झाल्या तिन्ही सांजा भाग 3

दवाखान्यातून घरी आल्यावर, काव्याला खोलीत विश्रांती घ्यायला सांगून पृथ्वी थेट हॉलमध्ये आला. तिथे सर्व कुटुंबीय चिंतेत बसले होते.
काव्याने आजवर त्याचे घर सांभाळण्यासाठी स्वतःच्या स्वाभिमानाची आणि आरोग्याची किती मोठी आहुती दिली होती, हे त्याला स्पष्ट दिसत होते.
पण त्याला वाईट वाटले येवडा त्रास होत असूनही आपल्याला एका शब्दाने ती काही बोली नाही.

पुढे...

भाग 3

​दवाखान्यातून घरी आल्यावर, काव्याला खोलीत विश्रांती घ्यायला सांगून पृथ्वी थेट हॉलमध्ये आला. तिथे सर्व कुटुंबीय चिंतेत बसले होते.

अनुराधाबाई मात्र अजूनही तोंड मुरडत होत्या, "आजकालच्या मुलींना जरा काम सांगितलं की लगेच आजारपणाचं नाटक सुरू होतं."

​आईचे हे निर्दयी शब्द ऐकून पृथ्वीचा संयम सुटला. तो अत्यंत शांत पण अगदी स्पष्ट आवाजात म्हणाला, "आई, बस झालं आता!

काव्याच्या या आजारपणाला दुसरं कोणी नाही, तर तुझा अकारण द्वेष आणि सततचे टोमणे कारणीभूत आहेत. तिने स्वतःला विसरून या घरासाठी सर्वकाही केलं, पण तू कधी तिला सून म्हणूनही स्वीकारलं नाहीस."

ती प्रत्येक वेळी प्रयत्न करत राहिली पण तुच्या मनातील आडी काही गेली नाही.

​घरात शांतता पसरली. पृथ्वी पुढे म्हणाला, "मी निर्णय घेतला आहे. ज्या घरात माझ्या पत्नीच्या अस्तित्वाला, प्रेमाला आणि स्वाभिमानाला शून्य किंमत आहे, तिथे आम्ही दोघे एक क्षणही राहणार नाही. उद्या पर्यंत मी आणि काव्या वेगळ्या घरात राहायला जात आहोत."

​पृथ्वीचा हा निर्णय ऐकून संपूर्ण घरात सन्नाटा पसरला. सासरे आणि मोठा भाऊ म्हणाले, "पृथ्वी, असा टोकाचा निर्णय नको घेऊ. आम्ही सगळे काव्याच्या सोबत आहोत."

पण पृथ्वी ठाम होता, "दादा, तुमच्या प्रेमाबद्दल शंका नाही, पण माझ्या आईच्या द्वेषामुळे काव्याचा जीव धोक्यात आला आहे. मी माझ्या डोळ्यांदेखत तिला संपताना पाहू शकत नाही."

​अनुराधाबाईंना पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. त्यांचा लाडका मुलगा सुनेसाठी घर सोडून जाण्यास तयार झाला होता, या धक्क्याने त्यांची वाचाच बसली.

​त्या रात्री घरात कोणाच्याही घशाखाली अन्नाचा घास उतरला नाही. पृथ्वी आणि काव्याच्या खोलीत शांतपणे सामानाची बांधाबांध सुरू होती. काव्याचे डोळे पाणावले होते, ती पृथ्वीला समजावण्याचा प्रयत्न करत होती,

"पृथ्वी, नको असं करू. घर तुटायला मी कारणीभूत ठरेन." पण पृथ्वीने तिचा हात हातात घेऊन सांगितले, "काव्या, हे घर तोडणं नाही, तर तुला जिवंत ठेवण्यासाठी उचललेलं पाऊल आहे."

Stay tuned.....

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →