Login

उन्हाचा तडाखा

एकदा मी कामासाठी उल्हासनगर कॅंप ४ मधे फिरत होतो...........

एकदा मी कामानिमित्त उल्हासनगर कँप नं. ४ मध्ये फिरत होतो. दुपारच दीडचा सुमार. उन्हाळ्याचे दिवस. ऊन रणरणत होतं. मला अमन टॉकिज कुठे आहे ते पाहिजे होतं. मी चौकशी करत करत एका बैठ्या चाळीकडे आलो.

त्यातल्या एका उघड्या दरवाज्या बाहेर एक सामान्य सिंधी माणूस उभा होता. त्याचे कपडे चुरगळलेले , मळलेले आणी वाढलेली दाढी पाहून कुणालाही त्याने बऱ्याच
दिवसात अंघोळही केली नसावी असं वाटलं असतं. मी त्याला विचारलं, " ये अमन टॉकिज यहासे कितना दूर है ? " तो म्हणाला, " वैसे बहोत दूर है. आप पैदल जायेंगे तो वीस पचीस मिनिटका रास्ता है. " मी ठीक आहे म्हंटलं आणि जायला निघालो. तेवढ्यात तो म्हणाला, " अरे , साब एक मिनिट रुकिये..... " असं म्ह्णून तो आत गेला. आणि एक छत्री घेऊन आला आणि म्हणाला, " धूप बहोत कडी है, आप ये छाता ले जाइये " असं म्हणून त्याने मला त्याच्या हातातली छत्री दिली. मी ती घेत आणि आश्चर्याने स्तंभित होत म्हंटलं. " लेकीन , मै छाता आपको वापिस कैसे करूंगा ......? " त्यावर तो म्हणाला, " उसमे क्या है लौटते टाइम वापिस करना , या आप जब कभी यहा आयेंगे , तभी वापिस करना. " आणि तो आत गेला.
मी छत्री घेऊन निघालो. मनात विचार आला आपण एखाद्या अनोळखी माणसाला देऊ का छत्री , की ऊन कडक आहे तुम्हाला ते लागेल. आणि पुढची गोष्ट म्हणजे तो परत करील यावर विश्वास ठेवू का ? इथे तर येताना परत द्या, नाहीतर तुम्ही या बाजूला याल तेव्हा परत द्या, इतका
विश्वास हा मनुष्य कुठे शिकला ? कोणत्या शाळेत तो गेला असावा ? मी आश्चर्य करीत जात होतो. मग लक्षात आलं की माणुसकी नावाची गोष्ट त्याच्यात ओतप्रोत भरलेली आहे. तो त्याचा रक्तातला गुण असावा. हेच खरं. आता बोला मी अशा माणसांना नावं ठेवीन का ? आम्हाला आमच्या
सुरक्षित चौकटीतला चांगुलपणा माहित असतो. तोही ओळख असेल तर. तरीही शक्यता कमीच. कदाचित आपलं मत वेगळं असू शकतं.

(संपूर्ण)
अरुण कोर्डे
ठाणे पश्चिम
९००४८०८४८६
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →