Login

व्हेन रेन फेल्ट लाइक यू...भाग 7

जेव्हा तो पाऊसासारखा वाटू लागला...


भाग 7


कॉरिडॉरमध्ये नेहमीसारखाच गोंधळ सुरू होता. कुणी मित्रांसोबत फोटो काढत होतं, कुणी असाईनमेंटबद्दल बोलत होतं तर कुणी फक्त कॅन्टीनच्या दिशेने निवांत चाललं होतं.
आरव आणि निरवी दोघंही लायब्ररीतून बाहेर पडले.


निरवीच्या हातात डायरी आणि पाण्याची बाटली होती… तर आरव निवांतपणे तिच्या बाजूने चालत होता.
दोघांमध्ये अजूनही हलकंसं अवघडलेपण होतं.

निरवीची नजर समोर होती,  पण मध्ये मध्ये नकळत ती आरवकडे बघत होती.
कॉलेजमध्ये इतक्या मुली त्याच्याशी सहज बोलायच्या पण स्वतः मात्र त्याच्या शेजारी चालतानाही एवढी नर्व्हस का होत होती हे तिलाच समजत नव्हतं.


“इतकी शांत का असतेस तू?” आरव अचानक चालता चालता म्हणाला.

तशी निरवी त्याच्याकडे बघू लागली.

“म्हणजे?”

“म्हणजे… क्लासमध्ये शांत, लायब्ररीमध्ये शांत… फोनवरही शांत.” तो मिश्किलपणे म्हणाला. 
“तुझं ‘नॉर्मल मोड’ आहे का हा?”

तसं तिच्या ओठांवर हलकंसं हसू आलं.

"नाही तर..” ती पहिल्यांदाच थोडी सहजपणे म्हणाली, 
“तू कायम बोलत असतोस का?”

आरव दोन सेकंद तिच्याकडे बघत राहिला आणि मग हसला.
“ओह्ह… म्हणजे मॅडम ऑब्झर्व्ह पण करतात आपल्याला?”

“नाही…” ती पटकन म्हणाली, 
“म्हणजे… कॉलेजमध्ये सगळेच तुला ओळखतात...”

“अच्छा…” तो मुद्दाम मान हलवत म्हणाला, 
“म्हणजे तू पण ओळखतेच...”

तसं निरवी पुन्हा गोंधळली.

“मी तसं नाही म्हणाले…”

“रिलॅक्स…” तो हसत म्हणाला,
 “मी फक्त चिडवत होतो.”

ते दोघं कॉरिडॉरमधून पुढे चालत होते. इतक्यात समोरून वृंदा आणि दुसरी मैत्रीण येताना दिसल्या.
वृंदाची नजर दोघांवर गेली आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर मोठ्ठं स्माईल आलं.

तिने दूरूनच निरवीकडे बघत दोन्ही भुवया उंचावल्या आणि हाताने “वॉव” असा इशारा केला.
निरवीचे डोळे मोठे झाले.

“वृंदा…” ती हलक्या आवाजात दात ओठ खात पुटपुटली.

पण वृंदा थांबणाऱ्यांपैकी नव्हती.

तिने पुन्हा मिश्किलपणे हाताने “छान आहे…” असा इशारा केला.
तशी निरवीने तिला डोळे मोठे करून दटावलं.

“बस कर…” तिचे ओठ न हलवता फक्त चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसत होतं.
आरवला काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं.

“काय झालं?” तो हलकंसं हसत म्हणाला.

“काही नाही…” निरवी पटकन म्हणाली.

 ती समोर उभ्या वृंदाकडे वैतागून बघत होती.
“ही ना  कधी सुधारणार नाहीस…” ती  हळूच पुटपुटली 

"काय म्हणालीस का?" आरव तिला बघत म्हणाला.

" नाहीतर.." निरवी समोर बघून म्हणाली.
तो हलकच हसला आणि समोर चालू लागलं..


“अगं पण दोघं एकत्र किती क्युट दिसतायत…” वृंदा हळू आवाजात म्हणाली.

“हो ना..” तिची दुसरी गालावर हात ठेवून म्हणाली 

"पण निरवी बघ कसले एक्स्प्रेशन देत आहे" ती वृंदाला म्हणाली ..

समोर निरवी तिला रागाने बघत होती..

तशी वृंदा लगेच दोन्ही हात  कानाला लावून म्हणाली,
“ओके ओके… काही बोलत नाही.”


निरवी नकारार्थी मान हलवली आणि आरव सोबत कॅन्टीनला निघून गेली 
कॅन्टीनमध्ये नेहमीप्रमाणे गोंधळ होता… कटिंग चहाचा वास, मोठमोठ्याने हसणारी मुलं, प्लेट्सचा आवाज  पूर्ण वातावरण जिवंत वाटत होतं.

आरवने आत नजर फिरवली.

“तिकडे बसूया?” त्याने कोपऱ्यातल्या कम्पॅरेटिवली शांत टेबलकडे बोट दाखवत विचारलं.
“हम्म…” निरवीने मान हलवली.

दोघं जाऊन समोरासमोर बसले.निरवीने डायरी टेबलवर ठेवली…
पण तिची नजर अजूनही पूर्णपणे त्याच्याकडे जात नव्हती.

“सो…” आरव खुर्चीत रेलून म्हणाला, 
“फायनली प्रोजेक्ट पार्टनर्स.”

तिने हलकंसं स्माईल केलं.
“हम्म…”

“काय घेणार?” तो तिच्याकडे बघत म्हणाला.

निरवीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.

“खायला काय सांगू? ”तो  तिला बघत म्हणाला.

ती इकडेतिकडे नजर फिरवू लागली,
"काय काय मिळते इथे?" तिने अवघडून प्रश्न केला.

आरव तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला.

"काय झालं?" निरवी आरवचा चेहरा पाहून म्हणाली.

"तु कधी कॅन्टीनला  आली नाहीस का?" तो तिला प्रश्न विचारतो.

"नाही," ती खाली मान घालून हळू आवाजात म्हणाली.

आरव काही सेकंद तिच्याकडे बघतच राहिला.
“सीरियसली?” त्याच्या आवाजात खरंच आश्चर्य होतं.

निरवीने हलकंसं मान हलवली.
“म्हणजे… क्लास संपला की मी सरळ घरी किंवा लायब्ररीत जाते.”ती हळूच म्हणाली.

“वा…” तो नकली गंभीर चेहरा करत म्हणाला,
“म्हणजे आमच्या कॉलेजच्या फेमस कॅन्टीनचं दर्शन आज पहिल्यांदाच होतंय मॅडमना.”

तसं तिच्या ओठांवर नकळत छोटंसं हसू आलं.

“इतकं काही स्पेशल नाही वाटत…”ती आजूबाजूला नजर फिरवली म्हणाली.

“थांब… दोनदा इथला चहा आणि वडा पाव खाल्लास ना, मग कळेल.” तो आत्मविश्वासाने म्हणाला.

निरवी हलकंसं हसली.आरवने लगेच हात वर करत ऑर्डर दिली,
“दोन कटिंग… आणि दोन वडा पाव.”

“अरे नको…” निरवी पटकन म्हणाली,
“मी फक्त चहा घेईन.”


“का?” तो भुवया उंचावत म्हणाला,
“इथला वडा पाव खाल्ला नाही तर कॉलेज लाईफ अपुर्ण समजतात.”


“तू प्रत्येक गोष्ट एवढी ड्रॅमॅटिक बोलतोस का?” ती नकळत हसत म्हणाली.

“हो, लोकांना एंटरटेन ठेवणं ही समाजसेवा आहे.” तो अभिमानाने म्हणाला.

तसं ती पुन्हा हसू लागली.आरव दोन सेकंद तिच्याकडे बघत राहिला.ती हसताना वेगळीच दिसत होती… शांत, साधी… पण खूप सुंदर.

“काय?” निरवी त्याच्याकडे बघत म्हणाली.

“काही नाही…” तो पटकन दुसरीकडे बघत म्हणाला,
“आता कुठे तु नॉर्मल वाटत आहे..”

“म्हणजे?” ती गोंधळून म्हणाली.

“म्हणजे सुरुवातीला मला वाटलं होतं तूला खुप अटीट्युड असेल”तो तिला म्हणाला.

“मी?का?” तिचे डोळे मोठे झाले.

“हम्म… कारण तू कुणाशी बोलतच नाहीस.”तो लगेच म्हणाला 

ती काही क्षण शांत राहिली.
“मी… पटकन कंफर्टेबल होत नाही कुणासोबत.” ती खाली बघून म्हणाली.

आरवने तिच्याकडे पाहिलं.
तिच्या आवाजात हलकीशी प्रामाणिकता होती..

इतक्यात त्यांच्या टेबलवर चहा आणि वडा पाव येऊन ठेवला गेला.
कटिंगच्या वाफेसोबत आलेला वेलचीचा हलका सुगंध वातावरणात पसरला.

“चल…” आरव कप तिच्यासमोर सरकवत म्हणाला,

निरवीने कप हातात घेतला.

“थँक्यू…”

“ मेंशन नॉट, पार्टनर.” तो डोळा मारत म्हणाला.
तशी ती पुन्हा अवघडली.

आरवला तिचं ते अवघडली होणं आता मजेशीर वाटायला लागलं होतं.

“तू एवढी नर्व्हस का होतेस?” तो चहा पीत म्हणाला.

“मी नर्व्हस नाही होत.” ती पटकन म्हणाली 

“अच्छा?” तो हसल,
“मग कप एवढा घट्ट का पकडलायस?”

निरवीने पटकन कपाकडे पाहिलं आणि हलकेच पकड सैल केली.
तसं आरव मोठ्याने हसू लागला.

“आरव!” ती वैतागल्यासारखी म्हणाली.

“ओके ओके… सॉरी.” तो हसत म्हणाला,
“पण तू क्यूट एक्स्प्रेशन देतेस.”

हे ऐकताच तिचा चेहरा पुन्हा गुलाबी झाला.ती पटकन नजर खाली करून चहा पिऊ लागली.
आणि आरव… तिच्याकडे बघत हलकंसं स्मित करत बसला होता.

"घ्या, मॅडम एकदा हा फेमस वडा पाव खावून बघा.." आरव हसून म्हणाला.
तिने होकारार्थी मान डोलावली.

निरवीने वडा पावचा छोटासा घास घेतला.

“कसं आहे?” आरव उत्सुकतेने म्हणाला.

तिने दोन सेकंद काही न बोलता चावलं आणि मग हलकंसं मान हलवली.
“छान आहे…” तिने हाताची बोटे दाखवू म्हणाली 

“बघितलंस? मी काही उगाच फेमस म्हणत नव्हतो” तो स्वतःचा वडा पाव उचलणार इतक्यात निरवीने पुन्हा एक घास घेतला.

 पण काही सेकंदांनी तिच्या चेहऱ्यावर हलकासा त्रास दिसू लागला.ती अचानक थांबली.
आरवने लगेच लक्षात घेतलं.

“काय झालं?”तो तिला बघत म्हणाला 

निरवीने पटकन पाण्याची बाटली उघडली.

“काही नाही…” ती घाईघाईने पाणी पीत म्हणाली.

पण तिचा आवाज थोडा वेगळा वाटत होता.तिने हलकंसा हात मानेजवळ नेला.

“निरवी?” आरव आता नीट तिच्याकडे बघत म्हणाला.
तिच्या चेहऱ्यावर हलके लालसर रॅशेस दिसायला लागले होते.

"आपण प्रोजेक्ट टॉपिक ठरवायचा का?" ती घाईत म्हणाली.

"अगं हो , पहिले वडापाव तर संपव.." आरव दुसरा घास घेत म्हणाला.

"हो पण  खात खात ठरवू.." तिने वडापाव खाली ठेवून दिला आणि डायरी उघडली.

" हे बघ मी काही टॉपिक बघितले आहे, तु सांग कुठल्या टॉपिकवर प्रोजेक्ट करायचा.." तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पसरले होते.. मानेवर खाज सुटत होती.. टेबलखाली ती एक हात दुसऱ्या हातावर गस्त होती.

आरवला तिच्या आवाजात बदल जाणवत होता ,त्याने तिची डायरी हातात घेतली..
स्वच्छ सुरेख अक्षरात तिने चार टॉपिक निवडले होते , आताच्या जनरेशनमध्ये जाणवणाऱ्या समस्या तिने घेतल्या होत्या ..

" निरवी, तु ओके आहेस ना" आरव तिचा चेहरा बघून म्हणाला.

"हो " ती बळच हसून म्हणाली.

" मला वाटतं आपण 'स्लीप सायकल अँड अकॅडेमिक परफॉर्मन्स' त्यासोबत हेल्थ पण घेऊ.." तो एक विषयावर बोट ठेवून म्हणाला.

" गुड मला चालेल.." ती हसून म्हणाली.
पण पुढच्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर पुन्हा डिस्कमफर्ट उमटलं.तिने नकळत मानेला हात लावला.
आरवचं लक्ष पुन्हा तिच्याकडे गेलं.

“निरवी…” तो थोडा पुढे झुकत म्हणाला, 
“तुला खरंच काही होत नाहीये ना?”

“आरव, रिलॅक्स…” ती पटकन म्हणाली, 
“मी ठीक आहे.”
तिचा आवाज नॉर्मल ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती… पण श्वास थोडासा जड वाटत होता.


क्रमशः

कसा वाटला भाग ते नक्की सांगा,
पुढील भाग लवकर येतील


तुमच्या समीक्षा कळवायला विसरू नका


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →