गुंतवणुकीचा खरा परतावा
भाग १
"विनायकराव, तुमचं हे गणित मला कधीच समजलं नाही आणि पटलंही नाही. निवृत्त होऊन आता सहा महिने झाले, पण तुमच्या या घराचा दरवाजा अजूनही एखाद्या सरकारी कचेरीसारखा सारखा उघडला आणि मिटला जातोय. अहो, मघाशी तो जो तरुण आला होता, त्याला तुम्ही चक्क पाच हजार रुपये काढून दिले? आणि वरून त्याला सांगताय की
'परत करण्याची घाई नको'?
अहो, हा कलियुग आहे, इथे सख्खा भाऊ भावाचा नसतो!"
'परत करण्याची घाई नको'?
अहो, हा कलियुग आहे, इथे सख्खा भाऊ भावाचा नसतो!"
श्रीकांत आपल्या आलिशान मर्सिडीजची चावी टेबलावर टाकत सोफ्यावर रेलले. श्रीकांत विनायकरावांचे मेहुणे. व्यवसायात प्रचंड यशस्वी, शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब पैशात मांडणारे व्यक्तिमत्त्व.
विनायकरावांनी शांतपणे चष्म्याचा काच पुसला आणि हसून श्रीकांतकडे पाहिलं.
विनायकरावांनी शांतपणे चष्म्याचा काच पुसला आणि हसून श्रीकांतकडे पाहिलं.
"श्रीकांत, तो संदीप होता. बिचाऱ्याच्या आईचं ऑपरेशन आहे. पैशांची नड होती म्हणून आला होता. आणि राहीला प्रश्न परतीचा, तर माणुसकीच्या व्यवहारात परतावा पैशातच मिळायला हवा असं काही नसतं रे."
"हेच... हेच तुमचं तत्वज्ञान तुम्हाला मागे खेचतंय," श्रीकांत वैतागून म्हणाले.
"विनायकराव, तुम्ही आयुष्यभर सरकारी खात्यात कारकून म्हणून काम केलं. प्रामाणिक राहिलात, ते ठीक आहे. पण थोडा तरी बँक बॅलन्स, एखादा फ्लॅट किंवा सोन्यात गुंतवणूक करायला हवी होती की नाही?
निवृत्तीनंतरचा काळ हा फक्त स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी असतो.
तुम्ही मात्र अजूनही कोणाच्या मुलाचं ॲडमिशन, कोणाची दवाखान्याची फाईल तर कोणाचे घरगुती वाद मिटवण्यात वेळ आणि पैसा घालवताय. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून?"
निवृत्तीनंतरचा काळ हा फक्त स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी असतो.
तुम्ही मात्र अजूनही कोणाच्या मुलाचं ॲडमिशन, कोणाची दवाखान्याची फाईल तर कोणाचे घरगुती वाद मिटवण्यात वेळ आणि पैसा घालवताय. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून?"
विनायकरावांनी खिडकीबाहेर पाहिलं. अंगणातला पारिजातकाचा सडा सुगंध दरवळत होता.
"श्रीकांत, तू बँकांमध्ये, शेअर्समध्ये आणि जमिनीत गुंतवणूक केलीस. ती गरजेची आहेच, मी नाकारत नाही. पण मी माणसांत गुंतवणूक केली आहे. हा माझा बँक बॅलन्स तुला पासबुकमध्ये दिसणार नाही, पण तो माझ्या आजूबाजूला कायम असतो. कठीण काळात हीच माणसं व्याजासकट प्रेम परत करतात, असा माझा विश्वास आहे."
"विश्वास अन् प्रेम! या गोष्टींनी पोट भरत नाही विनायकराव. आज तुमच्या मुलाचा, अनिकेतचा पगार चांगला आहे म्हणून तुमचं चाललंय. देव न करो, पण उद्या काही संकट आलं तर हीच माणसं पाठ फिरवतील, हे लिहून ठेवा माझ्याकडून!" श्रीकांतने आपला मुद्दा ठामपणे मांडला. थोड्या वेळाने ते निघून गेले.
दिवस संथपणे जात होते. विनायकरावांचे जीवन नेहमीप्रमाणे माणुसकीच्या सेवेत व्यतीत होत होते. अनिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाला होता. विनायकरावांच्या आयुष्यात आता समाधान होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच सिद्ध करायचं होतं.
तो गुरुवारचा दिवस विनायकरावांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला. संध्याकाळी सात वाजले होते. पाऊस रिमझिम पडत होता. विनायकरावांना अनिकेतचा फोन येईल अशी अपेक्षा होती, पण फोन आला तो एका अनोळखी नंबरवरून.
"हॅलो, विनायकराव बोलताय का? मी हायवे पोलीस चौकीतून बोलतोय. तुमच्या मुलाचा, अनिकेतचा भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने त्याच्या गाडीला धडक दिली. त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, आम्ही त्याला तातडीने धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये नेत आहोत. तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचा!"
विनायकरावांच्या हातातला फोन जमिनीवर सटकला. घराच्या भिंती जणू त्यांच्या अंगावर कोसळू लागल्या. पत्नी सुमतीने कसाबसा स्वतःला सावरलं. विनायकरावांनी थरथरत्या हाताने श्रीकांतला फोन लावला. श्रीकांत तातडीने पोहोचले आणि त्यांनी विनायकरावांना घेऊन हॉस्पिटल गाठले.
' धन्वंतरी हॉस्पिटल' हे शहरातील सर्वात महागडं आणि अद्ययावत हॉस्पिटल होतं. अनिकेतला आय.सी.यू. मध्ये नेण्यात आलं होतं. मुख्य डॉक्टरांनी बाहेर येऊन विनायकरावांकडे पाहिलं.
" मिस्टर सरदेसाई, अनिकेतच्या डोक्याला आणि बरगड्यांना गंभीर मार लागला आहे. अंतर्गत रक्तस्त्राव होतोय. पुढच्या दोन तासांत मेजर शस्त्रक्रिया करावी लागेल. पण त्यासाठी तुम्हाला आधी १५ लाख रुपये डिपॉझिट करावे लागतील. त्याशिवाय आम्ही प्रक्रिया सुरू करू शकत नाही."
१५ लाख रुपये! एका निवृत्त कारकुनासाठी ही रक्कम डोंगराएवढी होती. विनायकरावांनी श्रीकांतकडे आशेने पाहिलं.
"विनायकराव, १५ लाख म्हणजे जोक नाहीये. माझे सगळे पैसे सध्या एका नवीन प्रोजेक्टमध्ये अडकलेत. मी एफ.डी. मोडायचा विचार केला तरी बँक आता बंद झाली असेल. काही लाख मी नक्कीच उभे करू शकेन, पण १५ लाख या क्षणी... खूप कठीण आहे." श्रीकांतने हतबलता व्यक्त केली.
विनायकराव हॉस्पिटलच्या त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये एका बाकावर कोसळले. मुलाचा जीव टांगणीला होता आणि विनायकरावांकडे फक्त त्यांच्या आयुष्यातल्या माणसांची पुंजी होती. पण आजच्या या व्यावसायिक जगात ती १५ लाखांच्या समोर टिकणार होती का ?
विनायकरावांनी डोळे मिटले. मनापासून देवाचा धावा केला.तितक्यात हॉस्पिटलच्या काचेच्या दरवाजातून एक व्यक्ती धावत आत आली. त्या व्यक्तीने विनायकरावांना पाहिलं आणि तो थबकला...
क्रमशः...
