मीना : (मीनाच्या हातात शॉपिंगच्या पिशव्या) सीमाला बघून. हॅलो!
सीमा : हाय!
मीना : "कशी आहेस?"
सीमा : मी छान. तू?
मीना : मी मस्त. शॉपिंग माझा आवडता विषय; त्यामुळे खूश आहे अगदी. (शॉपिंग बॅग उंच उडवत म्हणते.)
मीना : तुझी झाली का वडपूजनाची तयारी?
भिशी ग्रुपच्या मैत्रिणी मिळून, एकत्र वड पूजायला जाणार आहोत.
पैठणी नेसायची, ठरलंय. मेसेज वाचला असेलच तू.
भिशी ग्रुपच्या मैत्रिणी मिळून, एकत्र वड पूजायला जाणार आहोत.
पैठणी नेसायची, ठरलंय. मेसेज वाचला असेलच तू.
सीमा : हम्म! (म्हणत होकारार्थी मान डोलावते)
मीना : सगळीकडे मस्त, सेल सुरू आहेत यार!
मोहच आवरत नाही.
किती घेऊ नि किती नको असं झालंय.
एकाचवेळी भरपूर खरेदी उरकून टाकली.
हरतालिका, गौरी, गणपती, नवरात्रीत नेसायला नऊ रंगाच्या नऊ साड्या.
"कोणती साडी नेसू?" यक्षप्रश्न, तूर्तास तरी सुटला. (तिने सुस्कारा सोडला)

सीमा : अरे वाह! मस्तच.
मीना : तुझी झाली का साड्यांची खरेदी.
नसेल झाली तर.. चल उद्या!
मी जाणारे उद्या पुन्हा.
नसेल झाली तर.. चल उद्या!
मी जाणारे उद्या पुन्हा.
सीमा : खरेदीला जाणार आहेस, पुन्हा. (आश्चर्यकारक भाव चेहऱ्यावर आणत विचारते)
मीना : हो अगं, नवरात्रीत नेसायला, पिकल्या जांभळाच्या रंगाची, गडद जांभळी साडी हवी होती मला.
कच्च्या जांभळाचा, फिक्का रंग मिळाला.
बघते उद्या गडद रंगाची मिळाली तर.....
एक-दोन साड्या, जास्त घेऊन ठेवेन म्हणते, दिवाळीसाठी.
शिवाय ब्लाउज शिवायला टाकायचंयं, मैचिंग बांगड्या, ज्वेलरीसाठी जावं लागणार.
सांग चलतेस का उद्या?
दोघी मिळून खरेदी करू.
तुझी पण खरेदी होईल आणि मला सोबतही होईल.

सीमा : नको (नकारार्थी मान डोलावते)
तू जा.
मला नको आहेत साड्या.
आधीच कपाट गच्च भरलंयं साड्यांनी.
त्याच नेसायला जमेना हल्ली.
यावर्षी, ठरवलंयं नकोच साड्यांची खरेदी.
तू जा.
मला नको आहेत साड्या.
आधीच कपाट गच्च भरलंयं साड्यांनी.
त्याच नेसायला जमेना हल्ली.
यावर्षी, ठरवलंयं नकोच साड्यांची खरेदी.
मीना : अगं, पण त्या जुन्या साड्या.
आधी नेसल्या असशील ना तू.
त्याच त्या साड्या नेसायचा कंटाळा नाही का गं येत.
शिवाय फोटो, व्हिडिओतही त्याच दिसतील? (तिने नाकतोंड एक केलं)
आजकाल तर साड्या खरेदीसाठी, दुकानातसुद्धा जावं लागत नाही.
ऑनलाइन, डोअर स्टेप डिलिव्हरी अवैलेबल असते, डायरेक्ट पार्सल हातात.

सीमा : ते खरं असलं तरी, मला नकोच आहेत साड्या.
उशिरा आलेलं शहाणपण समज हवं तर; पण आता मी ठरवलंय.
उगाच साड्यांवर वायफळ खर्च करायचा नाही.
आवश्यक तेवढ्याच आणि आवश्यक तेव्हाच साड्या खरेदी करायच्या.
ट्रेंडच्या नावावर, कपाटात साड्यांची गर्दी नको. (तिने स्पष्ट मत मांडलं)

मीना : नवीन साड्या घेतल्या की जुन्या साड्या कलटवायच्या गं इकडे तिकडे.
काही नाही तर भांडी घ्यायची. मग नाही होत गर्दी.
काही नाही तर भांडी घ्यायची. मग नाही होत गर्दी.
सीमा : नव्या साड्यांवर ती भांडी वगैरे घ्यायला, जमेना बाई मला. मनाला पटेना अजिबात.
मोजक्या पण आठवणीत जपता येतील अशा साड्या असाव्या कपाटात.
उगाच पसारा नको वाटतो.
तसंही, माझ्या कपाटात, त्या रीळच्या भानगडीत घेतलेल्या मोजक्या साड्या सोडल्या तर, प्रत्येक साडीची एक कहाणी आहे.
मोजक्या पण आठवणीत जपता येतील अशा साड्या असाव्या कपाटात.
उगाच पसारा नको वाटतो.
तसंही, माझ्या कपाटात, त्या रीळच्या भानगडीत घेतलेल्या मोजक्या साड्या सोडल्या तर, प्रत्येक साडीची एक कहाणी आहे.
मीना : काय?
साड्यांची कहाणी, म्हणजे?
साड्यांची कहाणी, म्हणजे?
सीमा : साखरपुडा, लग्न, डोहाळजेवण, लेकाच बारस, वाढदिवस, भावा-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने घेतलेल्या, आईच्या साड्या.
त्यात भर म्हणजे नवऱ्याने आवडीने घेऊन दिलेल्या... साड्यांच्या गोड आठवणी गं.
त्या आठवणीत गुंतलेलं मन, साडीची गोष्ट सांगते. (सीमाने पटवून सांगितलं)
त्यात भर म्हणजे नवऱ्याने आवडीने घेऊन दिलेल्या... साड्यांच्या गोड आठवणी गं.
त्या आठवणीत गुंतलेलं मन, साडीची गोष्ट सांगते. (सीमाने पटवून सांगितलं)
मीना : साड्यांची कहाणी, प्रकरण मस्तच आहे गं.
सीमा : होय... त्यानिमित्ताने जुन्या आठवणी जाग्या होतात आणि नवीन तयार होतात भविष्यात आठवणीत जगण्यासाठी.
मीना : अगं सोन बघितलंस का? थेट आभाळ गाठलं सोन्याने.
एवढी वर्ष या साड्यांवर खर्च करण्यापेक्षा, बचत करून सोन्या चांदीची खरेदी केली असती तर.. आज किती फायद्यात असतो आपण.
एवढी वर्ष या साड्यांवर खर्च करण्यापेक्षा, बचत करून सोन्या चांदीची खरेदी केली असती तर.. आज किती फायद्यात असतो आपण.
सीमा : आत्ता कसं, अगदी मनातलं बोललीस बघ तू.
मी तरी ठरवलंय, यापुढे साड्यांवर वायफळ खर्च करायचा नाही.
रीळसाठी साड्या खरेदी करून, मिरवण्यात कसलं आलं शहाणपण.
मी तरी ठरवलंय, यापुढे साड्यांवर वायफळ खर्च करायचा नाही.
रीळसाठी साड्या खरेदी करून, मिरवण्यात कसलं आलं शहाणपण.
मीना : अगं पण रीळ म्हणजे आनंद, उत्साह. परिवर्तन काळाची गरज आहे. बदलाशी तर जुळवून घ्यावंच लागेल. ट्रेंड फॉलो नाही केले तर, जमान्या मागे असू आपण.
सीमा : मीनाच ऐकून, फक्तच मान हलवते.
मीना : असो, चल बाय, निघते आता.
भेटू वडपूजनाला. (मीना निघून जाते)
भेटू वडपूजनाला. (मीना निघून जाते)
मीना : माझी साड्यांची शॉपिंग... बापरे, साड्या खरेदीत पंधरा हजार खर्च झाले झाले. ही शॉपिंग वेड लावेल एक दिवस मला.(साड्या बघून आनंद तर शॉपिंग बिल बघून, मीनाचा चेहरा पडतो)
सीमा : मीना म्हणते तेही बरोबरच आहे.
रीळ म्हणजे आनंद, उत्साह.
वडपूजनाच्या रीळमध्ये सर्वांच्या नवनव्या साड्या असतील. (सीमा विचारात पडते, लगेच मोबाईलवर नंबर डायल करते आणि मोबाईल कानाला लावते)
"हॅलो ताई!"
तुझ्या दोन-चार साड्या, हव्या आहेत मला. तुझी राणी कलरची पैठणी, अगदी आठवणीने पाठव बरं का.
वडपूजेला यावेळी तुझी पैठणी नेसेन म्हणते.

आणि हो ताई, तुला माझ्या साड्या हव्या असतील तर तसंही सांग. मी तुझ्यासाठी माझ्या साड्या पाठवते. तू पण यावर्षी माझी महेश्वरी नेस वडपूजनाला. चल आपण आपल्या साड्या अदलाबदली करू.' म्हणत फोन ठेवते.
(ती मनात पुटपुटते. रीळमध्ये आता नवीन साडीही दिसेल आणि ट्रेंड पण फॉलो होईल. तसंही मागच्या वर्षीपासून ठरवलंय, वडाला बचाबचा धागा गुंडाळायचा नाही. वडाला फेऱ्या मारायच्या आणि नमस्कार करायचा. मैत्रिणीबरोबर रीळ मात्र बनवायची आहे मला)
बदलाची सुरुवात आपल्यापासून असावी, म्हणत गालातल्या गालात गोड हसते. (ताईची साडी नेसायला मिळणार, समाधानाने तिचा चेहरा प्रफुल्लित होतो.)
शुभांगी मस्के...