“अभिनंदन” डॉक्टर. “नवीन पाहुण्याची तयारी करा.”
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण तिच्या मोठ्या काकु च्या चेहऱ्यावर मात्र आठ्या पडल्या. त्या खुप गोंधळल्या होत्या.
रागीणीला आता शुध्द आली होती. थोड्यावेळापुर्वी तिला चक्कर आली होती. राजेश तिला पटकन दवाखान्यात घेऊन गेला होता. डॉक्टरच म्हणण ऐकुन सगळ्यांच्या जीवात जीव आला. पण मोठ्या काकुचा गोंधळ खुप होत होता.
त्यांना राजेश आणि रागीणीच वागण गोंधळात टाकत होत. ते सगळे रागिणी च्या मोठ्या काकुकडे आले होते.
रागिणीला बेडरुममध्ये आराम करायला ठेवुन सगळे बाहेरच्या खोलीत आले.
“काय चालु आहे तुमच नक्की??” रागिणीची मोठी काकु.
“म्हणजे??” राजेशची आई.
“गेल्या दोन महिन्यापासून यांच भांडण चालु आहेत, कधी भेट झाली नव्हती मग हे कस काय??” मोठी काकु
“काय भांडण आणि या दोघांत??” राजेशची आई. त्यांनी गोंधळून राजेश कडे पाहील. त्याला थोड हसायला येत होत.
साधारणतः पाच ते सहा महिन्यापुर्वी.
तीन वर्षांपूर्वी राजेश आणि रागिणीच लग्न झाल होत. घरात राजेश, त्याचे आई वडील, राजेशची लहान बहीण सारीका आणि आता घरात आलेली रागिणी अस सुखी कुटुंब होत.
रागिणी त्या घरात अरेंज मॅरेज पद्धतीने आली होती. पण ती घरात अशी समरस झाली होती की जस काय ती पण त्यांचीच मुलगी होती.
ती घरात आल्यापासुन राजेश चे कमी आणि तिचेच लाड जास्त व्हायचे. सारीका ला तर तिची हक्काची मैत्रीण भेटली होती. दोघी मिळुन राजेशला खुप छळत होत्या.
“कधी कधी मला वाटत की मीच घरजावई आहे का काय??” राजेश वैतागून बोलत होता.
झाल अस की रागिणीला ऑफीसच्या टुरवर जायच होत. जी ४ दिवसांची होती. आता इतके दिवस लांब कस रहायच म्हणून तो रागिणीला जायची परमिशन देत नव्हता. मग रागिणीने सारीकाला हाताशी धरुन घरात राजेशच म्हणण सांगीतल होत.
मग राजेश चे वडील त्याला भांडले होते.
“जरा कुठ जायच म्हटल पोरीला, तर लगेच नाही बोलतो” राजेशचे वडील, “जा ग तु, हा कसा पाठवत नाही ते मी बघतो”
“थँक्यू बाबा” रागिणीने राजेशला वाकुल्या करुन दाखवल्या.
राजेशने त्याच्या घरच्यांना कडक लुक दिला होता.
रागिणी तिच्या ऑफीसच्या टुरवर गेली होती. इकडे राजेश मात्र तिच्या आठवणीत झुरत राहीला. खुप जीव होता एकमेकांवर त्यांचा. त्यांच्याकडे बघुन कोणाला वाटतच नव्हत की त्यांच अरेंज मॅरेज होत म्हणून.
याद आ रही है
तेरी याद आ रही है,
याद आने से तेरे जाने से
जान जा रही है.
सकाळच्या नाशत्याच्या वेळी सारिका राजेशकडे बघत गाण बोलत होती. बाकीचे गालातल्या गालात हसत होते.
राजेशने रागात सारीकाकडे पाहील.
“असा रागात नको बघुस, नाहीतर वहिनीला नाव सांगेल तुझ की तिच्यामागे तु पार्ट्या झोडत होतास म्हणून” सारिका
“अग बहीण आहेस की दुश्मन “ राजेश चिडुन बोलला.
“अरे हो किती चिडतोस” राजेशची आई “एवढी वाट तर आमची बघितली नाही कधी??”
राजेश बारीक तोंड करुन बसला.
“कळतं रे आम्हाला पण” राजेशचे वडील “आणि तुम्ही विसरल्या काय आपण गावावरुन यायला एक दिवस लेट झालो होतो तर आख्ख घर डोक्यावर घेतल होत त्याने??” राजेश च्या वडीलांना राजेशचा बारीक झालेला चेहरा बघवला गेला नव्हता.
“ती आली परत की तुम्ही फिरून या मस्त कुठेतरी” राजेशचे वडील.
“परत कशाला आत्ता तर जाऊन आलो होतो न” राजेश “पाहीजे तर आपण सर्व जाऊ.”
“ठिक आहे बघुया” राजेशची आई
“यिप्पी” सारिका आनंदाने ओरडली.
राजेश ने तिची केस ओढुन त्यावर पाणी ओतल, “तुला तर नंतर बघतो मी” राजेश हसत ऑफीसला जायला निघाला होता.
“जा न रे दादा, कितीवेळा सांगीतल माझ्या केसांना हात लावत जाऊ नकोस म्हणून “ सारीका चिडून बोलली.
“सोन्याची जशी केस” राजेश तिला वाकुल्या करत निघुन गेला.
क्रमशः
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
