When rain felt like you..
भाग 2
निरवी आणि वृंदा दोघी क्लासरूम मध्ये आल्या,नेहमीप्रमाणे त्यांची जागा रिकामीच होती...
कुणीच पहिल्या बेंचवर बसण्यासाठी उत्सुक नसल्याचे त्यामुळे दोघींना लास्ट बसायचं किंवा आपल्याला जागा मिळेल याची चिंता नसायची.
कुणीच पहिल्या बेंचवर बसण्यासाठी उत्सुक नसल्याचे त्यामुळे दोघींना लास्ट बसायचं किंवा आपल्याला जागा मिळेल याची चिंता नसायची.
दोघीही आपल्या जागेवर बसल्या..निरवीने बसल्या क्षणी आपली डायरी काढली
आणि लास्ट लेक्चरची रिव्हिज सुरू केली,
तर वृंदा मात्र मागे वळून दुसऱ्या मैत्रीणी सोबत बोलू लागली..
हळू हळू सगळेजण क्लासमध्ये येऊ लागले ,आरव आणि त्यांचा ग्रुप बिंदास मॅडम समोर चालत क्लासमध्ये आले आणि नेहमीच्या लास्ट बेंचवर जाऊन बसले.
कुलकर्णी मॅडम फायनली आल्या आणि लेक्चर सुरू झाले,कुणी मनापासून लेक्चर ऐकत होते तर कुणी बाहेर पडणाऱ्या सरी बघण्यात मग्न होते..
लेक्चर सुरू होऊन जवळपास दहा मिनिटं झाली होती,
क्लासमध्ये शांतता होती.फक्त कुलकर्णी मॅडमचा आवाज आणि
पावसाच्या सरी खिडकीवर आपटण्याचा मंद आवाज ऐकू येत होता.
अर्धा तास उलटला तसे ,
"ओके क्लास, सगळ्यांनी निट लक्ष द्या..” कुलकर्णी मॅडमचा आवाज आला तसे सगळे शांत झाले.
“फायनल प्रोजेक्टसाठी मी ग्रुप अनाउन्स करणार आहे.या वेळेस मी स्वतः ग्रुपस ठरवले आहेत.”
सगळीकडे कुजबुज सुरू झाली.
"शांत, शांत... मागच्या वर्षीच्या अनुभवावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आपण आपल्या मित्रांसोबत प्रोजेक्ट करू म्हणजे आपल्या काही करायला नको .. असे वाटणारे काही स्टुडंट्स असतात.." कुलकर्णी मॅडम म्हणाल्या
आपण आपल्या मित्रांसोबत प्रोजेक्ट करू म्हणजे आपल्या काही करायला नको .. असे वाटणारे काही स्टुडंट्स असतात.." कुलकर्णी मॅडम म्हणाल्या
तसे मागच्या ग्रुपमधील सगळेजण मिहिरला बघू लागले,
"म्हणून यावेळी दोन जणांचा ग्रुप असणार , प्रत्येआने आपण केलेल्या टास्कचा रेकॉर्ड ठेवायचा,
त्यामुळे मी जास्त केले की तु हा प्रश्न येणार नाही.." त्या पुढे म्हणाल्या.
कुणाला कुणासोबत ग्रुप मिळणार याची उत्सुकता होती.
निरवी शांतपणे बसून हातातलं पेन अलगद फिरवत समोर पाहू लागली.
कुलकर्णी मॅडम एक एक नाव अनॉउन्स करत होत्या.
“ग्रुप नंबर वन…”त्यांनी दोघांची नावे सांगितली तस क्लासमध्ये कुठे एक्सिटमेंट होत
ी तर कुठे नाराजी सुरू होती.
“यार मला तिच्यासोबत नाही करायचं…”
“थॅंक्य गॉड ! आपला ग्रुप सेम आलाय…” मागच्या बाकांवर कुजबुज सुरूच होती.
“थॅंक्य गॉड ! आपला ग्रुप सेम आलाय…” मागच्या बाकांवर कुजबुज सुरूच होती.
आरव मात्र खुर्चीत रेलून निवांत बसला होता. एका हातात गाडीचे कि-चेन फिरवत तो खिडकीबाहेरचा पाऊस बघत होता.
मिहिरने त्याला कोपर मारला.
“ए लक्ष दे… नाहीतर पुन्हा कुणासोबत अडकशील.” मिहिर हळू आवाजात म्हणाला.
“मला काहीही चालतं रे बाबा…” आरव जांभई देत म्हणाला.
वैष्णवीने लगेच टोमणा मारला.
“हो, कारण शेवटी प्रोजेक्ट दुसरंच कुणीतरी करून देणार ना...”
सगळे हसू लागले.
सगळे हसू लागले.
आरवने फक्त मिश्किल हसू दिलं. त्यालाही अजूनपर्यंत माहिती नव्हतं…त्याची असॅगमेंट आणि
सबमिशन नेहमी वेळेवर पूर्ण होण्यामागे कोण आहे ते?
सबमिशन नेहमी वेळेवर पूर्ण होण्यामागे कोण आहे ते?
खुप शोधायचा प्रयत्न सुरूवातीला त्याने केला ,पण नंतर त्यालाच सवय पडून गेली आणि शोध थांबला..
“ग्रुप नंबर सिक्स…”
“वैष्णवी आणि अनिकेत.”
“येस!” अनिकेतने बाकावर टाळी मारली तसे सगळे हसू लागले.दोघेही मॅडम कडे गेले आणि साइन करून आले..
अनिकेत मुद्दाम मिहिरला चिडवून लागला..मिहिर याला धक्का देत चिडून बघू लागला.
"ग्रुप नंबर सेव्हन …” क्षणभर मॅडम थांबल्या.
“निरवी कुलकर्णी…”
तशी निरवीने मान वर केली.
“…आणि आरव मेहता.”मॅडम म्हणाल्या.
क्षणभर तिला ऐकलेलं खरं वाटलंच नाही, तिचे डोळे मोठे झाले.
हृदयाची धडधड अचानक वाढली होती.
वृंदाने तर लगेच तिचा हात पकडला.
हृदयाची धडधड अचानक वाढली होती.
वृंदाने तर लगेच तिचा हात पकडला.
“ए… खरंच तुमचा ग्रुप आहे!” ती उत्साहात कुजबुजली.
निरवी मात्र अजूनही स्तब्ध होती,
समोर मॅडम काहीतरी बोलत होत्या, क्लासमध्ये कुजबुज सुरू झाली होती…
पण तिच्या कानात काहीच पडत नव्हतं.फक्त एकच नाव डोक्यात घुमत होतं…
समोर मॅडम काहीतरी बोलत होत्या, क्लासमध्ये कुजबुज सुरू झाली होती…
पण तिच्या कानात काहीच पडत नव्हतं.फक्त एकच नाव डोक्यात घुमत होतं…
आरव.
ज्याच्याकडे ती लांबून बघायची…ज्याचं नाव नकळत तिच्या डायरीमध्ये उमटायचं..
तो आता तिचा प्रोजेक्ट पार्टनर होता.
तो आता तिचा प्रोजेक्ट पार्टनर होता.
तिची धडधड वाढली होती , ती तशीच उठून मॅडमजवळ गेली ...
खाली शिटवर साइन करू लागली..
दुसरीकडे मागच्या बाकावर मात्र वेगळंच वातावरण होतं.
“भाईईई…” मिहिरने आरवच्या खांद्यावर हात मारला.
“टॉपर मिळाली तुला!”
“टॉपर मिळाली तुला!”
तसे सगळेजण हसू लागले.
“निरवी?” आरवने हलक्या आवाजात नाव पुन्हा म्हटलं.
तोच त्याच लक्ष समोर निरवीकडे गेले जी मॅडम सोबत बोलत होती..
ती तिथून निघाली तोच तिची नजर आरवकडे गेली, जो तिलाच बघत होता...
तिने पटकन नजर चोरून घेतली आणि आपल्या जागेवर बसली.
तिने पटकन नजर चोरून घेतली आणि आपल्या जागेवर बसली.
"आरव..."मॅडमनी साइनसाठी त्याला आवाज दिला,
तो भानावर आला आणि उठून मॅडम समोर गेला..
निरवी खाली मान घालून बसली होती,
ती अगदी मॅडमच्या मागे असल्याने तो तिला बघत मॅडमशी बोलत होता...
निरवी खाली मान घालून बसली होती,
ती अगदी मॅडमच्या मागे असल्याने तो तिला बघत मॅडमशी बोलत होता...
मॅडमनी सगळ्यांचे ग्रुप अनाउन्स केले आणि दोन आठवड्यांनी प्रोजेक्ट टॉपिक
सांगायला सांगितले आणि निघून गेल्या.
क्लासमधून सगळेजण हळूहळू बाहेर पडत होते..कोणी आपल्या पार्टनरसोबत प्रोजेक्टबद्दल बोलत होते, तर कुणी अजूनही “मला हिच्यासोबत नाही करायचं…” म्हणत चेहरा पाडून फिरत होते.
वृंदा बॅग खांद्यावर घेत निरवीजवळ आली.
“मॅडम… काय फिलिंग आहे?” ती मिश्किलपणे म्हणाली.
“ गप्प बसं..काहीही बोलू नकोस…” निरवी डायरी बॅगमध्ये ठेवत म्हणाली.
“अग पण सिरियसली … आरव मेहता! पुर्ण कॉलेज ज्याच्यामागे फिरतं तो.”
निरवी काही बोलली नाही.तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता…
पण आतून मात्र मनात वेगळाच गोंधळ सुरू होता.
पण आतून मात्र मनात वेगळाच गोंधळ सुरू होता.
ती उठून उभी राहिली, सरळ वृंदाचा हात पकडला आणि बाहेर निघाली...
"अरे आरव, मिस.टॉपर तर निघून गेली की..." मिहिर डोक्याला हात लावून म्हणाला
आरव शांतपणे तिला जाताना बघतो,
"इट्स ओके..नंतर बघू चलो, आपल्याला प्रिन्सिपल सरांना पार्किंग संबंधित
आणि गेटवर पावसाने साठलेली पाण्याच्या समस्येबद्दल बोलायचं आहे.." आरव शांतपणे म्हणाला,
स्वतः उठून मस्त गॉगल डोळ्यांना लावला आणि आपल्या ग्रुप सोबत बाहेर पडला.
आणि गेटवर पावसाने साठलेली पाण्याच्या समस्येबद्दल बोलायचं आहे.." आरव शांतपणे म्हणाला,
स्वतः उठून मस्त गॉगल डोळ्यांना लावला आणि आपल्या ग्रुप सोबत बाहेर पडला.
इकडे निरवी आणि वृंदा दोघीही रिझल्ट बघून यांचे फोटो घरी पाठवून दिले
आणि गार्डनमध्ये बसून गप्पा मारत आपला डब्बा आणि स्नॅक्स खात बसल्या.
तोच बाजूच्या कॉरिडॉर मधून आरव आणि त्यांचा ग्रुप मस्त बिंदास , फुल अटीट्युडमध्ये प्रिन्सिपल सरांच्या केबिनकडे जात होते.
निरवीचं लक्ष आरवकडे गेलं ,हॅन्डसम, गुड लुकिंग तर होताच पण
त्याची स्टाईल तिला अजून जास्तच भुरळ घातल होती.
त्याची स्टाईल तिला अजून जास्तच भुरळ घातल होती.
ती शेवटपर्यंत माने वळून त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होती
"ओ निरवी मॅडम , समोर बघा आता..." वृंदा तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाली
"कशाला इतके कष्ट हा.. उद्यापासून रोज तर समोरासमोर असणार आहात हा.." वृंदा तिला चिडवत म्हणाली.
" शू्... गप्प कुठं पण कसं बोलतेस? कुणी ऐकलं तर गडबड होईल ना.." निरवी घाबरून तिचा हात पकडून धरत म्हणाली.
" ह्या एवढ्याला काय घाबरायचे...प्यार किया तो डरना क्या!आपल्या सल्लू भाईने सांगितले आहे..." वृंदा मस्त हातवारे करून म्हणाली.
"ओ सल्लू फॅन जागेवर या आणि जरा प्रोजेक्ट बद्दल काय ठरवलं आहे ते सांग.." निरवी तिला शांत करत म्हणाली.
" अरे यार , मी इथे दिलं की बात करत आहे ....हिची गाडी प्रोजेक्टवर अडकली आहे,
देवा! कसं होणार माझ्या जिजूच.." वृंदा नाटकी रडत दोन्ही हात उंचावून म्हणाली...
" अगं , काय करतेस ? आजूबाजूचे सगळे बघत आहेत.." निरवी तिचा हात खाली ओढत म्हणाली, आजूबाजूला बघून एक ऑकवर्ड स्माइल दिली.
देवा! कसं होणार माझ्या जिजूच.." वृंदा नाटकी रडत दोन्ही हात उंचावून म्हणाली...
" अगं , काय करतेस ? आजूबाजूचे सगळे बघत आहेत.." निरवी तिचा हात खाली ओढत म्हणाली, आजूबाजूला बघून एक ऑकवर्ड स्माइल दिली.
