भाग 4
आरव घरी पोहोचला तेव्हा दुपारचे जवळपास दोन वाजले होते.
बाहेर अजूनही पाऊस सुरूच होता, रस्त्यावरून येताना त्याने कारच्या काचेतून बाहेर नजर टाकली.
ओले रस्ते, धावपळ करणारी माणसं, सिग्नलवर थांबलेल्या गाड्या
आणि हॉर्नचा आवाज डोके दुखी वाढवत होते. त्या सगळ्यातून घरी परतल्यावर मिळणार
ा शांतपणा त्याला नेहमी आवडायचा..
त्याने कार पोर्चमध्ये पार्क केली आणि घरात शिरला.
घरात वेगळीच शांतता होती मोठा हॉल, हलकासा एसीचा आवाज,
आणि खिडकीबाहेर पडणारा पाऊस , घरात पाऊल टाकताच
त्याने एक खोल श्वास घेतला.
कॉलेजचा गोंधळ, मित्रांची मस्ती, सततचा आवाज… हे सगळं मागे राहिल्यासारखं वाटू लागले.
आरव चांगल्या घरातून होता, त्याचे वडील मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत होते,
तर मोठा भाऊ अथर्व इंजिनिअरिंग करून कुलकर्णी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं.
तर मोठा भाऊ अथर्व इंजिनिअरिंग करून कुलकर्णी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं.
पण एवढ्या मोठ्या घरातही एका गोष्टीची कायम कमी जाणवायची त्याला
आई..
आरव लहान असतानाच त्याची आई राधिका (कॅन्सर सारख्या आजाराशी लढताना त्या हरल्या..) त्यामुळे आईच्या प्रेम त्याला लाभले नाही ..
आई..
आरव लहान असतानाच त्याची आई राधिका (कॅन्सर सारख्या आजाराशी लढताना त्या हरल्या..) त्यामुळे आईच्या प्रेम त्याला लाभले नाही ..
घरात सगळं होतं… पैसा, माणसं, सुखसोयी… पण आईच्या मायेची जागा
मात्र कधीच भरून निघाली नव्हती.
वडिल मानव आणि भाऊ अर्थव लहानपणापासून त्याला प्रेमाने, लाडाने वाढवलं होतं..
कधी वेळ प्रसंगी दोघेही त्याची आई झाले होते.
मात्र कधीच भरून निघाली नव्हती.
वडिल मानव आणि भाऊ अर्थव लहानपणापासून त्याला प्रेमाने, लाडाने वाढवलं होतं..
कधी वेळ प्रसंगी दोघेही त्याची आई झाले होते.
तो वर आपल्या रूममध्ये गेला.
बॅग एका बाजूला ठेवली, सरळ वॉशरूममध्ये गेला.
काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा चेहऱ्यावरचा थकवा जरा कमी झाला होता.
त्याने केस टॉवेलने पुसले आणि. मस्त हुडी अडकवली आणि खाली लंचसाठी आला.
बॅग एका बाजूला ठेवली, सरळ वॉशरूममध्ये गेला.
काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा चेहऱ्यावरचा थकवा जरा कमी झाला होता.
त्याने केस टॉवेलने पुसले आणि. मस्त हुडी अडकवली आणि खाली लंचसाठी आला.
खाली किचनमध्ये फक्त सुधा मावशी होत्या.
अनेक वर्षांपासून त्यांच्या घरी काम करत होत्या. आरवसाठी त्या घरातल्या माणसांसारख्याच होत्या.
“आलास बाबा?” त्या हसत म्हणाल्या.
“हम्म… भूक लागलीये खूप.” आरव खुर्चीवर बसत म्हणाला.
“आत्ताच गरम करते…”
त्यांनी पटकन त्याच्यासमोर गरम फुलके, पनीरची भाजी आणि डाळ-भात वाढला.
त्यांनी पटकन त्याच्यासमोर गरम फुलके, पनीरची भाजी आणि डाळ-भात वाढला.
“बाबा गेले ऑफिसला?” तो सहज विचारत म्हणाला.
“हो… आणि दादा-वहिनी बाहेर गेले आहेत.”त्यांनी त्याच्या केसातून हात फिरवला.
तो मान हलवत शांतपणे जेवू लागला.
मध्येच सुधा मावशी त्याच्या प्लेटमध्ये अजून भाजी वाढत होत्या.
“पुरे मावशी…” तो हसत म्हणाला.
“तू आधी बारीक झाला आहेस… खा शांतपणे. त्या म्हणाल्या.
तसं त्याला नकळत हसू आलं.
घरात कोणी असो वा नसो… सुधा मावशी कायम त्याची काळजी घ्यायच्या.
घरात कोणी असो वा नसो… सुधा मावशी कायम त्याची काळजी घ्यायच्या.
लंच झाल्यावर तो पुन्हा वर आपल्या रूममध्ये आला.बाहेर पाऊस सुरूच होता,
त्याने बाल्कनीचा पडदा बाजूला केला आणि काही क्षण तसाच बाहेर बघत उभा राहिला.
थंड वारा आत येत होता… आणि वातावरण एकदम रिलॅक्स वाटत होतं.
तो बेडवर येऊन आडवा पडला, सॉफ्ट म्युझिक चालू केले फोन हातात घेतला,
थोडावेळ रिल्स स्क्रोल करत बसला… पण काही वेळाने त्याचं लक्ष दुसरीकडेच गेलं.
तो बेडवर येऊन आडवा पडला, सॉफ्ट म्युझिक चालू केले फोन हातात घेतला,
थोडावेळ रिल्स स्क्रोल करत बसला… पण काही वेळाने त्याचं लक्ष दुसरीकडेच गेलं.
प्रोजेक्ट.
“टॉपिक ठरवायला पाहिजे…” तो स्वतःशीच पुटपुटला.
तो विचारात पडला…आणि नकळत त्याच्या डोक्यात पुन्हा ती आली
निरवी.
तो विचारात पडला…आणि नकळत त्याच्या डोक्यात पुन्हा ती आली
निरवी.
आज पहिल्यांदाच त्याने तिला इतकं नोटीस केलं होतं.
तिचं शांत राहणं, साधेपणा आणि बाकी मुलींसारखा नसलेला तिचा स्वभाव लगेच समजत होता..
तो काही क्षण तसाच तिचा विचार करत राहिला.
“तिने टॉपिक ठरवला असेल का?” तो हलकंसं हसत म्हणाला.
त्याने लगेच फोन हातात घेतला. कॉल लॉग उघडलं, पण तिचा नंबर नव्हताच.
"शिट.." आरव केसातून हात फिरवत म्हणाला
"मुर्खा कसा असेल तिचा नंबर, कधी बोलला आहेस तरी का?" तो स्वतः शी पुटपुटला.
"मुर्खा कसा असेल तिचा नंबर, कधी बोलला आहेस तरी का?" तो स्वतः शी पुटपुटला.
तो दोन सेकंद स्क्रीनकडे बघत राहिला. आणि मग अचानक त्याला आठवलं,
“क्लास व्हॉट्सॲप ग्रुप…”
तो पटकन ग्रुपमध्ये गेला आणि मेंबर्स लिस्टमधून तिचं नाव शोधू लागला…
ऑलमोस्ट क्लासमधील सगळ्यांचे नंबर फोनमध्ये सेव्ह होते,
शेवटी काही नंबर दिसले, काहींवर नाव होते तर काही असेच होते.
त्याने दिर्घ श्वास घेतला आणि एक नंबर उघडला..समोर एका मुलाचा फोटो आला ,त्याने नकारार्थी मान हलवली आणि दुसरा नंबर उघडला..
अचानक त्याची धडधड जाणवू लागली,
एका बाजूने घेतलेला बॅक ॲड व्हाइट तिचा फोटो, मागे भिंतीवर काही फोटो आणि गिटार लटकत होते
एका बाजूने घेतलेला बॅक ॲड व्हाइट तिचा फोटो, मागे भिंतीवर काही फोटो आणि गिटार लटकत होते
त्याची नजर त्या प्रोफाइल फोटोवरच खिळून राहिली…साधासा फोटो होता…
ना जास्त फिल्टर्स, ना कुठला शो ऑफ.
ना जास्त फिल्टर्स, ना कुठला शो ऑफ.
व्हाईट कलरचा सिम्पल प्लाझो टॉप, मोकळे केस आणि चेहऱ्यावर शांत भाव… पण तरीही त्या फोटोमध्ये काहीतरी होतं, जे त्याला दोन सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबायला भाग पाडत होतं.
खिडकीतून येणाऱ्या लाईटमुळे तिच्या चेहऱ्यावर हलकी चमक पसरली होती…
आणि डोळ्यांत नेहमीसारखाच शांतपणा दिसत होता.
आरव नकळत फोटो झूम करून बघू लागला.
“इतकी शांत कशी राहते ही?” तो स्वतःशीच पुटपुटला.
बाकी मुलींसारखे सतत स्टेटस, रील्स, अटेंशनकाहीच नव्हतं तिच्यात.
सगळं खूप साधं पण तरीही मनाला थांबवणारं होते
सगळं खूप साधं पण तरीही मनाला थांबवणारं होते
त्याने नंबर सेव्ह करायचा म्हणून नाव टाईप करायला सुरुवात केली…
“निरवी…”
क्षणभर तो थांबला.
ओठांवर हलकंसं हसू आलं.
क्षणभर तो थांबला.
ओठांवर हलकंसं हसू आलं.
“टॉपर मॅडम…” तो मिश्किलपणे म्हणाला आणि नाव सेव्ह केलं.
फोन बाजूला ठेवणार तोच त्याची नजर तिच्या “अबाऊट” वर गेल..
"सम पीपल फिल लाइक रेन.... कॅम, रेअर अँड अंफॉर्जेटेबल ”
"सम पीपल फिल लाइक रेन.... कॅम, रेअर अँड अंफॉर्जेटेबल ”
तो काही सेकंद ते वाक्य वाचत राहिला.आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावरचं हसू जरा गडद झालं.
“ पाऊस हा.…” तो हलक्या आवाजात म्हणाला.
बाहेरही पाऊस सुरूच होता… खिडकीवर आदळणाऱ्या सरींचा आवाज रूममध्ये भरून राहिला होता.
त्याने पुन्हा तिचा फोटो उघडला.
त्याने पुन्हा तिचा फोटो उघडला.
आज पहिल्यांदाच त्याला जाणवत होतं,
ती फक्त क्लासमधली शांत मुलगी नव्हती. तिच्यात काहीतरी होतं…
जे नकळत त्याचं लक्ष तिच्याकडे खेचत होतं.
ती फक्त क्लासमधली शांत मुलगी नव्हती. तिच्यात काहीतरी होतं…
जे नकळत त्याचं लक्ष तिच्याकडे खेचत होतं.
तोच अचानक फोनवर मिहिरचा मेसेजच नोटिफिकेशन आले..
“भाई… असिग्नमेंट लिहिलीस का की पुन्हा देवदूत येणार मदतीला? ”
तसा आरव हसला.
तसा आरव हसला.
“शटअप.” त्याने रिप्लाय केला.
समोर पुन्हा निरवीचा फोटो दिसला… आणि काही क्षण तो तसाच स्क्रीनकडे बघत राहिला.
दुसरीकडे…
निरवी छत्रीचा आसरा घेत रिक्षातून उतरून घरी परतली,संध्याकाळची वेळ होती,
ती गेटच्या आतमध्ये प्रवेश केला तसा एक सिक्युरिटी गार्ड तिच्या जवळ आला
आणि पटकन भिजलेली छत्री आपल्याकडे घेऊन , दुसरी छत्री तिच्या डोक्यावर पकडून तिला मेन दरवाजापर्यंत सोडले..
ती गेटच्या आतमध्ये प्रवेश केला तसा एक सिक्युरिटी गार्ड तिच्या जवळ आला
आणि पटकन भिजलेली छत्री आपल्याकडे घेऊन , दुसरी छत्री तिच्या डोक्यावर पकडून तिला मेन दरवाजापर्यंत सोडले..
ती केसातून हात फिरवत घरात प्रवेश केला,
" हे काय बेटू...ती भिजली आहेस.." हॉलमध्ये बसलेल्या केशव यांनी तिला बघितले..
" हे काय बेटू...ती भिजली आहेस.." हॉलमध्ये बसलेल्या केशव यांनी तिला बघितले..
"ओ एम जी.. केशव कुलकर्णी उर्फ कुलकर्णी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा आज चक्कं घरी.." ती आश्चर्याने थक्क होऊन विचारले..
"बेट्टू.." केशव यांनी नाटकी रागाने म्हणाले.
"ओहो... बाबां, सो सॉरी.." ती हळूच स्वतःचा कान पकडून त्यांच्या बाजूला जाऊन बसली.
"शारदा... एक शारदा , टॉवेल घेऊन ये .." त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला.
" बाबा , चिल एवढी नाही भिजले मी.." ती त्यांची काळजी बघून नकारार्थी मान हलवत म्हणाली.
" अहो, टॉवेल कशासाठी हवा होता.." शारदा टॅवेल घेऊन येत म्हणाल्या..
"निधी बच्चा, हे काय तुझा ड्रेस ?"" तु कशी भिजलीस?" त्या निरवीला बघून म्हणाली.
" दे आता उत्तर.." केशव चष्मा काढून तिला बघत म्हणाले.
शारदा पटकन तिचे केस पुसू लागल्या,
निरवीने दोघांकडे एक नजर टाकली आणि सोफ्यावर रेलून बसली.
निरवीने दोघांकडे एक नजर टाकली आणि सोफ्यावर रेलून बसली.
