भाग 5
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेज सुरू झालं होतं.
कालपासून पाऊस जरा कमी झाला होता… पण रस्त्यांवर अजूनही ठिकठिकाणी पाणी साचलेलं दिसत होतं. हवेत थंड गारवा होता आणि वातावरण एकदम फ्रेश वाटत होतं.
आज लेक्चर्सही जास्त नव्हते त्यामुळे सगळेजण निवांत मूडमध्ये कॉलेजमध्ये आले होते.
निरवीने पहिलं लेक्चर शांतपणे केलं आणि बॅग खांद्यावर घेत सरळ लायब्ररीत जाऊन बसली.
लायब्ररी म्हणजे तिची शांत आणि आवडती जागा होती.
कॉलेजमध्ये कितीही गोंधळ असला तरी इथे आल्यावर तिला शांत वाटायचं.
लायब्ररी म्हणजे तिची शांत आणि आवडती जागा होती.
कॉलेजमध्ये कितीही गोंधळ असला तरी इथे आल्यावर तिला शांत वाटायचं.
ती नेहमीप्रमाणे खिडकीजवळच्या जागेवर जाऊन बसली. समोर नुकतंच घेतलेलं इंग्लिश नोव्हेल उघडलं आणि वाचण्यात हरवून गेली.
खिडकीतून येणारा थंड वारा तिच्या केसांशी खेळत होता… बाहेर झाडांच्या पानांवर अजूनही पावसाचे थेंब चमकत होते.
ती पुस्तकात गुंतली होती… पण मध्ये मध्ये नकळत तिचं लक्ष फोनकडे जात होतं.
कशाची वाट बघतेय… हे मात्र तिलाच समजत नव्हतं.
दुसरीकडे…
कशाची वाट बघतेय… हे मात्र तिलाच समजत नव्हतं.
दुसरीकडे…
आरव आणि मिहिर दोघेही कॉलेजमध्ये आले होते.नेहमीप्रमाणे आधी कॅन्टीनमध्ये कटिंग चहा झाला
, मग सगळे प्रोजेक्टच्या नावाखाली गप्पा मारत बसले होते.
, मग सगळे प्रोजेक्टच्या नावाखाली गप्पा मारत बसले होते.
“भाई… आज तरी काम सुरू करूया का?” अनिकेत समोसा खात म्हणाला.
“तू आधी खाणं बंद कर…” वैष्णवी लगेच म्हणाली.
“वर्किंगसाठी एनर्जी लागते मॅडम.” तो कॉलर वर करत म्हणाला तसे सगळे हसू लागले.
वैष्णवी आणि अनिकेत पुन्हा प्रोजेक्टबद्दल डिस्कस करत होते तर गौरव आणि
मिहिर काहीतरी निरर्थक विषयावर भांडत बसले होते.
मिहिर काहीतरी निरर्थक विषयावर भांडत बसले होते.
“भाई… खरंच सांगतो, मला त्या मेकअप दुकानासोबत प्रोजेक्ट नाही करायचा…” मिहिर वैतागून म्हणाला.
“अरे मग काय करायचं? टॉपर मॅडमसोबत तुला ग्रुप मिळायला हवा होता का?” गौरव मुद्दाम म्हणाला.
तसे सगळे हसू लागले.
त्या गोंधळात आरव मात्र वारंवार आजूबाजूला नजर फिरवत होता.
“काय रे?” मिहिरने त्याच्याकडे बघत विचारलं.
“कोणाला शोधतोयस?”
“कोणाला शोधतोयस?”
“कुणाला नाही…” आरव सहज म्हणाला.
पण त्याचं लक्ष पुन्हा एकदा कॉलेजच्या कॉरिडॉरकडे गेलं.तो वारंवार आजूबाजूला नजर फिरवत होता.पण निरवी कुठेच दिसत नव्हती.
“आज आली नाही का?” नकळत त्याच्या मनात विचार आला.
तोच समोरून वृंदा येताना दिसली.
कल्चरल प्रोग्रामच्या वेळी एक-दोनदा त्यांचं बोलणं झालं होतं त्यामुळे चेहरा ओळखीचा होता.
“हाय…” आरव तिच्यासमोर येत म्हणाला.
“हाय…” वृंदानेही हसून रिप्लाय दिला.
“हाय…” वृंदानेही हसून रिप्लाय दिला.
“अरे तुझी मैत्रीण… काय नाव होतं…” आरव मुद्दाम आठवायचा प्रयत्न करत म्हणाला.
वृंदाने भुवया उंचावल्या.
वृंदाने भुवया उंचावल्या.
“निरवी?”
“येस.” आरव हलकंसं हसला. “ती आज आली नाही का कॉलेजला?”
तसं वृंदा लगेच हसू लागली.
“एक वेळ पूर्ण कॉलेज सुट्टी घेईल… पण निरवी नाही.” ती हात छातीवर ठेवत म्हणाली,
“रविवारीसुद्धा कॉलेज उघडं असेल तर ही येईल.”
“रविवारीसुद्धा कॉलेज उघडं असेल तर ही येईल.”
आरव तिचं बोलणं ऐकून हलकंसं हसला.
“मग कुठे आहे ती?” त्याने सहज विचारलं.
“लायब्ररीत असेल…” वृंदा सहज म्हणाली.
“किंवा कॉल कर तिला… नंबर देऊ का?”
“नो थॅंक्यू… आहे तिचा नंबर.” आरव फोन स्क्रीनकडे बघत म्हणाला.
