Login

डाएटचा पोस्टमोर्टेम भाग 6 (अंतिम भाग)

एक विनोदी कथा
भाग 6

"बरं बाबा पण दुपारी ऑफिसमध्ये मात्र तुला स्प्राउट्सच खावे लागतील हा त्यात अजिबात तडजोड चालणार नाही."

"चालेल" प्रशांतने तात्काळ संमती दिली त्याला माहिती होतं की दुपारी त्याने काय खाल्ल हे बघायला अनिका तिथे ऑफिसमध्ये नसणार आहे.

प्रशांत ऑफिसमध्ये पोहोचला. कामाच्या गडबडीत असतानाच दुपारी १ वाजला आणि त्याच्या पोटाने ओरडायला सुरुवात केली त्याने डबा उघडला समोर तेच मोड आलेले मूग होते.

"अरे प्रशांत,आज काय फक्त गवत आणलंयस का?" शेजारच्या डेस्कवर बसलेल्या मित्राने,विनयने विचारलं.

"अरे काय सांगू तुला... घरात डाएट सुरू झालय बायकोला अचानक साक्षात्कार झालाय की आपण जाड झालोय तिच्यासोबत मलाही हे खायला लागतय " प्रशांतने वैतागून एक चमचा मूग तोंडात टाकले.

"सोड हे कॅन्टीनमध्ये जाऊ आपण. आज तिथे मस्त मिसळ-पाव आहे," विनय

"नाही रे... काहीही असलं तरी प्रेमाने बनवलंय तिने. सकाळी ५ वाजता उठून योगा करून हे उपद्व्याप केलेत. आता हे नाही खाल्लं तर मला पाप लागेल आणि घरी गेल्यावर 'ताप' लागेल तो वेगळाच" त्याने मनावर दगड आणि जिभेवर ताबा ठेवून डबा संपवला.

संध्याकाळी प्रशांत घरी पोहोचला. डबा रिकामा बघून अनिकाचा चेहरा फुलला.

"प्रशांत पूर्ण डबा संपवलास? गुड बॉय बघ, उद्यापासून तुला स्वतःलाच हलकं वाटायला लागेल," अनिका उत्साहात म्हणाली.

"हो गं, खूप छान वाटतंय," प्रशांतने खोटंच सांगितलं

"बरं झालं मग आता चल, आज संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी मी 'मखाणा' भाजून ठेवलेत. चहाऐवजी आपण पुन्हा एकदा लेमन ग्रास टी घेऊया"

प्रशांतच्या चेहऱ्यावरचं हसू एका सेकंदात गायब झालं यावेळी चहा घ्यायची सवय जी होती त्याला.

रात्रीची वेळ झाली डायनिंग टेबलवर आज सूप आणि ब्रोकोली होती तो विचित्र नजरेने त्याकडे बघत होता पण खरी गंमत तर अनिकाची चालली होती.
अनिका दाखवत नसली तरी तिलाही ते हेल्दी जेवण आता खूप जड जात होतं.

"प्रशांत, बघ किती 'फिलिंग' आहे ना हे सूप? दोन चमचे पिले की पोट कसं भरल्यासारखं वाटतं," अनिकाने स्वतःच्या मनाची समजूत काढत विचारलं.

"ह्मम " त्यानेही खोटच होकार दिला

जेवण कसबसं संपवून दोघंही झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजून वाजून बंद झाला तरी ती उठली नाही

"अग तुझा योगा " प्रशांत

"मला वाटतं पुढच्या सोमावर पासून सुरू करावं न्यू मंडे, न्यू मी " तीने बोलुन परत डोळे मिटून घेतले

"हिच्या डाएटचा पोस्टमॉर्टम व्हायला फक्त २४ तास लागले असो आता चहा तरी मिळेल"त्याला मनोमन आनंद झाला कारण त्यालाही माहित होत पुढचा सोमवार कधीच येणार नाही

समाप्त



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →