात नाही जायचे. आणि तरीही जायचेच असेल तर तूझ्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या खाण्यापिण्याची सोय कर मगच जा."
"असं तोडून का ओ बोलता आई? माझी मुलं आणि माझा नवरा, तुमचे कोणीच नाहीत का ओ?"
"पण माझंही वय होत चाललंय, माझ्याकडून नाही होत काही काम आता. त्यामुळे तू तुझं बघ काय करायचं ते?"
सासूने रागातच हातातील तांब्या किचनवर आपटला नि बाहेर जायला निघाल्या. तोच आरतीने त्यांना थांबवले.
"आई अहो आईची तब्येत ठीक नाहिये, तिलाही काहीच करता येत नाही. निदान चार दिवस गेले तर तिचा अर्धा आजार तरी कमी होईल. आणि मदतही होईल तिला माझी."
"तुझ्या आईला अजून दोन मुली आहेत वाटतं. त्या नाही का जावू शकत..? आणि एक मुलगाही आहे. खरं पाहिलं तर आई बाबा ही त्याची जबाबदारी आहेत ना. मग त्याला कळत नाही का? तुझ्याचवाचून अडलंय का?"
"आई तुम्हालाही माहित आहे ना दोघीही नोकरी करतात. नाही येवू शकत त्या. एक दिवसासाठी ठीक आहे पण जास्त सुट्टी नाही भेटणार त्यांना. आणि दादाचे तर तुम्हाला माहीतच आहे."
"आणि तू मात्र मोकळीच आहे. हो ना??
आई वडील कोणी आजारी पडले की निघाल्याच मॅडम माहेरी. ते काही नाही, सकाळी लवकर उठून पोरांचे डबे, त्यांचं खाणं पीणं, शाळेची तयारी नाही बाबा होणार माझ्याकडून. त्यांचे काय ते बघ. नाहीतर जायचेच असेल तर घेवून जा दोघांनाही तुझ्यासोबत. बुडेल चार दिवस शाळा त्याने काही फरक नाही पडणार."

इतके समजावून देखील सासू आरतीचे काही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीतच नव्हती.
इकडे आरतीचे मात्र कामात लक्षच लागेना. राहून राहून आईचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. सासूला कसे समजवावे तिला तर आता काहीच समजेना.
पदराने डोळे पुसत ती तशीच तिच्या कामाला लागली. तेव्हढ्यात अविनाशने म्हणजेच तिच्या नवऱ्याने तिला आवाज दिला...
"आरती अगं माझा रुमाल कुठे आहे? दे बरं आधी सापडून."
पदराने डोळे पुसत ती तशीच तिच्या कामाला लागली. तेव्हढ्यात अविनाशने म्हणजेच तिच्या नवऱ्याने तिला आवाज दिला...
"आरती अगं माझा रुमाल कुठे आहे? दे बरं आधी सापडून."
"साधा रुमाल सुद्धा घेवू शकत नाही हा माणूस. या सर्वाला पण मीच जबाबदार आहे. सगळ्या गोष्टी सर्वांना अगदी हातात द्यायची घाणेरडी सवय मीच लावली आहे सगळयांना. म्हणून तर कोणतेच काम अंगावर घ्यायची तयारीच नसते कोणाची. आता मात्र खूप झाले. आता डोक्यावरून पाणी जायच्या आत मलाच हातपाय हलवले पाहिजेत."
"आरती येतेस का लवकर? "नवऱ्याने पुन्हा आवाज दिला.
हातपाय आपटतच आरती बेडरूममध्ये गेली.
"हे इथे एवढा समोर रुमाल काढून ठेवलाय, दिसत नाही का ओ? की उगीच आरती करते सगळी कामं म्हणून तिचा जीवच घ्यायचा ठरवलंय तुम्ही सर्वांनी मिळून. साध्या साध्या गोष्टीसाठी तुम्हाला आरती हवी असते. जरा स्वतःची कामे स्वतः केलीच कधी तर काही फरक पडेल का?"

आज पहिल्यांदा अविनाशने आरतीला एवढे चिडलेले पाहिले. दाराआडून सासूने आरतीचे सर्व बोलणे ऐकले. आता शांत बसेल ती सासू कसली.
"अविनाश तुझ्या बायकोला जरा समजावून सांग आ. आता मधेच माहेरी जायचे म्हणतीये. आठ पंधरा दिवस झाले की हिला माहेरी जायचे असते. भाऊ बसलाय दुबईत जावून. दोन बहीण त्यापण त्यांच्या संसारात गुंग. आणि हिला एकटीलाच काय ती आई बापाची काळजी. आपल्यालाही दोन मुले आहेत, नवरा आहे, सासू सासरे आहेत हे कसे कळत नाही हिला.?
क्रमशः
आता आरती नेमके काय करेल?? जाणून घ्या पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा