Login

उमलू दे १

Family Time
सकाळ…
स्थळ: बाल्कनी

सकाळची कोवळी ऊन बाल्कनीत पडली होती. आजी आणि आजोबा त्यांच्या नेहमीच्या जागी बसले होते.

“सगळे पाहुणे गेले, घर पुन्हा शांत झालं.”आजोबा वर्तमानपत्र उघडत म्हणाले.

आजी हसल्या.
“हो, पण आता घर खरं सुरू होतं. लग्न म्हणजे गोंधळ, संसार म्हणजे शांत गती.”
,
“आज अजून चहा कसा आला नाही..” पेपर वाचत आजोबांनी विचारले.

“थांबा, मी बघते. आशू कामात गुंतली असेल.” आजी उठल्या आणि घरात गेल्या.


****

स्थळ: नातवाच्या खोलीजवळ..

आजी हळूच आत गेल्या. हर्षच्या खोलीतून हलका हशा ऐकू येत होता. दार अर्धवट उघडं होतं.
रिया आरशासमोर साडी नेसत होती. नव्या नवरीची लाज चेहऱ्यावर होती.
मागून हर्षने तिला मिठीत घेतले होते आणि तिची उगीच छेड काढत होता.

“हर्ष, जाऊ दे ना… मला बाहेर जायचं आहे,” रिया तिची साडी सावरत म्हणाली.

“आई आहेना, ती करतेय..,” तो म्हणाला.

“लग्नाला दोन दिवस झाले रे, आता तरी मला मदत करायला जायला हवे.. “

“तू फक्त सुंदर दिसण्याची जबाबदारी घे..” तो हसत तिच्यापुढे जात म्हणाला.

ती निऱ्या नीट करत होती आणि तो मुद्दाम त्या विस्कटत होता.

“अरे! काय करतोस?” ती थोडे वैतागत म्हणाली.

“मदत करतोय,” तो निरागस चेहऱ्याने म्हणाला.

“ही मदत आहे?” ती आरशातून त्याच्याकडे पाहत म्हणाली.

“हो… नवऱ्याची स्पेशल मदत.” तो तिच्या चेहऱ्यावर आलेली बट हळूच कानामागे घालत म्हणाला.

दोघांची गोड लुटूपुटू सुरू होती.
दाराबाहेर उभ्या आजी खुदकन गालात हसल्या.
“प्रेमाची सुरुवात अशीच असते,” त्या मनात म्हणाल्या आणि शांतपणे किचनकडे वळल्या.

****
स्थळ: किचन

अश्विनी चहा बनवत होती. वेलदोड्याचा सुगंध दरवळत होता.
मागून श्रीपाद आला.

“आशू…” तो तिच्याजवळ उभा होता पण ती मात्र आपल्या कामात व्यस्त होती.

“हम्म…” तिने फक्त हुंकार दिला.

“ अगं इकडे बघ तरी..”तो तिच्या आणखी शेजारी सरकला.

“तुम्हाला काही हवे काय?” ती परत त्याच्याकडे न बघताच म्हणाली.

तो कप काढू लागला. त्याचे आवाज करू लागला.

“अहो, राहू द्या, फुटतील ते… मी करते,” ती म्हणाली.

“तू आधी इकडे बघ, माझ्याकडे..” तो.

“हे काय तुमचं बालिशपणा सुरू आहे. आधीच आज उठायला उशीर झाला. आई बाबा चहाची वाट बघत असतील.. “ ती त्याच्याकडे बघत, त्याच्या हातातील कप घेत म्हणाली.

“थोडा उशीर झाला तर चालतो, अगदीच काय घड्याळाच्या काट्यांप्रमाणे चालायला नको..” तो तिच्या हातातील बांगड्यासोबत खेळत म्हणाला.

“शsss!” तिने त्याच्या हातावर मारले. “ काय चाललंय तुमचं? आता सासरे झालाय, लक्षात असू द्या..”

“हा तर आपल्या बायको सोबत रोमान्स करू नये असे कोण सांगितले?”


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →