Login

तुमच काही बिनसलय का अंतीम

मासूम दिसणारा जावई इतका करामती असेल अस रागिणीच्या काकुंना वाटलच नव्हत. राजेश ने त्यांना जवळ जाउन समजावले की गावाला आल्यावर सगळा वेळ फक्त आपल्या माणसांसाठी असतो.

मागील भागात. 

“बेटा तुमच्यात काही बिनसलय का??” रागिणचे मोठे काका

“तस नाही काही” रागिणी मान खाली घालुन बोलली.

“बाळा निट बोल न, उगाच जिवाला घोर नको लावुन” रागिणची काकु.

“ते तु फोनवर बोलली होतीस न, त्यांनी ते ऐकल. त्यांना राग आलाय की एवढी काळजी करतो तुझी तरी तुम्ही असे बोलले म्हणून” रागिणी हलकेच डोळे पुसत बोलली. “महीनाभर ते निट बोलत नाहीयेत माझ्याशी.”

आता पुढे. 

काकुंनी तर डोक्यालाच हात लावला.

“ठिक आहे, कर तु जॉब थोडे दिवस” काका.

तीन चार दिवस झाले रागिणी न जायच नाव घेत होती ना जावईबापु तिला घ्यायला येत होते. काकुंना आता खुप काळजी वाटायला लागली होती. कुठुन दुर्बुध्दी झाली आणि तिला फोनवर विचारल अस त्यांना झाल होत.

“अहो ऐका न, तुम्ही तरी जावईबापुंसोबत बोलुन बघा” रागिणीची काकु.

“हो, झालय बोलण” रागिणी चे काका निर्विकार होत बोलले होते, “उद्या येणार आहेत ते, उद्या बोलु.”

रागिणीच्या काकुंना त्यांच वागण विचित्र वाटल.

दुसऱ्या दिवशी राजेश त्याचे आई वडील आणि सारीका सोबत तिथे पोहोचला.

“ऐका न, माझीच चुकी होती, रागिणीची नाही” रागिणीची काकु राजेशला बोलत होती. राजेशचे घरचे गोंधळले की यांना काय झाल म्हणून.

तेवढ्यातच रागिणी चक्कर येऊन पडली होती. तिला पडताना बघुन राजेश दुसऱ्या सेकंदाला रागिणीजवळ पोहोचला होता.

“राणी काय झाल तुला, उठ न” राजेश घाबरला होता. तिला धरुन तो बोलत होता.

काकु परत गोंधळल्या.

“चल दवाखान्यात घेऊन जाऊ” काका.

तस राजेश ने रागिणीला उचलुन घेतले आणि जवळच्याच दवाखान्यात गेले. तेव्हा त्यांना ही आनंदाची बातमी समजली होती. पण काकूंच्या चेहरा अजुनही गोंधळलेला होता.

आजच्या दिवशी.

“तुम्हाला कोणी सांगीतल की यांच्यात भांडण झाली आहेत??” राजेशच्या वडीलांना आता राजेश वर डाऊट यायला लागला होता.

मग रागिणीच्या काकुंनी फोनवर झालेल बोलण पासुन इथवर रागिणी पोहोचेपर्यंत सर्व सांगुन दाखवल.

“म्हणजे तुम्ही पण फसलात राजेशच्या नाटकात” राजेशची आई

“म्हणजे??” रागिणीची काकु.

“तुमचा जावई दिसतो तसा नाहीये हो.” राजेशचे वडील “जाम खोडीचा आहे तो.” ते हसायला लागले होते. राजेशलाही हसायला येत होत.

राजेश रागिणीच्या काकुंजवळ गेला, त्यांचा हात हातात घेतला, “कस असत न, आम्ही तर रोज सोबत असतो. बोलतो, भांडतो, मस्करी करतो. पण ती माहेरी कधीतरीच येते न. आम्ही पण गावाला जेव्हा येतो तेव्हाचा सगळा वेळ त्यांच्यासाठीच देतो. आम्ही तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी येत असतो. हा माझ्याकडुन एवढीच चुक झाली की माझी जास्त ओळख आणि माहीती नसल्याने मी शांत बसलो होतो. तो वेळ फक्त तुमच्यासाठी असावा एवढीच मनाची इच्छा होती. माय लेकीचे सुंदर क्षण मी थोडीच वाया घालवु देणार आहे??”

“मग ते इतके दिवस आला नाहीत ते??” काकुंनी त्यांची दुसरी शंका विचारली.

“ते तिच्या ऑफीसची ब्रांच आहे इथे, तिथे तिच काम होत म्हणून ती पाच दिवस इथे होती.” राजेश

“म्हणजे रागिणी पण सामील होती तुमच्यात??” काकु लटक्या रागात बोलल्या.

“तो एकटा नाही, हा रमेशदादा पण साथीदार त्यांचा” सारीका

रागिणी चे काका पण हसायला लागले.

“म्हणजे तुम्हाला पण माहीती होत??” काकु

काकांनी होकारार्थी मान हलवली.

“व्याह्यांनी आधीच सांगुन दिले होते त्यांच्या मुलाचे कारनामे. पहीले तर माहीत नव्हतं,पण थोडी शंका आली होती. जस जावईबापुंनी रागिणीला पकडल न तेव्हा खात्री पटली की यांचे काहीतरी चालु होत म्हणून” काका. मग काकांनी ही राजेशच्या करामती सांगुन दिल्या.

“एकदा तर राजेशच्या बॅगमध्ये चिठ्ठी भेटली होती. तेव्हा तो दहावीत होता. कोणा मुलीने लिहीली होती त्याच्यासाठी.” राजेशची आई “हे इतके भांडले होते त्याला.”

“साहेबांनी काय कराव??” राजेशच्या वडीलांनी पुढे सुरवात केली, “त्या मुलीला घरी बोलावून त्याच्या आईसोबत तर सगळ खर खोट केल, पण तिचेच तीन चार केस उपटुन माझ्याच कपड्यांवर टाकले.”

रागिणी सकट तिच्या माहेर त्यांचे चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले.

“मग??” रमेश

“मग काय??” राजेशचे वडील “पुर्ण दिवस मी शिव्या खात बसलो होतो.”

“संध्याकाळी शाळेतुन साहेब आले आणि बोलतात कसे??” राजेशची आई “बघीतले का बाबा, चुकी नसताना ओरडा बसल्यावर कस वाटत??”

“मग तुम्ही काही बोलल्या नाही त्यांना, एवढ केल्यावर??” रागिणी ची काकु.

“तिलाच हाताशी धरुन तर केल होत त्याने” राजेशचे वडील.

परत एक हास्याची लहर उसळली.

“म्हणजे सगळे मणी एकाच माळेत आले म्हणायचे” काकु ओलावलेले डोळे हलकेच पुसत बोलल्या.

“आज एवढी चांगली बातमी भेटली म्हणून सोडते सगळ्यांना” काकु ठसक्यात बोलल्या.

तेव्हा मागे भिंतीआड लपलेली रागिणी हळुच येऊन तिच्या काकुच्या कुशीत शिरली. तिला बर वाटल्याने ति बाहेरच्या खोलीत येत होती तेव्हा बाहेर चाललेला कार्यक्रम बघुन ति मागेच लपली होती.

“अग हळु” काकु “कशाला लगेच बाहेर आलीस??”

“तुम्हाला रडवल न आम्ही” रागिणीने कान पकडले “सॉरी.”

“तुला तर निटच बघणार आहे मी” काकुंनी तिला मिठीत घेतल. “पण आता तुला जास्तच काळजी घ्यायला हवी.”

“बोलली होती न तुला, जेव्हा त्याला द्यायच असत तेव्हा तो सहज देतो” राजेशची आई त्यांचा हात वर करुन बोलल्या होत्या.

रागिणीने होकारार्थी मान हलवली त्यांनाही तिने मिठी मारली.

सगळे हसण्यात सामील झाले. आयुष्याच्या एका नवीन पर्वाची सुरवात करण्यासाठी सगळे सज्ज झाले होते.

समाप्त.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →