राधिका बाळा वाईट नको वाटून घेऊस. पण काल स्वातीच्या लग्नात तू पाकिटात फक्त १०० रुपये टाकलेस हे शोभत नाही गं. इतरांच जाऊदे पण तुझी सख्खी बहीण ना ती. अश्याने तिच्या सासरी आपली मान खाली जाते बेटा. आईने राधिकाच्या उत्तराची वाटही न पाहता फोन ठेवून दिला.
आईचं बोलणं ऐकून राधिका कोड्यात पडली.
कालच तिच्या धाकट्या बहीणीचं लग्न पार पडलं. वस्तू देण्यापेक्षा पैसे दिलेले बरे असे म्हणून तिने पाकिटात २००० टाकले होते. पण मग आई का अशी म्हणाली ?
तिने तडक आपल्या बहिणीला फोन लावून खात्री केली त्यावर बहिणीनेही सारखंच उत्तर दिलं.
राधिकाने शरमून तिची माफी मागितली.
यावर बहिणीनेही मी सांभाळून घेतलं आहे ताई म्हणत तिला धीर दिला.

फोन ठेवताच राधिका कालचा प्रसंग आठवू लागली . तिने स्वतःहून मोजून पाचशेच्या ४ नोटा व्यवस्थित पाकिटात बंद केल्या होत्या.
शेवटी बराच वेळ विचार केल्यानंतर तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
फक्त १० मिनिटांसाठी आपली पर्स सासूबाईंकडे देऊन ती दुसऱ्या कामात व्यस्त झाली होती.

नक्कीच हे काम सासूबाईंचे असणार याची तिला खात्री पटली कारण तिच्या सासूबाई होत्याच तश्या व्यवहारी.
समोरची व्यक्ती किती आणि काय भेटवस्तू देतेय यानुसार त्या तशीच वस्तू किंवा आहेर परत करत.
एकदा शेजारच्या मुलीच्या वाढदिवसाला राधिकाने एक सुंदरसा फ्रॉक घेतला होता यावर सासूबाईंनी तिला सुनावले होते.
काय गरज आहे एवढा महागातला फ्रॉक घ्यायची ?
अहो आई महाग कुठे ५०० रुपयांचा तर आहे फक्त . आणि कपडे म्हटले की तेवढा खर्च तर आलाच ना? राधिकाने आपली बाजू मांडली.

अगं आपल्या मिनीच्या वाढदिवसाला त्यांनी फक्त ५० रुपयांच चॉकलेट दिलं होतं विसरलीस का ? आली मोठी फ्रॉक घेणारी . ते काय नाही तू पण चॉकलेट दे आणि हा फ्रॉक परत कर.
शेवटी राधिकाने सासूबाईंच्या मनासारखं केलं तेव्हाच त्या शांत झाल्या होत्या.

ती तडक सासूबाईंच्या खोलीत गेली आणि त्यांना जाब विचारला.
हो मीच काढले पाकिटातून २००० आणि १०० ठेवून दिले. कारण मला माहित होतं तू जास्त पैसे टाकणार आणि तसही तुला किती वेळा सांगायचं की समोरून जशी भेट येईल तशीच परत करायची?
सासूबाईंनी शांतपणे उत्तर दिलं.

माझ्या सख्ख्या बहिणचं लग्न होतं ते. यात कसला व्यवहार पाहताय सासूबाई ? नाती आणि प्रसंग महत्वाचे नाहीत का ?
तुमच्या या हरकतीमुळे तिला सासरी काय वाटलं असेल याची कल्पना आहे का तुम्हाला?
राधिका आता संतापली होती. पण सासूबाईंवर याचा काहीच परिणाम झाला नाही.
राधिकाने रात्री तिच्या नवऱ्याच्या कानावर हा प्रसंग घातला उलट
आई कुठे चुकीचं बोलतेय म्हणत तिच्या नवऱ्याने आईची बाजू सांभाळली.

बहिणीने मिनिला एकदा १०० रुपये खाऊसाठी दिले होते हे लक्षात ठेवून सासूबाईंनी जसेच्या तसे आहेरात टाकले पण आई वडिलांनी तिला भरपूर काही केले ह्या गोष्टींकडे मात्र त्यांनी पार दुर्लक्ष केलं.
शेवटी सासूबाईंना ह्याच व्यवहारी भाषेत उत्तर द्यायचं याची राधिकाने मनाशी खूणगाठ बांधली.

पुढच्या दोन महिन्यात नणंदेच्या सासरी दिराचं लग्न ठरलं. घरातील शेवटचं लग्न म्हणून मोठ्या थाटामाटात सर्व विधी पार पडले. नातलगांना , व्याही मंडळीना चांगला मानपान केला गेला. सासूबाईंनी देखील राधिकाच्या नकळत चांगले ५००० रुपये आहेराच्या पाकिटात दिले.
दुसऱ्या दिवशी नणंद बाई तणतणतचं घरी आल्या..
आई ss आई sss बाहेर ये आधी लवकर.
आवाज ऐकून सासूबाईंसकट इतर सर्व जण बाहेर आले .
ही काय पद्धत झाली आई ? माझ्या दिराचं एवढ्या हौसेने लग्न झालं आणि तू आहेर म्हणून चक्क २० रुपये पाकिटात टाकलेस .
अगं तुझ्या नाही निदान माझ्या इज्जतीचा तरी विचार करायचास? काल रात्री पाकीट फोडल्यापासून सर्वजण नुसते खो खो हसत सुटले आहेत. मला तर कुठे तोंड लपवू असं झालंय.
सासूबाईंना हे ऐकून धक्काच बसला. हे कोणाचं कारस्थान हे त्या समजून गेल्या. काहीतरी बोलायला त्या तोंड उघडणार तितक्यात राधिका उत्तरली..
काय चुकीचं केलं मग सासूबाईंनी ? मागे नाही का एकदा तुमच्या दिराने मिनीला वाढदिवसाला २० रुपयांच चॉकलेट दिलं होतं त्या हिशोबानेच त्यांनी हा आहेर केलाय .
बरोबर बोलतेय ना मी सासूबाई ? तुमच्या मुलीला हा व्यवहारीपणा तुम्ही शिकवला नाही वाटतं. राधिकाच्या या प्रश्नावर सासूबाईंनी गप्प बसणेचं पसंद केले.

शेवटी नणंद बाईंनी गोंधळून विचारले, हा काय प्रकार आहे वहिनी ? कसला व्यवहार ? यात माझ्या दीराच्या लग्नाचा काय संबंध?
सांगते सांगते अस म्हणत राधिकाने तिच्या बहिणीच्या लग्नातील आहेराच्या पाकिटाचा तो किस्सा सांगितला. शिवाय सासूबाईंनीच असा व्यवहारीपणा ठेवण्याची ताकिद दिली म्हणून मीच त्यांच्या आहेराच्या पाकिटात २० रुपये ठेवून हिशोब बरोबर केला.

आई तुला काळ वेळ प्रसंग नाती वैगेरे समजत नाहीत का गं? छोट्या मुलीला २० रुपयांच चॉकलेट दिलं म्हणून तू सहज २० रुपये पाकिटात टाकलेस पण माझ्या सासूबाईंनी मानपानात दिलेली भारीतली साडी कशी लगेच घेतलीस ?
आणि वहिनीचं म्हणशील तर तिच्या आईवडिलांनी पण तुझा किती मानपान केला आहे. मिनिला तर ते नेहमीच काहीना काही भेटवस्तू देतात.
हे सर्व इतक्या सहज विसरलीस?

नणंदबाईंच्या या प्रश्नाने सासूबाई ओशाळल्या .लेकीला धडं खरं सांगताही येईना आणि सुनेला ओरडता ही येईना अशी त्यांची परिस्थिती झाली.
शेवटी बडबड करून लेक निघून गेल्यावर पाकिटातले पैसे कसे बदलले गेले याचा विचार करत बसल्या. आणि इथे राधिकाने नणंदेला गुड ॲक्टिंग ताई असा मेसेज टाकला.

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने