तिच्या या प्रेमळ, निस्वार्थी आणि काळजीवाहू स्वभावामुळे सासरची सर्व मंडळी तिच्यावर मनापासून खूश झाली.
सासरे नेहमी कौतुकाने म्हणायचे, "काव्या आली आणि घराला घरपण आलं." मोठी वहिनी तिला सख्ख्या बहिणीसारखी वागवायची,
तर लहान दीर आणि नणंद तिच्या भोवतीच पिंगा घालत असत. तिने आपल्या कष्टाने आणि गोड बोलण्याने सासू वगळता घराचा संपूर्ण डोलारा जिंकून घेतला होता.
पुढे....
भाग 2
परंतु, अनुराधाबाईंच्या मनातील आकस तिळमात्रही कमी झाला नव्हता. उलट, काव्याचे घरातील सर्वांशी जमणारे सूर पाहून त्यांचा मत्सर अधिकच वाढला होता.
काव्याने कितीही सुंदर स्वयंपाक केला तरी त्यात मीठ-तिखटाच्या चुका काढणे, तिच्या कपड्यांवरून टोमणे मारणे आणि ती काही बोलली की तिला "फार शहाणी झालीस"
हेच संस्कार आहेत का. असे सुनावणे हा सासूचा रोजचा नियम बनला होता.
हेच संस्कार आहेत का. असे सुनावणे हा सासूचा रोजचा नियम बनला होता.
"तुला कितीही लाडात ठेवलं तरी तू बाहेरून आलेलीच आहेस, आमच्या घराची रीत तुला काय समजणार?" असा टोमणा अनुराधाबाई रोज मारत असत.
काव्या मात्र सर्व काही डोळ्यांत अश्रू आणून मूक गिळून घेत असे. पृथ्वीला या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून ती त्याच्यासमोर नेहमी हसतमुखाने वागायची. तरीही, तिच्या मनावर सासूच्या या वागण्याचा ताण नकळत वाढू लागला होता.
दिवस पुढे सरकत होते, पण घरातील वातावरण हळूहळू तणावपूर्ण होत गेले. घरात एखादी साधी काचेची प्लेट फुटली, दुधाचे उतू गेले किंवा कोणाची तब्येत बिघडली, तरी त्याचा थेट दोष काव्याच्याच माथी मारला जाऊ लागला.
अनुराधाबाईंचा कल असा झाला होता की घरातील प्रत्येक वाईट घटनेला काव्याच जबाबदार आहे.
एके दिवशी घरात सत्यनारायणाची मोठी पूजा होती. सर्व नातेवाईक जमले होते. पूजेची तयारी करताना प्रसादाचा शिरा थोडा जास्त भाजला गेला. अनुराधाबाईंनी सर्व पाहुण्यांसमोर काव्याचा अत्यंत अपमानास्पद शब्दांत पाणउतारा केला.
"हिला साधी पूजा सांभाळता येत नाही, ही काय घर सांभाळणार! माझ्या मुलाचे नशीबच फुटके म्हणून ही घरात आली," असे उद्गार त्यांनी काढले. सासऱ्यांनी आणि मोठ्या वहिनींनी सासूला रोखण्याचा प्रयत्न केला,
पण अनुराधाबाईंनी उलट त्यांनाच सुनावले.
त्या दिवसापासून काव्याच्या मनावर प्रचंड आघात झाला. दिवसरात्र राबूनही पदरी फक्त अपमान आणि तिरस्कारच पडत असल्याने ती आतून पार खचून गेली.
त्या दिवसापासून काव्याच्या मनावर प्रचंड आघात झाला. दिवसरात्र राबूनही पदरी फक्त अपमान आणि तिरस्कारच पडत असल्याने ती आतून पार खचून गेली.
ती सतत दडपणाखाली राहू लागली. सासूचा दिसली तरी तिची छाती धडधडू लागायची.
या मानसिक त्रासाचा थेट परिणाम तिच्या शारीरिक आरोग्यावर होऊ लागला. तिची भूक मंदावली, सतत चक्कर येणे आणि अशक्तपणा वाढला.
या मानसिक त्रासाचा थेट परिणाम तिच्या शारीरिक आरोग्यावर होऊ लागला. तिची भूक मंदावली, सतत चक्कर येणे आणि अशक्तपणा वाढला.
एके दिवशी सकाळी स्वयंपाकघरात काम करत असताना काव्या अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. पृथ्वीने आणि सर्वांनी धावपळ करून तिला तातडीने दवाखान्यात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी करून गंभीर चेहऱ्याने सांगितले, "ती प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. डिप्रेशन आणि अशक्तपणामुळे तिची तब्येत खूप खालावली आहे.
तिला अशा वातावरणात राहणे आता धोकादायक ठरू शकते."
काव्याची ही अवस्था पाहून पृथ्वीचे काळीज हेलावून गेले.
ती आपल्या भरावशावर आली आणि आपणच लक्ष नाही दिल, त्याला आता सर्व परिस्थितीचा उलगडा झाला होता.
काव्याची ही अवस्था पाहून पृथ्वीचे काळीज हेलावून गेले.
ती आपल्या भरावशावर आली आणि आपणच लक्ष नाही दिल, त्याला आता सर्व परिस्थितीचा उलगडा झाला होता.
काव्याने आजवर त्याचे घर सांभाळण्यासाठी स्वतःच्या स्वाभिमानाची आणि आरोग्याची किती मोठी आहुती दिली होती, हे त्याला स्पष्ट दिसत होते.
त्याला वाईट वाटलं येवडा त्रास होत असताना ती आपल्याला एका शब्दाने ही काही बोली नाही.
त्याला वाईट वाटलं येवडा त्रास होत असताना ती आपल्याला एका शब्दाने ही काही बोली नाही.