अलक ०१
वारी
पंढरीचा ध्यास मनी होता पण तो जाणार नव्हता घरी माऊली आजारी होती.
एकादशीच्या दिवशी, तो आईला स्पंजबाथ देत असताना, त्याला तिच्या चेहऱ्यावर विठू माऊलीचा हसरा चेहरा दिसला.
"मी येऊ शकलो नाही,म्हणून तूच आलास माऊली"म्हणत त्याने आईला नमस्कार केला.
अलक ०२
नागपंचमी
"का गं, आज नागपुजा करून आलीस का? नाही उशीर झाला म्हणून विचारले.." मैत्रीण.
"ती तर मी रोजच करून येते ग, त्याला रोज दूध पण देऊनच येते. आज फक्त खऱ्या नागाला नमस्कार करून आले."

अलक ०३
भीती
ती गल्लीतून जात होती..मागे दोन मुले तिच्या मागावर आहे असे वाटले..तिने लक्ष ठेवायला सुरुवात केली.तिला खात्री झाली तशी तिने बॅग मधून मोबाईल काढला आणि म्हणाली.."हॅलो आई, बघ मी घरी येत आहे..माझ्या रिपोर्ट मधे कोरोना पोझीटिव आला आहे म्हणून माझ्या करता एक खोलीत सगळे ठेऊन देशील..मला आईसोलेट राहायला सांगितले आहे,तर तुम्ही सगळे माझ्या जवळ येऊ नका."
असे म्हणून मागे पाहिले तर ते दोघे गायब झाले होते...तिने कोरोनाला thank you म्हटले.
अलक ०४
इच्छापूर्ती
आज तो तिच्यासाठी तिला हवी होती अगदी तशी हिरवीकंच कांजीवरम ची साडी, हिरव्या बांगड्या,चांदीची जोडवी आणि मणी मंगळसूत्र घेऊन आला..नेहमी ह्याला फालतू खर्च म्हणणारा तो आज स्वतःच तिला हे सगळे घालत होता.
ती हे सगळे वाड्यातील पिंपळाच्या झाडावर बसून पाहत होती.

अलक ०५
भेट
"किती सुंदर गिफ्ट दिले आहे,लाडकी आहेस नवऱ्याची" महणत मैत्रिणींनी तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.मैत्रिणींना तिला मिळालेला बारा लाखाचा हिऱ्याचा सेट दिसत होता..
ही मात्र दहा मिनिटाला का होईना, आज तरी त्याने माझ्या बरोबर रहावे ह्या करता त्याची वाट पाहत होती...

अलक०६
भविष्य
आज नामांकित उद्योजिका म्हणून बक्षीस घेताना तिच्या आईला ज्योतिषाने सांगितलेले तिचे भविष्य आठवले,"ह्या मुलीच्या नशिबी पैसा नाही.. धुणे भांडी करण्यातच आयुष्य जाणार हीचे"
तिने मात्र त्या वाक्याचा अर्थच बदलून टाकला आणि स्वतः गरीब घराच्या वीस पंचवीस बायकांना एकत्र करून क्लिनिंग कंपंनी टाकली.. पैसेवाल्यांकडे सफाई करवून गरिबांना मदत करत होती.

लघुकथा
लिफ्ट
कार मधे तिला लिफ्ट देऊन मध्यरात्री त्याने तिला जंगलात मदत केली म्हणून तिच्या हातावर हात ठेवत त्याने विचारले,"अर्ध्यारात्री कुणा पुरुषाबरोबर एकटे गाडीत बसायला भीती नाही वाटत?"
त्याचा इशारा तिला समजला होता.वासना त्याच्या डोळ्यात दिसत होत्या...
तिने हळूच त्याच्या हात घट्ट पकडुन म्हटले," नाहीरे, इथे येणारे लोक सज्जन असतात,गेल्या दोनशे वर्षापासून तरी कोणीच मला काहीच केले नाही"आणि तिने हात अजून घट्ट केला..त्याला तिच्या डोळ्यातला खट्याळपणा आणि दोनशे वर्षाचा अनुभव घट्ट होणाऱ्या हातात जाणवत होता.त्याने हळूच तिला जरा बाथरूमला जाऊन येतो म्हणून खाली उतरला आणि तिथून पळत सुटला.
दहा मिनिटांनी ती कारच्या बाहेर आली आणि तिने एक शिट्टी मारली...चार मुली अजून झाडी झुडप्यातून बाहेर आल्या....आता पांची जणी कार मधे बसल्या आणि कार शहराकडे धावू लागली...ती म्हणाली,"भित्रे असतात ग हे पुरुष,फक्त आपल्याला त्या भीतीची जाणीव करून द्यावी लागते....शक्ती जरी त्यांच्या कडे असली तरी आपल्याकडे निसर्गाने मेंदू दिलाय आपले संरक्षण करायला.".....थोड्या पुढे गेल्यावर तो पळताना दिसला...त्याच्या जवळ गाडी नेऊन तिने विचारले,"बसतोस का गाडीत?"
त्याने त्या दिशेने पाहता आता त्याला एकाच्या जागी पांच .... हडळ एकत्र दिसता त्याला घाम फुटला आणि तो जागीच बेशुद्ध होऊन पडला.
आणि ह्या सगळ्या हडळ..महिला मोर्चा जिंदाबाद म्हणाल्या.
सौ. अनला बापट

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने