Login

व्हेन रेन फेल्ट लाइक यू...भाग 3

जेव्हा पाऊस तुझ्यासारखा वाटू लागला..

भाग 3


वृंदाला घरी काही काम असल्यामुळे कॉलेजमधून लवकरच निघून गेली. निरवीनेही आपलं सगळं आवरलं आणि शेवटच्या लेक्चरसाठी क्लासमध्ये जाऊन बसली.


पूर्ण क्लासमध्ये ती एकटीच बसली होती, खिडकीबाहेर अजूनही पाऊस सुरू होता… थंड वारा आत येत होता.


ती शांतपणे आपली डायरी उघडून काहीतरी लिहत बसली होती.
हळूहळू बाकीचे स्टुडंट्स क्लासमध्ये येऊ लागले, कुणी गोंधळ करत होतं, कुणी प्रोजेक्ट तर कुणी असैग्नमेंट पुर्ण करत होते तरकुणी लेक्चर संपायची वाट बघत फोन स्क्रोल करत बसलं होतं.



थोड्याच वेळात टिचरही आल्या आणि लेक्चर सुरू झाले,
निरवी शांतपणे ऐकून घेत होती, काही ना काही पॉइंट लिहून ठेवत होती... मॅडमनी तिला बघत शिकवत होत्या.

बाकी सगळेजण निवांत फोनमध्ये हरवले होते तर काही बसल्या जागी झोपत होते ...


निरवीचं लक्ष पुस्तकात होतं, पण मध्ये मध्ये तिचं मन नकळत दुसरीकडेच भरकटत होतं…


आरव.


त्याचं नाव आठवलं की तिच्या चेहऱ्यावर नकळत हलकंसं हसू यायचं.


शेवटी लेक्चर संपलं तसे सगळेजण सुटकेचा निश्वास टाकत बाहेर पडू लागले.


कोणी कॅन्टीनकडे पळत होतं तर कुणी थेट घरी निघालं होतं.


निरवीने मात्र शांतपणे आपली बॅग खांद्यावर घेतली आणि सरळ लायब्ररीकडे निघाली.

कॉलेजमध्ये एक जागा अशी होती जिथे गेल्यावर तिला सगळा गोंधळ विसरायला व्हायचा… लायब्ररी.



ती नेहमीप्रमाणे खिडकीजवळच्या आपल्या जागेवर जाऊन बसली.
समोर पुस्तक उघडलं… शांतपणे पावसाच्या सरीच्या आवाज ती वाचत बसली..



दुसरीकडे आरव आणि त्याचा ग्रुप प्रिन्सिपल सरांच्या केबिनमधून बाहेर पडत होते.


कॉलेजच्या पार्किंगची समस्या, गेटजवळ पावसाचं साचलेलं पाणी… सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित सरांसमोर मांडल्या होत्या.

सरांनीही सगळं लवकर ठीक करण्याचं आश्वासन दिलं.


“चलो भाई… आता कडक चहा पाहिजे.” गौरव ताण देत म्हणाला.

“आणि काहीतरी खायलाही…” अनिकेत लगेच म्हणाला.


“तुला प्रत्येक वेळी खायचंच असतं का?” वैष्णवी त्याच्याकडे बघत म्हणाली.


“हो. हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.” अनिकेत कॉलर वर करत म्हणाला तसे सगळे हसू लागले.


थोड्याच वेळात सगळेजण कॅन्टीनमध्ये जाऊन बसले.
टेबलवर कटिंग चहा, समोसा, फ्राईज सगळं जमलं होतं.
वैष्णवी आणि अनिकेत दोघं प्रोजेक्टचा प्लॅन डिस्कस करण्यात बिझी होते.


“आपण टॉपिक आधी finalize करूया…”

“हो आणि प्रेझेंटेशन मी बघतो…”


दोघांची सीरियस डिस्कशन सुरू होतं
बाकी सगळेजण मात्र निवांत फोनमध्ये हरवले होते.


तोच मिहिर वैतागून म्हणाला

“भाई… मला त्या मेकअप दुकानासोबत प्रोजेक्ट नाही करायचा.”

तसा गौरवने नाटकी चेहरा केला,


“अरे रे… बाळ नाराज झालं वाटतं.” तो उठून मुद्दाम मिहिरच्या गालावर हात फिरवत म्हणाला

“असू दे… नको रडूस…”


“ए हट ना!” मिहिरने त्याला ढकललं.

क्षणात टेबलवर हशा पसरला.


“भाई खरंच सांगतो…” मिहिर अजूनही वैतागून म्हणाला,
“ती प्रोजेक्टपेक्षा लिपस्टिक शेडवर जास्त बोलेल.”


“तुझ्याशी तरी कोण नॉर्मल राहील?” वैष्णवी लगेच म्हणाली.

“हो ना…” अनिकेतनेही मुद्दाम मान हलवली.


“तुम्ही सगळे माझे दुश्मन आहात.” मिहिर हात छातीवर ठेवत म्हणाला.


तसे पुन्हा सगळे हसू लागले, त्या गोंधळात आरव मात्र शांत बसला होता.


एका हातात कॉफी मग फिरवत तो विचारात हरवला होता…
आणि नकळत त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा तेच नाव आलं—


निरवी.


गेली तीन वर्षं दोघेही त्याच कॉलेजमध्ये होती...
पण कधीच दोघांचा बोलण्याचा संबंध आला नव्हता.


त्यानेही कधी तिच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही,


ती नेहमी पहिल्या बाकावर बसणारी ... शांत, स्वतःच्या विश्वात रमणारी... लेक्चर, नोट्स, लायब्ररी आणि स्वतःपुरतं मर्यादित जग ठेवून असलेली मुलगी...


आणि तो?


पुर्ण कॉलेजमध्ये नाव असलेला.
कधी कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत गोंधळ, कधी फुटबॉल ग्राउंडवर, तर कधी कुठल्या ना कुठल्या कामासाठी स्टाफ रूम बाहेर उभा राहणारा मुलगा.


दोघांची जग पुर्णपणे वेगळी होती.

पण आज... पहिल्यांदाच त्याने तिला निट पाहिलं होतं,
तिचा शांत स्वभाव, डोळ्यातला साधेपणा आणि बाकी मुलींसारखा नसलेला तिचा वागणं जाणून देत होतं..


ना ओव्हर अटीट्युड, ना शो ऑफ बस साधं सिंपल तिचं लाइफ होतं,
तीन वर्षे कॉलेजमध्ये टॉपर असूनही कुठे तिचं वागणं बदललं नव्हतं.


तरीही...काहीतरी वेगळं होतं तिच्यात, जे त्याला तिच्याकडे बघायला मजबूर करत होते.


“भाई...” मिहिरने त्याच्या समोर हात हलवला.
“कुठे हरवला?”


आरव भानावर आला.


“कुठे नाही रे...” तो सहज म्हणाला.


“अच्छा...” गौरव मिश्किलपणे म्हणाला,
“मग कॉफी थंड झाली तरी लक्ष नाही?”


तसा आरवने खाली मगकडे पाहिलं आणि हलकंसं हसला.
“तुम्हाला दुसरं काही काम नसतं का रे?” त्याचा सूर लक्षात घेऊन म्हणाला.


“नाही...” सगळेजण एकसुरात म्हणाले तसे पुन्हा टेबलवर हशा पसरला.


तोच वैष्णवीने फोन बाजूला ठेवला ,


“बाय द वे... प्रोजेक्ट बद्दल काही डिस्कस केलं का तुम्ही दोघांनी?” वैष्णवीने विचारले.


“नाही अजून...” आरव निवांतपणे म्हणाला.


“मग कर लवकर... नाहीतर टॉपर मॅडम पहिल्याच
आठवड्यात तुला ग्रुपमधून बाहेर काढतील...” अनिकेत म्हणाला.


“हो आणि मग तू परत आमच्याकडे रडत येशील...” गौरव मुद्दाम म्हणाला.


तसे सगळे हसू लागले.
आरवने फक्त मान हलवली.


"बरं उद्या असैग्नमेंट सबमिशनचा शेवटचा दिवस आहे ...
सगळ्यांनी आठवणीने घेऊन या" वैष्णवी आपली बॅग उचलत म्हणाली.


" हो ना, वैष्णवी मला फोटो पाठव मी जावून लिहितो.." गौरव म्हणाला.


" हो दोन लिहि बरं का?" मिहिर त्याला म्हणाला.


" नाही, तुझं तु लिहून काढ, दोन पाने आहेत फक्त.." आरव म्हणाला.


"ओ भाई, तु तर गप्पच रहा.." मिहिर त्याला म्हणाला.

"तुला ना लिहिण्यचे टेंशन ना सबमिशनचे ... कोण तुझं सबमिशन करत काय माहित.." मिहिर नकारार्थी मान हलवत म्हणाला.

"तेच तर किती शोधल पण समजलंच नाही.." अनिकेत म्हणाला.


"बरं जावू दे , विषय चला निघू या.." वैष्णवी सगळ्यांना शांत करत म्हणाली.


"हो चला ...
बाय ऑल.." मिहिर उभा राहत म्हणाला.


"मला चौकात सोडशील हा.." वैष्णवी त्याला म्हणाली.

"चल गं सोडोवतो.." मिहिर वैष्णवीच्या खांद्यावर हात ठेवून चालत म्हणाला


हळू सगळेजण आपापल्या मार्गाने निघून गेले.


क्रमशः
कसा वाटला भाग ते नक्की सांगा,
अशाच नवीन कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि समीक्षा द्यायला विसरू नका.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →