Login

अनोखा साथी भाग 4

A Comedy Tail

भाग 4

पार्थने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं मघासचं ते खट्याळ हसू गायब झालं होतं. तो हळूच ओट्यावरून खाली उतरला आणि तिच्या समोर उभा राहिला.

"अनु... मी खरंच आलोय गं तू रोज, प्रत्येक क्षण माझ्यासाठी अशी रडत होतीस. तिथे गेल्यावर सुद्धा मला फक्त तुझेच हुंदके ऐकू येत होते. मग तूच सांग, मला तरी कशी काय शांती मिळणार होती तिथे."पार्थ अत्यंत हळुवार स्वरात म्हणाला

"पण का झालं असं आपल्यासोबत?मी तुला किती वेळा सांगत होते की नको जाऊ त्या रस्त्याने, आज खूप ट्रॅफिक असेल, पाऊस पडतोय पण तू माझं ऐकलंच नाहीस पार्थ का गेलास मला सोडून?"अनु

"कदाचित आपल्या नशिबात सध्या एकत्र राहणं नव्हतं अनु. पण तू काळजी नको करू,जोपर्यंत तू नीट सावरत नाहीस, जोपर्यंत तू आयुष्यात पुढे जात नाहीस, तोवर मी तुला सोडून कुठेही जाणार नाही."पार्थ


"मग मी कधीच मूव्ह ऑन करणार नाही तू नेहमी असाच माझ्यासोबत राहा," अनु हट्ट धरून बसलेल्या लहान पोरीसारखी म्हणाली.

"अगं पण" पार्थ काहीतरी बोलायला गेला.

पण अनुने न ऐकता, एका भावनेच्या भरात त्याला घट्ट मिठी मारण्यासाठी आपले हात पुढे केले. ती त्याच्या दिशेने झेपावली, पण ती थेट त्याच्या शरीराच्या आरपार गेली

अनुने थक्क होऊन स्वतःच्या हातांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं, "मी तुला साधी मिठीही मारू शकत नाही?"

"अरे मी विसरलोच की मी भूत आहे"पार्थने कपाळावर हात मारला.

तो हवेत थोडा मागे सरकला, त्याने डोळे बंद केले आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी विचित्र मंत्र पुटपुटला. दोन सेकंदांत त्याच्या शरीराभोवती एक हलकी पांढरी चमक आली.

पार्थने डोळे उघडले आणि चेहऱ्यावर एक खट्याळ हसू आणत म्हणाला, "ओके डन आता तू मला टच करू शकतेस."

"खरंच?" अनुने अविश्वासाने आणि आशेने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातले अश्रू अजून सुकले नव्हते.

"येस बेबी ट्राय करून बघ," पार्थने आपले दोन्ही हात पसरले आणि चेहऱ्यावर तेच जुनं, हसरं रूप आणलं.

अनुने कसलाही विचार केला नाही. ती पुढे सरसावली आणि तिने पार्थला घट्ट मिठी मारली यावेळेस ती आरपार गेली नाही. तिला पार्थच्या अस्तित्वाचा स्पर्श जाणवला.

क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →