भाग १
सकाळचे साडे आठ वाजले होते , MG रोडवर फुल ट्रॅफिक लागले होते...वरून पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता..
निरवी रिक्षात बसून होती, गेले चाळीस मिनिटात गाडी पुढे सरकत नव्हती,
कॉलेज गेट नऊ वाजता बंद झाले तर ..भीतीने शेवटी ती इथून पुढे चालत जाण्याचा निर्णय घेतला ..
कॉलेज गेट नऊ वाजता बंद झाले तर ..भीतीने शेवटी ती इथून पुढे चालत जाण्याचा निर्णय घेतला ..
रिक्षावाल्या दादांना पैसे दिले आणि आपली बॅग संभाळत तिने छत्री उघडून
ती गाड्यांमधून वाट काढत ती फुटपाथवर आली.
सगळीकडे हॉर्नचा आवाज ऐकू येत होता, कुणाची शाळेत तर कुणाची ऑफिसला
पोहचण्याची घाई लागली होती..
ती आजूबाजूला बघत समोर चालली होती,
मेंन चौकात पोहोचली तर मध्ये काहीजण भांडत होते...दोघांच्या भांडणाने मुंबईचा
एज्युकेशन हब एरिया पॅक करून टाकला होता..
मेंन चौकात पोहोचली तर मध्ये काहीजण भांडत होते...दोघांच्या भांडणाने मुंबईचा
एज्युकेशन हब एरिया पॅक करून टाकला होता..
ती नकारार्थी मान हलवत आपल्या वाटेने निघाली..पावसाचा जोर कायम होता..
कॉलेज जवळ पोहचली,ती छत्री घेऊन चालत होती ...
तोच एक स्पिडने कार आली आणि पाणी तिच्या अंगावर उडाले..
ती आश्चर्याने थक्क होऊन जाणाऱ्या गाडीकडे बघू लागली,
पुर्ण रस्ता संभाळत आली होती आणि नेमकं कॉलेजमध्ये पोहचल्यावर झाले ...
तिने वैतागून आपला अवतार बघितला.
परत समोर बघायचे गाडी निघून गेली होती, आता चिडून काय उपयोग म्हणत
ती काही क्षण तशीच थांबून राहिली.
लेक्चरचा टाइम झाला होता पण या अवतारात ती जावू शकत नव्हती,
ती नकारार्थी मान हलवत गर्ल्स कॉमन रूमकडे निघून गेली,
जाता जाता आपल्या मैत्रिणीला तिचा एक ड्रेस घेऊन यायला सांगितलं.
ती नकारार्थी मान हलवत गर्ल्स कॉमन रूमकडे निघून गेली,
जाता जाता आपल्या मैत्रिणीला तिचा एक ड्रेस घेऊन यायला सांगितलं.
"नशीबच ही अजून निघाली नव्हती , नाही तर आज असाच दिवस काढावा लागला असता..." ती स्वतः शी पुटपुटली आणि कॉमन रूममधील बेंचवर बसून घेतले.
ती बेंचवर बसली होती.ओले केस, पाण्याने भिजलेला ड्रेस,
आणि हातात अजूनही थरथरणारी छत्री होती.
आणि हातात अजूनही थरथरणारी छत्री होती.
कॉमन रूममध्ये चाहूल होती, पण आवाज कमी.
काही मुली मेकअप करत होत्या, काही कपडे बदलत होत्या…पण
निरवी मात्र शांत बसून निरिक्षण करत होती.
काही मुली मेकअप करत होत्या, काही कपडे बदलत होत्या…पण
निरवी मात्र शांत बसून निरिक्षण करत होती.
ती खिडकीतून बाहेर पाहत होती.पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता.
“आजच का हे सगळं व्हायला हवं होतं…” ती मनातच पुटपुटली.
"रिझल्ट लागला असेल.."
“आजच का हे सगळं व्हायला हवं होतं…” ती मनातच पुटपुटली.
"रिझल्ट लागला असेल.."
ती खिडकीतून पाऊस बघत थांबली...डोळे मिटून घेतले,
पावसाच्या सरींसोबत थंड वारा वाहत होता..मनाला सुखावून जात होते..
बंद डोळ्यांमागे अचानक एका व्यक्तीचा चेहरा तरळून गेला...
व्हाइट कलर शर्ट, कोपऱ्यापर्यत दुमडलेल्या भाई.., वरचे तीन बटण उघडे... वाऱ्यावर उडणारे काळेभोर केस , डोळे नशीले आणि कडक स्माइल बघून जीव त्यांच्यावर फिदा झाला होता.
तिच्या चेहऱ्यावर हास्य तरळले, लाली चढली होती....
तोच-
तोच-
"निरवी मॅडम... जाग्या व्हा," तिची मैत्रीण बाजूला उभे राहून तिला हालवत म्हणाली
तशी निरवी भानावर आली,"अं..." ती प्रश्नार्थक नजरेने तिला बघू लागली.
"रात्री ठिक आहे स्वप्न बघतेस.. आता दिवसा ढवळ्या कुणाच्या स्वप्नात हरवला होता हा..." ती हाताने खुणावत म्हणाला.
तशी निरवी हसून नकारार्थी मान हलवते आणि मान खाली घातली
"ओहो... हा लाजरा साजरा मुखडा बघून मला कळलं बरं
तुम्ही कुणाच्या स्वप्नात हरवला होता.." तिने हळूच निरवीचा चेहरा हाताने वर उचलून म्हणाली.
तशी निरवीच्या गालावर लाली चढली...
"ड्रेस आणला का?" निरवी तिला बघून म्हणाली.
"घ्या , उत्तर कधी देवू नका...विषय कसा बदलायचा तुझ्याकडून शिकावं.."वृंदा ड्रेसची पिशवी तिच्या हातात घेत म्हणाली.
"आलेच.." निरवी वॉशरूमध्ये निघून गेली.
काही वेळाने निरवी छानसा प्लाझो टॉप घालून बाहेर आली,
केस जरा निट केले आणि दोघीही बाहेर पडल्या.
दोघीही पहिले नोटिस बोर्ड कडे निघाल्या रिझल्ट लागला होता..
पासिंगचे टेन्शन दोघींना नव्हते पण तरी आपला स्कोअर बघण्यासाठी गेल्या.
नोटिस बोर्ड समोर स्टुडंट्सची गर्दी जमली होती,
कुणाची टाचा उंचावून बघण्याची कसरत चालू होती, तर कोण आपला हात लांबवून
फोनमध्ये फोटो घेण्याच्या प्रयत्नात होते.....
"यार सगळ्यांना आताच रिझल्ट बघायचा आहे का?" वृंदा गर्दी बघून म्हणाली.
"हो ना , एरवी कुणी नसतं? दुसऱ्या लेक्चरचा टाइम होईल...
आता काय करायचं.."निरवी चेहऱ्यावर बोट धरून म्हणाली.
"रिझल्ट आता नाही बघितला तर लेक्चर मध्ये मनच नाही लागणार,
त्यापेक्षा आपण बघूनच जावू.."वृंदा टेन्शन घेऊ म्हणाली.
"हम्म ..चल " निरवी आपला फोन बॅगमध्ये टाकून , बॅग निट खांद्यावर घट्ट पकडली
आणि बोर्डच्या एका बाजूने डोकावून बघण्याचा प्रयत्न करत होती..
वृंदाही टाचा उंचावून तर कधी हलक्या उड्या मारत बघण्याचा प्रयत्न करत होती,
"त्यांचें झाले त्यांनी मागे व्हा ना , आम्हाला ही रिझल्ट बघायचा आहे.." वृंदा म्हणाली पण कुणी ऐकत नव्हते...
"ऐ सरका सरका..."एक मुलगा जोरात ओरडत आला,
सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले.. एक जण फास्ट चालत बोर्ड जवळ येत होता.
सगळे वळून बघत होते , तोच त्याने पुढे होऊन त्याच्या फोनमध्ये धडाधड पाच -सहा फोटो काढले आणि सरळ निघून गेला..
सगळेजण त्याला बघू लागले ,इतकावेळ ते तिथं थांबून वेड्यासारखी वाट बघत होते ...
आणि हा मध्येच घुसून निघून पण गेला..
पहिले लेक्चर संपल्याची बेल झाली तशी निराश चेहऱ्याने निरवी गर्दीतून बाहेर पडली, वृंदा बाहेरच उभी होती.
"जावू दे ,दुसरे लेक्चर करून नंतर येवू आपण .." निरवी घामाने भिजलेला चेहरा पुसत म्हणाली.
"हम्म , चला.."वृंदा पाय आपटत क्लास रूमकडे निघाली.
दुसरीकडे , चार -पाच जणांचा ग्रुप कॅन्टीन मध्ये जमला होता,हातात एक एक कडक कटींग चहा आणि बन- मस्का होते..
" हॅलो गाइज..." तो बाजूच्या टेबलची खुर्ची जवळ घेऊन बसला.
" ए छोटू, एक मस्त कडक कटिंग दे.." त्याने हात उंचावून ऑर्डर दिली
"काय साहेब आता आले का?" एक जण म्हणाला.
" गप्प रे गौरव ,तुझ्यासारखा अकरा अकरा वाजेपर्यंत लोळत पडत नाही मी.." तो कॉलर टाईट करत म्हणाला.
" हो माहिती आहे राहू दे... कुठून आला ते सांग," दुसरा मित्र म्हणाला.
" आता कसं कामाचं बोलला, अरे भाई रिझल्ट लागला ना आज...मग काय म्हणटलं बघाव, काय दिवे लागले आहे?" तो गरम चहाचा कप हातात धरून म्हणाला
" बघायला गेलो ते पुर्ण कॉलेज लेक्चर सोडून रिझल्ट बघायला जमलं होतं ," तो म्हणाला
"काय मिहिर, नुसती गर्दी बघून परतला का?" ती म्हणाली
"गेल्या सरशी सगळ्यांचा रिझल्ट बघून यायचं की.."
" हो वैष्णवी देवी माफी असावी हा..," तो नाटकी आवाजात हसत जोडून म्हणाला.
"काय आहे ना गर्दी इतकी होती, की तिथं थांबून सगळ्यंचा रिझल्ट बघायचा म्हणजे
जरा अवघड काम होतं , " तो चहाचा घोट घेत म्हणाला
"म्हणून म्हटलं जरा आपल्या जनरेशनला साजेस काम करावं .
कॉलेज करत नाही आपण सुरूवात करावी.." तो सस्पेन्स तयार करत म्हणाला.
कॉलेज करत नाही आपण सुरूवात करावी.." तो सस्पेन्स तयार करत म्हणाला.
" ए मिहिर, लवकर सांगतो का? देवू एक ठेवून.." तो म्हणाला.
" आरव सर कशाला आपल्या हाताला कष्ट देत आहात, त्यापेक्षा जरा हा फोन पकडा...
आणि सगळ्यांचे रिझल्ट जाहीर करा.." तो आपला फोन आरवच्या हातात सोपावून म्हणाला..
आणि सगळ्यांचे रिझल्ट जाहीर करा.." तो आपला फोन आरवच्या हातात सोपावून म्हणाला..
"तु नो स्मार्ट वर्क..."तो अभिमानानं म्हणाला,तसे सगळ्यांना याने काय केले याचा अंदाज आला...
आरव निट एक एक फोटो झूम करून बघत होता, सगळेजण पुर्ण एकाग्रतेने त्याला बघत होते.
शेवटी बघून झाल्यावर त्याने मान वर केली,
"सो, गाइज...मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे
की आपण सगळेजण चांगल्या मार्कने पास झालो आहोत..." काही जण टाळ्या तर दोघेजण टेबल वाजवू लागले..
की आपण सगळेजण चांगल्या मार्कने पास झालो आहोत..." काही जण टाळ्या तर दोघेजण टेबल वाजवू लागले..
"चलो , पार्टी करू..." अनिकेत म्हणाला.
"ए अन्या लगेच पार्टी काय हा.. नुसते पास झालो आहोत , विथ डिस्टिंक्शन कधी मिळणार.." आरव त्याला बघून म्हणाला.
"बघू नंतर.." अनिकेत बिंदासपणे म्हणाला.
" हो पार्टीच पण नंतर बघू ..कुलकर्णी मॅडम फायनल प्रोजेक्ट ग्रुप डिसाइड करणार आहेत.." वैष्णवी म्हणाली.
"हो यार मी विसरलोच होतो, चला जावू या .." सगळेजण उठत म्हणाले.
"आपण सगळे एकाच ग्रुपमध्ये यायला पाहिजे," मिहिर म्हणाला
"हो ना म्हणजे , त्या प्रोजेक्टचा आणि तुझा दूर दूर काही संबंध यायला नको.." वैष्णवी लगेच टोमणा मारत म्हणाली.
सगळेजण हसू लागले , मिहिर रागाने तिला बघत होता..
"चल सोड रे राग.."आरव त्याच्या खांद्यावर हात टाकून चालत म्हणाला.
*********
क्रमशः
कसा वाटला भाग ते नक्की सांगा.
अशाच नवीन कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि समीक्षा द्यायला विसरू नका..
कसा वाटला भाग ते नक्की सांगा.
अशाच नवीन कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि समीक्षा द्यायला विसरू नका..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