क्षणभर वृंदा त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिली.
“ओह्ह…” ती मिश्किलपणे म्हणाली.
आरवने काहीच न बोलता फोन अनलॉक केला.
“थॅंक्यू… बाय.” तो कॉल लावत म्हणाला आणि सरळ लायब्ररीच्या दिशेने निघून गेला.
वृंदा काही सेकंद त्याच्याकडे जाताना बघत राहिली.
“कमाल मुलगा आहे…” ती नकारार्थी मान हलवत म्हणाली.
“नंबर आहे तरी मला विचारत होता…”
“नंबर आहे तरी मला विचारत होता…”
आरव लायब्ररीच्या दिशेने चालत होता.
कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये नेहमीसारखाच गोंधळ होता,
कुणी ग्रुपसोबत फोटो काढत होतं, कुणी असाइनमेंट पूर्ण करत पळत होतं तर कुणी फक्त निवांत फिरत होतं.
कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये नेहमीसारखाच गोंधळ होता,
कुणी ग्रुपसोबत फोटो काढत होतं, कुणी असाइनमेंट पूर्ण करत पळत होतं तर कुणी फक्त निवांत फिरत होतं.
पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं.फोन अजूनही हातात होता…
स्क्रीनवर निरवीला कॉल लावला होता,
तो काही सेकंद तसाच चालत राहिला ,तिकडे रिंग जाऊ लागली…
एक… दोन… तीन…
लायब्ररीमध्ये बसलेली निरवी अचानक फोन व्हायब्रेट झाल्याने भानावर आली.
तिने पुस्तकातून नजर वर केली आणि बाजूला ठेवलेला फोन हातात घेतला.
पुर्ण अननोन नंबर नव्हता , पण सेव्ह पण नव्हता.
पुर्ण अननोन नंबर नव्हता , पण सेव्ह पण नव्हता.
स्क्रीनवर नाव दिसत होतं
“आरव मेहता..”
क्षणभर तिची धडधड वाढली.
क्षणभर तिची धडधड वाढली.
तिने पटकन आजूबाजूला बघितलं… लायब्ररीमध्ये सगळेजण शांतपणे आपल्या कामात होते.
फोन अजूनही वाजत होता.
फोन अजूनही वाजत होता.
“आरव?” ती स्वतःशीच हलक्या आवाजात म्हणाली.
तिच्या चेहऱ्यावर नकळत टेन्शन आणि स्माईल दोन्ही एकत्र आले.
तिने पटकन केस कानामागे केले आणि कॉल रिसीव्ह केला.
तिने पटकन केस कानामागे केले आणि कॉल रिसीव्ह केला.
“हॅलो…” तिचा आवाज नेहमीपेक्षा जरा हळू होता.
“हाय…” समोरून आरवचा शांत आवाज आला.
“हाय…” समोरून आरवचा शांत आवाज आला.
क्षणभर दोघेही शांत झाले.निरवीच्या हातातलं पेन नकळत फिरू लागलं.
“उम्म… डिस्टर्ब तर नाही ना केलं?” आरवने विचारलं.
“नाही…” ती पटकन म्हणाली.
“बोल ना…”
“बोल ना…”
“अक्चुली ... प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं.” तो कॉरिडॉरमधून चालत म्हणाला.
“तुला वेळ आहे का आत्ता?”
निरवीने समोर उघडलेल्या पुस्तकाकडे पाहिलं
“हम्म… लायब्ररीत आहे.”
“ओह…” आरव हलकंसं हसला.
“म्हणजे वृंदा खरंच बरोबर बोलली.” तो स्वतः शी पुटपुटला.
“म्हणजे वृंदा खरंच बरोबर बोलली.” तो स्वतः शी पुटपुटला.
“काय?” निरवी गोंधळून म्हणाली.
“काही नाही…” तो मुद्दाम विषय टाळत म्हणाला. “मी येतो तिथे?”
हे ऐकताच निरवी सरळ बसली.
“आत्ता?” तिने नकळत विचारलं.
“आत्ता?” तिने नकळत विचारलं.
“हो… का?” आरव हसत म्हणाला,
“टॉपर मॅडमला भेटायला अपॉईंटमेंट घ्यावी लागते का?”
“टॉपर मॅडमला भेटायला अपॉईंटमेंट घ्यावी लागते का?”
तसं तिच्या ओठांवर नकळत हसू आलं.
“नाही… तसं काही नाही.”
“गुड.” तो लायब्ररीच्या दाराजवळ थांबत म्हणाला,
“कारण मी आधीच बाहेर उभा आहे.”
“कारण मी आधीच बाहेर उभा आहे.”
"ओके.." निरवी शांतपणे म्हणाली आणि कॉल कट केला.
निरवीची धडधड वाढली होती, तिने पटकन पाण्याची बाटली उचलली
आणि तोंडाला लावली.
आणि तोंडाला लावली.
“काय होतंय तुला…” ती स्वतःशीच पुटपुटली.
तिने पटकन केस कानामागे केले, समोरचं पुस्तक बंद केलं आणि एक खोल श्वास घेतला.
.
.
क्रमशः
कसा वाटला भाग ते नक्की सांगा.
कथेच्या नवीन भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि समीक्षा द्यायला विसरू नका.
कसा वाटला भाग ते नक्की सांगा.
कथेच्या नवीन भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि समीक्षा द्यायला विसरू नका.
