भाग 5
प्रशांतने त्या पिवळसर-हिरव्या रंगाच्या पाण्याकडे अशा नजरेने बघितलं जणू त्याला कुणीतरी विष प्यायला सांगतंय. त्याने एक छोटासा घोट घेतला आणि त्याचा चेहरा कारल्याचं लोणचं खाल्यासारखा झाला.
"कसं आहे?" अनिकाने उत्साहात विचारलं.
"यापेक्षा विष बरं असेल" तो तोंड वाकडं करत म्हणाला
"चांगल्या गोष्टी कडूच असतात प्रशांत, पी ते गुपचूप! शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर पडतील," तिने त्याला दटावलं. अनिकाने स्वतःचा कप मात्र अशा थाटात संपवला जणू ती जाहिरातीतली मॉडेल आहे, जरी आतून तिलाही ते पाणी म्हणजे उकळलेलं गवतच वाटत होतं.
त्याने ते कसबसं एका दमात गिळलं आणि विचारलं,"नाश्त्याला काय आहे?"
"आज नाश्त्याला आहे... मसाला ओट्स विथ लॉट्स ऑफ व्हेजीटेबल्स" अनिकाने एखाद्या मास्टर शेफसारखी घोषणा केली.
"अगं, पोहे किंवा उपीट कर ना, त्यात पण भाज्या टाकतातच की" तो
"प्रशांत पोहे म्हणजे नुसते कार्ब्स. ओट्समध्ये फायबर असतं " अनिका यूट्यूब वरून चोरी केलेलं ज्ञान त्याला देत होती.
"माझी आई मला नाही राहायचं हेल्दी असंही एक दिवस मरायचंच आहे, तर मग हे असले चोचले कशाला करायचे?"
"एक दिवस मरायचं आहे म्हणून काय विष पिणार का?" अनिकाने त्याला सणसणीत उत्तर दिलं.
"अगं, पण पोहे किंवा उपीट म्हणजे काही विष नसतं ग हेल्दी राहायचं म्हणून फक्त हे ओट्सच खायचे, हा कुठला नियम आहे? आमचे पूर्वज काय ओट्स खायचे का?"
"प्रशांत, ते पूर्वज दिवसभर शेतात काम करायचे, तू काय करतोस? एसी ऑफिसमध्ये बसून फक्त खुर्ची गरम करतोस ना?" तीने लगेच प्रतिउत्तर दिलं
"जे काही असेल ते असेल मला नकोय हे तु राहूदे मला नकोच काही" तो आता चिडून म्हणाला
प्रशांतचा तो अवतार बघून अनिकाचा 'यूट्यूब'वाला ईगो थोडा नरम पडला. तिला माहिती होतं, जर हा आता उपाशीपोटी ऑफिसला गेला तर हा वडापाव खाऊन डाएटचा अंत्यविधी करेल.
"बरं बाबा, चिडू नकोस तुला ओट्स नको असतील तर नको, पण बाहेरचं काही खाऊ नकोस," अनिका नरमाईने म्हणाली
"मुलगी ताळ्यावर आली एकदाची" प्रशांतने मनातल्या
मनात सुटकेचा निश्वास टाकला.
मनात सुटकेचा निश्वास टाकला.
"मग काय देणार आहेस? की आता उपवासच करायचा?" प्रशांतने विचारलं.
"उपाशी नको जाऊस. मी तुला पटकन 'मल्टीग्रेन थालीपीठ' लावून देते विदाऊट ऑइल बर का आणि सोबतीला दही," अनिकाने लगेच दुसरा हेल्दी पर्याय दिला
"थालीपीठ आणि तेही तेलाशिवाय? अनिका ऑईल सुद्धा गरजेचं असतं ग अस झीरो ऑईल नाही चालत" तो तिला समजावत म्हणाला
क्रमशः