“अहो… काही नाही. कॉलेजजवळ एका महान व्यक्ती
गाडीचं पाणी अंगावर उडवलं.” ती ओठ वाकवत म्हणाली.
गाडीचं पाणी अंगावर उडवलं.” ती ओठ वाकवत म्हणाली.
“काय?” शारदा लगेच तिच्याजवळ येत म्हणाल्या.
“मग कपडे बदललेस ना कॉलेजमध्ये?”
“मग कपडे बदललेस ना कॉलेजमध्ये?”
“हो आई… वृंदाने ड्रेस आणून दिला होता.” ती शांतपणे म्हणाली.
केशव तिच्याकडे बघतच होते.
“मुंबईचा पाऊस आणि तुझं कॉलेज… दोघांवर माझा विश्वास नाही.” ते डोकं हलवत म्हणाले.
तशी निरवी हलकंसं हसली.
“मुंबईचा पाऊस आणि तुझं कॉलेज… दोघांवर माझा विश्वास नाही.” ते डोकं हलवत म्हणाले.
तशी निरवी हलकंसं हसली.
घरात येताच तिला नेहमीच एक वेगळाच शांतपणा जाणवायचा
मोठा हॉल, हलका कॉफीचा सुगंध, आई-बाबांचा आवाज दिवसभराचा
थकवा जणू दारातच थांबून जायचा
.
“चल आधी वर जाऊन फ्रेश हो.” शारदा तिचे केस टॉवेलने पुसत म्हणाल्या.
" मी गरमागरम सुप आणि काही खायला पाठवते.." शारदा म्हणाली.

“हम्म…” निरवी मान हलवत उठली.
ती वर आपल्या रूममध्ये आली.
ती वर आपल्या रूममध्ये आली.
रूममध्ये हलकासा लॅव्हेंडर फ्रेशनरचा सुगंध पसरला होता.
खिडकीजवळ छोटीशी बुकशेल्फ, बाजूला गिटार, भिंतीवर काही फोट
ो आणि फेरी लाईट्स चमकत होते.
खिडकीजवळ छोटीशी बुकशेल्फ, बाजूला गिटार, भिंतीवर काही फोट
ो आणि फेरी लाईट्स चमकत होते.
ती काही क्षण तशीच उभी राहिली.
बाहेर पावसाच्या सरी अजूनही काचांवर आपटत होत्या.
बाहेर पावसाच्या सरी अजूनही काचांवर आपटत होत्या.
तिने बॅग बाजूला ठेवली आणि केस मोकळे करत
आरशासमोर उभी राहिली.
आजचा दिवस आठवला की नकळत तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येत होतं.
“आरव मेहता…” ती हलक्या आवाजात स्वतःशीच म्हणाली.
क्षणात तिच्या गालावर हलकी लाली चढली.
ती पटकन वॉशरूममध्ये निघून गेली,काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर आली.
ओव्हरसाईज टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून ती बेडवर येऊन बसली.
ती पटकन वॉशरूममध्ये निघून गेली,काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर आली.
ओव्हरसाईज टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून ती बेडवर येऊन बसली.
तोच फोन व्हायब्रेट झाला.
वृंदाचा मेसेज होता,
वृंदाचा मेसेज होता,
“काय मग मिस. प्रोजेक्ट पार्टनर … जिवंत आहेस ना? ”
निरवीने मेसेज वाचताच कपाळावर हात मारला.
निरवीने मेसेज वाचताच कपाळावर हात मारला.
“तु ना खरंच वेडी आहेस…” ती टाईप करत हसू लागली.
“अग पण खरं सांग… आरवने बघितलं का तुझ्याकडे?” लगेच पुढचा मेसेज आला.
निरवी काही सेकंद स्क्रीनकडे बघत राहिली.
तिच्या डोळ्यासमोर पुन्हा क्लासमधला तो क्षण आला…
ती मॅडमजवळून मागे वळली होती आणि आरव तिच्याकडेच बघत होता.
ती मॅडमजवळून मागे वळली होती आणि आरव तिच्याकडेच बघत होता.
तिची धडधड पुन्हा वाढली.
“माहित नाही…” तिने छोटंसं रिप्लाय केलं.
“ओहोooo… म्हणजे काहीतरी तर झालंय.” वृंदाने लगेच पाठवलं.
“गप्प बस.” निरवीने रिप्लाय केला आणि फोन बाजूला ठेवला.
ती बेडवर पडली आणि छताकडे बघत राहिली.
क्रमशः
कसा वाटला भाग ते नक्की सांगा..
अशाच नवीन कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि समीक्षा द्यायला विसरू नका..
तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने