मागील भागात.
राजेश च्या काकांना दोन्ही मुलच होती. एक महेश आणि दुसरा आदेश. त्यामुळे गावी आल्यावर देखील सारीका चे भरपुर लाड व्हायचे. मग राजेश, महेश आणि आदेश एका साईडला पडायचे आणि पुर्ण घरात फक्त सारीका चा जप असायचा. तिघांचाही खुप जीव होता सारीका वर. पण भांडण झाल्याशिवाय भावा बहिणीच नात पुर्ण होत का??
आता पुढे.
आता तर त्यांची लाडकी वहिनी पण त्यांचा सोबत होती. त्यामुळे ब-याच दिवसांपासून शांत असणार घर आज भरलेल दिसत होत. दुसऱ्या दिवशी सारिका ने तिच्या तिघा भावांना ओवाळल. त्यांच्याकडुन चांगलीच ओवाळणी घेतली होती तिने. नंतर मग राजेश आणि रागिणी तिच्या माहेरी गेले.
तिकडे पोहोचल्यावर सविता ला पाहुन तिला खुप आनंद झाला. कारण ती येणार नव्हती अस रमेश तिला बोलला होता. तिला सरप्राईज द्यायला सविताच येण रागिणीला सांगीतल नव्हतं. तिथेही भाऊबीजचा कार्यक्रम चांगलाच झाला होता.
राजेश मात्र एका बाजुला शांत बसला होता. जेवढ्याला तेवढच बोलत होता. रागिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद तो त्याच्या डोळ्यात साठवून घेत होता. पुर्ण दिवस राजेश रागिणी सोबत जास्त बोलला नाही. तिला हव तस त्याला करु द्यायच होत.
रागिणीच्या मोठ्या काकुंना ही गोष्ट जरा खटकली की, राजेश जास्त काही बोलतच नाहीये रागिणी सोबत. आल्या पासुन गप्प गप्पच बसलाय. पण रागिणीला एवढ्या आनंदात पाहुन त्यांनी तिला नंतर विचारु हा विचार केला होता.
राजेश त्याच्या कुटुंबासोबत परत घरी निघुन आला होता. त्यांच डेली रुटीन सुरू झाल होत.
एक दिवस रागिणीच्या मोठ्या काकुंनी रात्री रागिणीला फोन केला होता.
“हा आई बोल न” रागिणी तिच्या मोठया काकुंना आईच बोलत होती.
“बाळा कशी आहेस??” मोठी काकु
“एकदम मस्त, पण तुझ्या आवाजाला काय झालय??” रागिणीला काळजी वाटली, “बर वाटत नाहीये का तुला??”
“मी ठिक आहे ग, जरा बोलायच होत” मोठी काकु
“बोल न मग” रागिणी
“तुमच्यात सर्व ठिक आहे न??” मोठी काकु
“आमच्यात??” रागिणी
“अग जावईबापु आणि तुझ्यात ग??” मोठी काकु
जावईबापु ऐकताच राजेश ने फोन कडे कान टवकारले. फोन स्पीकर वर होता. रागिणी फोन स्पीकर वरुन काढणार तेवढ्यात राजेश ने नाही मध्ये मान हलवली. त्यालाही काकु अशा का बोलल्या जाणुन घ्यायच होत.
“आमच एकदम मस्त चालु आह़े.” रागिणी “अस का विचारतोस तु??”
“ते इकडे आले तुम्ही तेव्हा तुझ्याशी ते जास्त बोलले नाहीत न, आले तसे गप्प गप्प बसुन होते. मग जरा काळजी वाटली तुझी” मोठ्या काकु ने त्यांची शंका बोलुन दाखवली.
राजेशला त्यांची काळजी ऐकुन थोड हसायला आल. मग त्याच्यातला खट्याळपणा जागा झाला. त्याने रागिणला इशारातच सर्व ठिक आहे अस सांगायला लावुन फोन पटकन ठेवायला लावला होता.
“अस का सांगीतल ओ करायला??” रागिणी गोंधळली.
“आताचा वेळ फक्त माझा आहे” राजेशने रागिणीला मिठीत घेतले.
तिकडे रागिणीच्या काकुंना टेन्शन आल होत. कारण रागिनीने पटकन फोन कट केला होता.
पुर्ण महिनाभराने राजेश ने रागिणीला तिच्या काकुंसोबत जास्त बोलूच दिल नव्हत. महिनाभराने रागिणी तिच्या माहेरी जायला निघाली होती. निघताना ती हसत निघाली होती. पण तिच्या माहेरी पोहोचल्यावर तिने अश्रु गाळायला सुरवात केली.
तिला अस अचानक आलेल्या पाहुन तिच्या मोठ्या काकुंना टेन्शन आल होत.
तिच्या मोठ्या काकुंनी विचारले की काय झाल म्हणून पण तेव्हा तिने आठवण येत होती अस सांगुन त्यांना टाळल होत.
“मी इथेच जॉब बघणार आहे” रागिणी.
तिच वाक्य ऐकुन काकुंना त्यांची शंका खरी वाटायला लागली होती.
“बेटा तुमच्यात काही बिनसलय का??” रागिणचे मोठे काका
“तस नाही काही” रागिणी मान खाली घालुन बोलली.
“बाळा निट बोल न, उगाच जिवाला घोर नको लावुन” रागिणची काकु.
“ते तु फोनवर बोलली होतीस न, त्यांनी ते ऐकल. त्यांना राग आलाय की एवढी काळजी करतो तुझी तरी तुम्ही असे बोलले म्हणून” रागिणी हलकेच डोळे पुसत बोलली. “महीनाभर ते निट बोलत नाहीयेत माझ्याशी.”
क्रमशः
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
