भाग 5
"आय मिस यु पार्थ,आय मिस यु सो मच" अनु हुंदके देत म्हणाली.
पार्थनेही तिची पाठ थोपटली. "आय नो अनु, आय नो मी पण तुला खूप मिस केलं. पण बघ, शेवटी आलो ना मी परत?"
दोघंही काही वेळ तसेच शांत उभे होते. कितीतरी दिवसांनी अनुच्या मनाला एक प्रकारची शांतता लाभली होती.
अनु दचकून मागे झाली. तिने पाहिलं तर गॅसवर ठेवलेल्या कढईतून काळा धूर निघत होता आणि कांदाभजी कोळश्यासारखी काळीकुट्ट झाली होती
"माझी भजी जळाली" अनुने कपाळावर हात मारला आणि पटकन गॅस बंद केला.
"शीट यार अनु इतक्या कष्टाने मी यमराजाला चकवून कांदाभजी खायला आलो होतो, आणि तू कोळसा बनवून ठेवलास?" पार्थने जळलेल्या कढईकडे बघून एकदम रडवेला चेहरा केला.
"शीट यार अनु इतक्या कष्टाने मी यमराजाला चकवून कांदाभजी खायला आलो होतो, आणि तू कोळसा बनवून ठेवलास?" पार्थने जळलेल्या कढईकडे बघून एकदम रडवेला चेहरा केला.
"अरे, पण त्याला कारणीभूत तूच आहेस ना इमोशनल डायलॉग कोणी मारले?" अनुने झाऱ्या हातात घेत त्यालाच उलट सुनावले.
"ते काही नाही, मला आता दुसरी फ्रेश भजी पाहिजेत म्हणजे पाहिजेत" पार्थ बाहेर सोफ्यावर जाऊन वैतागून बसला.
अनुने हसतच मान हलवली. तिने किचनमध्ये जाऊन राहिलेल्या पिठाची गरमागरम, कुरकुरीत दुसरी भजी काढली. कपाटातून टोमॅटो सॉस शोधला आणि एका प्लेटमध्ये छान सजवून ती बाहेर हॉलमध्ये घेऊन आली.
पार्थ सोफ्यावर मान खाली टाकून पाय हलवत बसला होता. अनुला येताना पाहून त्याचे डोळे चमकले.
पार्थ सोफ्यावर मान खाली टाकून पाय हलवत बसला होता. अनुला येताना पाहून त्याचे डोळे चमकले.
"बस यासाठीच मेलोय याचं कधी कधी खूप दुःख होतं तिकडे वरती असं चमचमीत आणि तिखट खायलाच मिळत नाही"पार्थ
"पार्थ तू अजून पण सुधारला नाहीयेस ना रे?" अनु
"अगं आता सुधारून तरी काय होणार आहे? स्वर्गात काय मला नोबेल प्राईझ मिळणार आहे का? असो, दे इकडे प्लेट..." पार्थने प्लेट स्वतःकडे ओढून घेतली.
अनु मोठ्या उत्सुकतेने त्याच्याकडे बघू लागली. तिला बघायचं होतं की एक भूत नक्की खातं कसं
पार्थने एक भजी तोंडात टाकली आणि डोळे बंद करून चघळू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भजी गायब झाली होती आणि ती खाली पडलीही नव्हती.
"बाप रे खरंच खाल्लंस तू?" अनुने आश्चर्यचकित होऊन विचारलं.
"उम्म अप्रतिम नंबर वन झालीयेत भजी हे एक भारी आहे मी काहीही खाऊ शकतो आणि उद्या सकाळी पोट साफ होण्याची कोणतीही झंझट नाही कारण भुतांना डायजेशन सिस्टीम नसते. आहे ना भारी?"पार्थ हसत म्हणाला.
"शी पार्थ खाताना तरी असले घाणेरडे जोक्स नको मारू रे" अनु वैतागून म्हणाली त्यावर तो हसायला लागला त्याला पाहून तीही बऱ्याच दिवसांनी हसत होती.
