खास महिलादिनानिमित आणि आपले ईराच्या वाचक
#सौ. भाग्यश्री ऋषिकेश देशमुख
अमरावती (महाराष्ट्र)
आपल्या मागणीनुसार आणि त्यांच्या आग्रहाखातर एक नाटक लिहिण्याचा आगळावेगळा प्रयत्न
अभिप्राय अपेक्षित
नाटकाचे नाव: "उंबरठ्याबाहेरचे आकाश"
पात्र परिचय:
१. सदानंद (बाबा): ५५ वर्षे. एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत. पुरुषप्रधान मानसिकतेचे आणि घरातील 'सत्ता' आपल्याच हातात असावी असे मानणारे.
२. छाया (आई): ४८ वर्षे. एक 'होममेकर' (गृहिणी). पदवीधर असूनही लग्नानंतर संसारासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला सारलेली. मुळात सोशिक, पण आज मुलीच्या धैर्यामुळे तिचा स्वाभिमान जागृत होत आहे.
३. सायली (मुलगी): २२ वर्षे. पदव्युत्तर शिक्षण घेणारी, आजच्या काळातील स्वतंत्र विचारांची. आईच्या कष्टांची आणि होणाऱ्या अन्यायाची तिला पूर्ण जाणीव आहे.
४. रोहन (भाऊ): १९ वर्षे. कॉलेजमध्ये जाणारा. आधुनिक विचारांचा आव आणणारा, पण प्रत्यक्षात मात्र आईला केवळ सेवेचे साधन मानणारा.
५. आजी: ७५ वर्षे. सदानंद यांची आई. जुन्या वळणाच्या. "स्त्रीने सोसावं आणि पुरुषांची मर्जी राखावी" हेच घराचे नियम असावेत असं त्यांना वाटतं.
प्रवेश: जेवणाचे टेबल
(रात्रीची वेळ. जेवणाचे टेबल मांडलेले आहे. सदानंद, रोहन, आजी आणि सायली जेवायला बसले आहेत. छाया किचनमधून गरम पोळ्या आणून प्रत्येकाला वाढत आहे. तिचा स्वतःचा चेहरा घामाने डबडबलेला आहे, पण तरीही ती हसतमुखाने सर्वांना वाढतेय.)
सदानंद: (पोळीचा तुकडा तोडत) छाया, भाजीला आज चव जरा कमी वाटतेय गं. मीठ विसरलीस की काय?
छाया: (सावरत) नाही हो, टाकलंय की. कदाचित कमी पडलं असेल. मी आणते मीठ.
(छाया पुन्हा किचनमध्ये जाऊन मीठ आणते. सर्वांना वाढते. अखेर, ती स्वतःच्या ताटात भात घेते आणि जेवायला बसते. ती जेवणाचा पहिला घास घेणार इतक्यात...)
सदानंद: (ताटात पाहत) अरे, पाणी घेतले नाहीस गं प्यायला. आणि थोडे कोमट दूध पण घेऊन ये, शेवटी दूध-भात खाईन म्हणतोय आज. जरा पोट जड वाटतंय.
छाया: (दमलेल्या स्वरात, हातातला घास खाली ठेवत) हो, आलेच घेऊन. (ती उठायला लागते.)
सायली: (आईचा हात धरून तिला पुन्हा खाली बसवते) आई, तू बस खाली. तू अजून एक घास सुद्धा नीट खाल्ला नाहीयेस. बाबा, तुम्हाला दिसत नाहीये का आई आता कुठे जेवायला बसलीये? तुम्ही स्वतः उठून किंवा रोहनला किंवा मला सांगून पाणी आणि दूध घेऊ शकला असता ना?
सदानंद: (रागाने) सायली! हे काय बोलणं झालं? मी दिवसभर बाहेर काम करून येतो. तुझी आई दिवसभर घरीच असते ना? मग एवढं काम तिने केलं तर काय बिघडलं?
आजी: बरोबर आहे सदानंद तुझं. अगं सायली, पुरुषांना जेवताना उठवणं शोभा देत नाही आपल्या घरात आणि छाया, तुलाही कितीदा सांगितलंय, जेवायला बसण्यापूर्वी पाणी, दूध, मीठ डावं उजवं सगळं आधीच हाताशी मांडून ठेवत जा.
दिवसभर घरी असतेस, मग एवढं नियोजन नको का करायला?
सदानंद: आई, मी हिला किती वेळा समजावून सांगितलंय कि,जेवायला बसल्यावर सारखं उठायला लागू नये म्हणून सगळे हाताशी घेऊन बसत जा. पण हिचं लक्ष नसतं. दिवसभर असं काय काम असतं हिला?
सायली: (भडकून) दिवसात काय काम असतं? बाबा, सकाळी पाच वाजल्यापासून आई राबतेय. तुमच्या वेळा आणि रोहनच्या वेळा, आज्जीचं सगळं पथ्यपाणी येणारे जाणाऱ्यांचे हवं नको करताना तिला स्वतःचं भान नसतं. आई 'होममेकर' आहे याचा अर्थ ती तुमची 'वेठबिगारी' करणारी नोकर नाहीये.
तुम्हाला माहिती आहे का माझ्या मैत्रीणीच्या आया पण होममेकर आहेत. तरीही सगळे घरी काम वाटून घेतात.मस्त एन्जॉय करतात.
पार्लेर, किटी पार्टी, सहली.
या सगळ्यात माझी आई कुठे आहे बाबा? तिला काय हवं काय नको विचारलेत?
गेल्या आठवड्यात आईला फक्त एक तास पार्लरमध्ये जायचं होतं, स्वतःसाठी थोडा वेळ हवा होता. पण तुम्ही काय म्हणालात? "काय गरज आहे? दिवसभर घरीच असतेस, नटून कोणाला दाखवायचंय? पाहुणे येणार आहेत, स्वयंपाक कोण करणार?" आईला साधं स्वतःच्या अस्तित्वासाठी एक तास मिळवण्याचा अधिकार नाही का या घरात?
रोहन: (हसत) अगं सायली, आईला सवय आहे आणि तिला आवडतं आम्हा सगळ्यांची काळजी घ्यायला. उगाच स्त्री-हक्काच्या मोठमोठ्या गप्पा नको मारू इथे. आई, वाढ गं मला थोडा भात.
छाया: (कातर स्वरात, सायलीचा हात दाबून) सायली... पुरे गं आता! शांत बस बघू! उगाच कटकट नको घरात. तुझे बाबा बाहेरून येतात, त्यांचं ऐकून घेण्यातच आपलं भलं असतं. तू गप्प जेवून घे.
सायली: (आईच्या डोळ्यांत बघून) का आई? का शांत बसू? आई तु शिकलेली आहेस. M. A. मराठी विषयात प्रावीण्य मिळविलेली गोल्ड मेडलीस्ट. चित्रकलेच्या सगळ्या परिक्षेत प्राविण्य मिळवलेले. कुठे गेल्या तुझ्या पदव्या? बंद पेटीत बंदिस्त! आई, तू 'होममेकर' आहेस हेच यांनी तुला गृहीत धरलंय.
तुला काहीच वाटत नाही का? आई, जर तू आज स्वतःसाठी उभी राहिली नाहीस, तर उद्या माझ्यावरही हेच दिवस येतील. तुला वाटतं का तुझ्या मुलीने सुद्धा आयुष्यभर तुझ्याच पावलावर पाऊल टाकायला हवं फक्त 'आणि '' एवढंच करावं?
सदानंद: (ताटावर हात मारून) बस कर सायली! खूप झालं तुझं. छाया, बघतेयस काय? जा, दूध घेऊन ये आणि याला भात वाढ!आई तुला काय हवं आहे?
(छाया थरथरत्या हाताने पुन्हा उठायला लागते...)
सायली: (ठामपणे) आई, थांब! रोहन, तुला भात हवाय ना?हातानं घे. उठ आणि पाणी पण घेऊन ये आणि येताना गॅसवरचे दूध बाबांसाठी घेऊन ये ओट्यावरच आहे. आई आज जेवताना कुणासाठीही उठणार नाही.
(छाया क्षणभर स्तब्ध होते. ती सायलीकडे पाहते, मग सदानंदकडे संदानंद रागानं थरथरत असतात.)
छाया: (स्वरात एक वेगळाच ठामपणा आणून) सायली बरोबर म्हणतेय. सदानंद, आज... आज मला शांतपणे जेवू द्या. रोहन, बेटा, भात तिथेच आहे, तू वाढून घे ना आज स्वतःचं? आणि दूधही गॅसवर आहे ते तेवढे घेऊन ये राजा.मी पण खूप थकलेय.
(सदानंद आणि रोहन सुन्न होऊन एकमेकांकडे बघतात. आजी माळ जपत
---
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
