लघुकथा लेखन स्पर्धा मे जून 2026
विषय- ऐतिहासिक लघुकथा
विषय- ऐतिहासिक लघुकथा
व्हॅलेंटाईन डे सात प्रतापी वीरांचा
पलकच्या शाळेत देशभक्ती गीत गायन स्पर्धा होती.
"आई, मला नवीन कोणतेतरी गीत दे. तेच तेच नको."पलकने आधीच सांगून टाकले .
प्रितीने मग
"आई, मला नवीन कोणतेतरी गीत दे. तेच तेच नको."पलकने आधीच सांगून टाकले .
प्रितीने मग
'म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात...'
वेडात मराठे वीर दौडले सात...'
हे गीत तिला ऐकवले.
त्यावर तिची प्रतिक्रिया होती हे सात वीर कोण?
त्यावर तिची प्रतिक्रिया होती हे सात वीर कोण?
आता प्रीतीलाही प्रश्न पडला कारण तिला फक्त गाणं माहीत होतं त्यामागील कथा नाही.
मग प्रीतीने माहिती काढली. त्यासाठी गुगलवर आणि इतर मराठी ऐतिहासिक साहित्याचा अभ्यास करून तिने पलकला कथा सांगितली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सात शूरवीर मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आणि अतुलनीय शौर्याची ही कथा आहे.
सरनोबत प्रतापराव गुजर त्यांचे खरे नाव कुडतोजी गुजर सेनापती.
पण त्यांचे शौर्य बघून शिवाजी महाराजांनी त्यांना पदवी दिली 'प्रतापराव'.
पण त्यांचे शौर्य बघून शिवाजी महाराजांनी त्यांना पदवी दिली 'प्रतापराव'.
सोबतीला होते दिपाजी राऊतराव, विसाजी बल्लाळ,विठ्ठल पिळदेव अत्रे, सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे आणि कृष्णाजी भास्कर.
जिल्हा सातारा मधील भोसरे गाव. तेथील पराक्रमी वीर कुडतोजी गुजर. मोगलाई आणि आदिलशाहीचा अन्याय सहन न होऊन त्या विरोधात त्यांनी बंड पुकारले.
एकदा त्यांनी मोगलांच्या खजिन्यावर धाड टाकली त्याचवेळी नेमकी शिवाजी महाराजांनी सुद्धा मोगलांच्या खजिन्यावर झेप घेतली. एकाच वेळी दोन मराठी शूर योद्धा आमने-सामने आले. खजिन्यावर हक्क कुणाचा?
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार केला आणि तो कुडतोजीला सांगितला. कुडतोजींनी सुद्धा आपलं इमान शिवाजी महाराजांना अर्पण केलं.
द्वंद्व मैत्रीत परिवर्तित झालं.

दोन वाघ एका ठिकाणी आलेत. कुडतोजींनी शिवरायांचा आदेश तात्काळ अमलात आणला.
आदिलशहाचा सेनापती, विजापूरचा सरदार बहलोलखान सातत्याने मराठ्यांना त्रास देत होता. त्याचे वारंवार हल्ले सुरू होते. मराठ्यांकडून खंडणी देखील वसूल करायचा.रयतेवर प्रचंड अन्याय करत होता.
'या बहलोलखानाचा ताबडतोब बंदोबस्त करा'
या आशयाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना गेले.
ते पत्र प्राप्त व्हायची देरी प्रतापराव कामगिरीवर निघाले.
या आशयाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना गेले.
ते पत्र प्राप्त व्हायची देरी प्रतापराव कामगिरीवर निघाले.
त्यांनी 'उमराणी' नावाच्या ठिकाणी बहलोलखानाच्या सैन्याला वेढा घातला. डोंगरदरीचा अभ्यास असलेल्या प्रतापरावाच्या सैन्याने गनिमी काव्याचा हिसका दाखवून शत्रूस जेरीस आणले.
त्याचा परिणाम असा झाला की बहलोल खानाच्या सैन्याला बरेच दिवस पर्यंत खायला अन्न आणि प्यायला पाणी सुद्धा मिळाले नाही.
खानाच्या सैन्याची दुर्दशा झाली होती.
पहाडासारखा पठाण प्रतापा समोर नाक घासत आला. अखेर बहलोल खान शरण आला. क्षमायाचना करू लागला. आर्जव करू लागला. गयावया करत सोडून द्या म्हणून विनवणी करू लागला. जीवदान मागू लागला.
'युद्धात शरण आलेल्याला मारू नये, सोडून द्यावं.'
हा प्रतापरावांचा शिपाई धर्म जागृत झाला.
आणि... दयेपोटी खंडणी वसूल करून प्रतापरावांनी बहालोल खानाला सैन्यासह सोडून दिले.

ही गोष्ट शिवरायांच्या पचनी पडली नाही. जो बहलोलखान रयतेवर अन्याय करतोय त्याला तुम्ही सोडून दिलेत?
बहलोल खानासोबत तह करून त्याला सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? राजा तुम्ही आहात की आम्ही?
असा संतप्त सवाल शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना केला.
बहलोल खानासोबत तह करून त्याला सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? राजा तुम्ही आहात की आम्ही?
असा संतप्त सवाल शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना केला.
शिवाजी महाराजांनी पत्रातून
'बहलोलखानाला ठार मारल्याशिवाय तोंड दाखवायचे नाही'
असे खर्डे बोल प्रतापरावांना सुनावले.
प्रतापरावांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला.
आपल्यामुळे राजांना प्रचंड दुःख झाले ते नाराज झाले या भावनेमुळे त्यांना अन्नही गोड लागेना.
आपल्यामुळे राजांना प्रचंड दुःख झाले ते नाराज झाले या भावनेमुळे त्यांना अन्नही गोड लागेना.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी?
'आपलं तोंड दाखवायचं नाही' हा आदेश त्यांना सतत सतावत होता. त्यांच्यासाठी एक प्रकारची ती शिक्षाच होती.
प्रतापराव बहलोल खानाच्या शोधात त्याच्या मागावरच होते.
तब्बल दहा महिने उलटून गेलेले होते.
तब्बल दहा महिने उलटून गेलेले होते.
अशात १४फेब्रुवारी१६७४ महाशिवरात्रीचा दिवस उजाडला.
'14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे' प्रेमाचा दिवस.
पण शिवाजी महाराजांच्या काळात ह्याच दिवशी आपल्या राजावर निरतिशय 'प्रेम' करणाऱ्या प्रतापराव आणि त्यांच्या सहा मावळ्या सवंगड्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.स्वराज्या
प्रति अपारनिष्ठा,आपल्या राजावरील निस्सीम प्रेम दाखवून देत हजारोंच्या सैन्यावर तुटून पडलेत सात वीर.
प्रति अपारनिष्ठा,आपल्या राजावरील निस्सीम प्रेम दाखवून देत हजारोंच्या सैन्यावर तुटून पडलेत सात वीर.
जिल्हा कोल्हापूर गडहिंग्लज तालुका मधील नेसरी गावात टेकडीवर बहलोल खान बारा हजार सैन्यासह तळ ठोकून होता हे कळताच प्रतापरावांनी कुठलाच मागचा पुढचा विचार न करता
आपल्या शूरवीर अशा सहा-साथीदारांसोबत टेकडीकडे निघाले.
त्यापूर्वी टेकडीखाली पाणवठ्यावर घोड्याला पाणी पाजण्यासाठी उतरले असता त्यांना मागून घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला. त्यांनी कान टवकारले .गनिम जवळ पाहून भान विसरून त्यांनी बहलोल खानाच्या बाराहजार सैनिकांवर आत्मघातकी हल्ला चढविला.
शत्रु सैन्याला कापून काढत थेट बहलोल खानाच्या छावणीत घुसले. त्यांच्या अफाट पराक्रमाने आणि तलवारीच्या धाकाने शत्रु फौजेत हाहाकार उडाला.

फक्त सात वीर समोर बारा हजार सैनिकांची तुकडी. पण त्यांचे पाय लटपटले नाहीत.
दुर्दम्य विश्वास आणि पराकोटीची स्वामी निष्ठा.
शिवाजी महाराज मावळ्यांसाठी जीव की प्राण.
राजांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी वीरमरण पत्करले.
शिवाजी महाराज मावळ्यांसाठी जीव की प्राण.
राजांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी वीरमरण पत्करले.
ही घटना जेव्हा शिवरायांना कळाली त्यावेळी त्यांना खूप दुःख झाले.
पुढे त्यांनी प्रतापरावाची मुलगी जानकीदेवी हिचा विवाह आपला मुलगा राजाराम याच्याशी लावून दिला .
आजही नेसरी येथे या सात वीरांचे स्मारक दिमाखात उभे आहे .
पुढे त्यांनी प्रतापरावाची मुलगी जानकीदेवी हिचा विवाह आपला मुलगा राजाराम याच्याशी लावून दिला .
आजही नेसरी येथे या सात वीरांचे स्मारक दिमाखात उभे आहे .
त्यांचं बलिदान वाया गेले नाही. त्या बलिदानाने हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक मावळा पेटून उठला. या सातही वीरांचा पराक्रम इतिहासाच्या पानावर कायम अमर राहील.
हाच या सात वीरांच्या पराक्रमाचा,शौर्याचा इतिहास कुसुमाग्रजांनी आपल्या
हाच या सात वीरांच्या पराक्रमाचा,शौर्याचा इतिहास कुसुमाग्रजांनी आपल्या
'वेडात मराठे वीर दौडले सात'
या गीतात कथन केलेला आहे.
ही कविता वाचताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.
ही कविता वाचताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.
प्रीतीने या गीतरचनेमागील कथा ज्यावेळी पलकला सांगितली त्यावेळी पलकच्या डोळ्यातून अश्रूबिंदू टपकले आपल्या शुरवीर योद्ध्यांसाठी.
तिने तेच गीत स्पर्धेत जोषात सादर केले आणि प्रथम क्रमांक पटकाविला.
©®शरयू महाजन
तिने तेच गीत स्पर्धेत जोषात सादर केले आणि प्रथम क्रमांक पटकाविला.
©®शरयू महाजन
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने