भाग 1
आज बाहेर आभाळ भरुन आल होत ती नुकतीच ऑफिस मधुन परत आली होती चहा टाकला आणि तो उकळून कपात गाळून घेत ती बाहेर येऊन बसली.
इतक्यात तिचा फोन वाजला तिच्या आईचा फोन होता.
बोल आई" ती म्हणजेच अंशीका उर्फ अनु म्हणाली.
"अग अनु तुझ्यासाठी स्थळ आलंय" तिची आई उत्साहाने म्हणाली.
"आई मला लग्न करायचं नाही"अनु चिडत म्हणाली.
"अग आता झाले दोन महिने त्याला जाऊन तो काय परत येणारे का आता,विसरून जा त्याला पुढे जाणं भाग असतं बाळा" तिची आई समजावत म्हणाली
"बोलणं सोपं आहे आई आणि तुला यावरच बोलायचं असेल तर ठेव फोन मला नाही बोलायचं" ती
"अग ऐक तरी"आई बोलत होती तोच तिने फोन कट केला आणि बाजुला पडलेला त्याचा फोटो उचलला.
पार्थ तिचा बॉयफ्रेंड दोन वर्षांचं नातं होत सगळ काही ठीक चालू होत पण म्हणतात ना नियतीच्या मनात काही वेगळं असेल तसच काहीस झालं होतं दोन महिन्यांपूर्वी अचानक रस्त्याने येताना अपघात झाला आणि त्यातच तो गेला.
पण तिचं आयुष्य मात्र अजूनही तिथेच थांबलं होत आता तशी धक्क्यातून सावरली होती सतत रडत बसतं नव्हती पण तेच लग्नाचा विषय काढला की त्याची आठवण यायची आणि तिचे डोळे भरुन यायचे.
तिने तो फोटो हातात घेतला त्याच्या चेहऱ्यावर नेहमी सारख खट्याळ हसू होतं.
"हसतोस काय? तुला माहित नाही तु गेल्यामुळे इथे काय काय होतंय बावळट कुठला,का गेलास मला एकटीला सोडून" ती रागाने त्याला झापत होती नेहम सारखच.
"असं म्हणतात एकदा गेलेलं माणूस परत येत नाही,पण तु ये ना रे? कुठून का होईना पण परत ये ना प्लिज"तिच्या डोळ्यांतून एक अश्रू गालावरून ओघळून त्या फोटोवर पडला.
अचानकच हवेत गारवा जाणवला आणि रुम मधल्या लाइट्स चालू बंद होऊ लागल्या ती चांगलीच घाबरली होती.
"हे काय होतंय" तिने पटकन लाइटचे बटन ऑन केले
तिथे पांढऱ्या रंगाचा धूर पसरु लागला जो हळु हळु तिच्याकडेच येत होता.
शेवटी तिला त्या धुक्यात एक चेहरा दिसला,तिच्या ओळखीचा.
"हाय अनु मिस्ड मी बेबी?" एक आवाज तिच्या कानावर पडला.
"पार्थ" तिचे डोळे आश्चर्य आणि भीतीने मोठे झाले आणि ती धाडकन बेडवर पडली आणि तिची शुद्ध हरपली.
क्रमशः
