Types of बायका in भिशी !
1. Critics
माझ्या घरी भिशी असती तर घरी बनवलेले समोसे ठेवले असते ! बाजारातुन आणलेले नाही. ( नाक मुरडत )
माझ्या घरी भिशी असती तर घर स्वच्छ केले असते !
पडदे जुनेच आहेत. माझ्या घरी भिशी असती तर नवीन लावले असते !
भेळमध्ये एवढी चव नाही. काही तरी कमी वाटत आहे नाही का.

** पुढच्या वेळी तुमच्याच घरी ठेवू. ( कुणीतरी बोलते)
-- नाही नाही नको. आमच्या ह्यांना आवडत नाही.

2. Superstitious
( मनातल्या मनात )
मागच्या वेळी कुलकर्णी बाईला भिशी लागली तेव्हा त्यांनी दक्षिणेला तोंड केलं होतं.
यावेळी जर मी दक्षिणेला तोंड केलं तर माझीही लागेल.
ही खुर्ची लकी आहे. मागच्याच्या मागच्या महिन्यात पवारबाई याच खुर्चीवर बसल्या होत्या तर त्यांना भिशी लागली होती. याच खुर्चीवर दक्षिणेला तोंड करून बसते.
मागच्या वर्षी बारक्या गोलूने माझी चिठ्ठी उचलली होती. त्याला बोलवू का. पण तो शाळेत असेल. बर नाही वाटणार.
एकदा लपून सर्व चिठ्ठ्या चेक करते नेहमी माझीच भिशी कसकाय शेवटी लागते.
या शिंदे बाई कुलकर्णी बाईला लाच तर देत नसतील ना कारण तिची चिठ्ठी नेहमीच लवकर लागते. लक्ष ठेवावे लागेल.

3. Gossip Queen
( कुजबुज करत )
पूजा काल बॉयफ्रेंडसोबत दिसली होती.
या वयात माझी दोन मुले झाली होती आणि आजकालच्या मुली.
बॉयफ्रेंड दुसऱ्या जातीचा आहे म्हणे.
पण आपल्याला काय.
पर्वा इंगळेंच्या घरात मोठं भांडण झाले. घरातूनच बाहेर हाकलून दिले.
छे छे इंगळे बाईंना नाही. उलट तिनेच नवऱ्याला हाकलले.
कारमध्ये लेडीज रुमाल सापडला म्हणे.( हळू आवाजात )
नंतर कळलं सासूचा रूमाल होता.
आपल्याला काय जाऊद्या.
तो सावंतचा प्रतीक.
बॅकलॉग लागलाय. असाही दिवसभर गल्लीत फिरायचा. लागणारच. लक्ष ठेवावं लागतं मुलांवर.

** तुमच्या आरवला किती आले बारावीत ?
__ दुसऱ्या विषयावर बोलू . काय अभ्यास अभ्यास. तुम्ही बायका नुसत गॉसिप करतात बाई. ( घामाघूम होत )

4.पाणी पगलू
पाणी कधी येणारे.
मला त्या नगरसेवकच्या ग्रुपमध्ये ऍड करा ना.
टँकर कधी येणारे.
मला टँकरवाल्याचा नंबर द्या ना.
भिशी झाल्यावर थोडं पाणी द्या ना तुमच्या हौदातून पाईपने. यावेळी आमची मोटारच बिघडली.
एकतर पाणी येते दहा दिवसातून येते आणि त्याच वेळी आमची मोटार बंद पडते.
काही दिवसांनी सोनाराच्या दुकानात मिळेल पाणी.
कधी कधी वाटत मीच पंतप्रधान बनून गल्लीत चोवीस तास पाणी आणावं.
कशाला सोडायचं सिंधू नदीचे पाणी. इथं आम्हाला द्या म्हणावं.

5. सिरीयल पगलू
भिशी नंतर काढू आधी टिव्ही लावा.
नंदिनीने पार्थला मारलं.
पार्थने रियोला मारलं.
रियोने तुलसीला नाही मारलं बर.( हसत)
माझा मुलगा तर घाबरतोच. म्हणतो मम्मी तुझ्याकडे बंदूक तर नाही ना.(हसत)
अनुपमा लावा ना "नया सफर" येणारे तिचा. नवीन हिरो येणारे. सहावा हिरो.
इथं लग्नाला दहा वर्षे होऊन नवऱ्याला वाढदिवस लक्षात राहत नाही आणि अनुपमाला म्हातारपणीही दर दोन महिन्याला नवीन बॉयफ्रेंड भेटतो बघा.

6. Foodie
एक समोसा मिळेल का.
थोडा चहा.
भिशीला कोण येते. खरतर मी तुमच्या हातचे खायलाच येते.
एक अजून समोसा मिळेल?
ढोकळाचा वास येतोय.
थोडी चटणी मिळाली असती तर.
सॉरी बर तुम्हाला त्रास देतेय.
तुम्ही खूप शिकरण आहात.
सॉरी. सुगरण आहात.
आईची आठवण येते तुमच्या हातच जेवताना.( रडत )

7. That Rich woman
" खरतर मला भिशीची गरज नाही. U know. Mister इतके पैसे अकाउंटमध्ये टाकतात ना की कुठं खर्च करू कळत नाही. शॉपिंग रोज रोज थोडी करू शकतो. मी तर तुम्हाला भेटायला टाईमपास म्हणून येते. "
" माझे मिस्टर माझ्या बड्डेला प्लॉट गिफ्ट करणारे. I said please no more gifts but he told baby this is your thirty fifth birthday so I will give you thirty five gifts. I said please stop."{ लाजत }
" आता आम्ही युरोप टूरला जाणार होतो पण यु नो हिट वेव्ह आहे तिकडे सो वी कॅन्सल द ट्रिप. But still he promised me for Australia trip. "
" ही चिठ्ठी माझी, ही माझ्या मुलीची, ही नणंद ची , ही सासूची, ही मामी, ही काकूची. "

8. आमच्या काळात काकू
आमच्या काळात तर भिशी वगैरे नव्हती.
खिडकीतूनच बोलायचो जे बोलायचो ते.
आमच्या काळात तर सासूबाईबद्दल वाईट बोलत नव्हते चार चौघात.या आजकालच्या सुना.
आमच्या काळात भिशी असती तर सर्वात वयस्कर बाईला आधी दिली असती भिशी. त्यामुळे मला द्यायला पाहिजे खरंतर. पण चालू द्या तुमचं
आमच्या काळात बायका मूव्हीला जात नव्हत्या ग्रुपमध्ये.

** काकू तुमचे पैसे?
-- देते ना. पळून थोडी जाणारे मी. आमच्या काळात मोठ्या व्यक्तीना स्वतःहून पैसे नव्हते मागत.( नाक मुरडत चिडत )

9. That उत्साही वुमन
मी काय म्हणते आपण नेक्स्ट टाइम एखाद्या हॉटेलला भिशी करायची का.
या रविवारी मुव्हीला जायचं.
भिशी नंतर काढू आधी एक सेल्फी काढू. इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचं आहे.#भिशी विद बहिणी
थांब चिठ्ठी नको उचलू. एक रील बनवते.
थांबा आता मी प्रत्येकाला विचारणार की कुणाची चिठ्ठी लागली आहे. मग तू announce कर.
बोडके बाई तुम्हाला भिशी लागली आहे तर पार्टी तो बनती है बॉस.
एक अशी फोटो काढू एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून.
आपल्या ग्रुपच नाव बाईपण भारी अस ठेवू की झिम्मा ?