Login

तुमच काही बिनसलय का भाग ३

लॉकडाऊन मुळे राजेशला काही त्याच्या सासरी जायला जमल नव्हते. दिवाळीच्या निमित्ताने तो त्याच्या गावी ाणि सासरी असा जाणार होता.

मागील भागात. 

अचानक झालेल्या स्पर्शाने रागिणी दचकली. राजेश च्या आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला. तस रागिणीने त्यांना मिठी मारून तिच्या अश्रूंना वाट करुन दिली.

“सॉरी न आई, माझ काय चुकतंय तेच कळत नाहीये. तुम्हाला तुमच्या वाटेचा आनंदच मला देता येत नाहीये” रागिणी रडत बोलत होती.

आता पुढे. 

“वेडी आहेस का ग तु??” राजेशची आई “काही काय विचार करते? जस काय तुझ वय होऊन चाललय. जेव्हा त्याला द्यायच असेल तेव्हा तो देणारच आहे.”

“आता सुमीच बघ न” सुमित्रा ची आई “५ वर्षानंतर पाळणा हललाय. तुमच तर फक्त ३ वर्ष झालेत न. आणि बाकीच्या लोकांच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊन. एवढे मायबापासारखे जिव लावणारे सासु सासरे भेटले आहेत, मग कशाला टेन्शन घेते??”

सुमित्रा च्या आईच बोलण ऐकुन रागिणी थोडी शांत झाली होती. तेव्हापासून रागिणीला जरा जास्तच जपत होते.

रागिणी ने टुरवरून परत येताना खुप सारे गिफ्ट्स घेउन आली होती. राजेशसाठी जरा खास गिफ्ट आणल होत. रागात होते न साहेब, मग त्यांना मनवायच होत रागिणीला.

आज रात्री रागिणीने राजेशच्या आवडीचा शॉर्ट ड्रेस घातला होता. खास राजेश आवडतो तसा पिंक कलरचा. राजेश तर तिला पाहून ब्लँक झाला होता. त्याचा राग तर कुठल्या कुठे पळुन गेला होता. त्या एका रात्रीत राजेशने ४ दिवसाची कसर भरुन काढली होती.

दिवाळी आली होती. रागिणी भाऊबीज साठी गावाला जाणार होती. मग सगळेच गावाला जायला निघाले होते. तिकडे गेल्यावर राजेश मात्र शांत शांत रहात होता.

रागिणीच्या आईने जरा लवकरच जगाचा निरोप घेतला होता. रागिणी तेव्हा बारा तेरा वर्षाची होती. तिची आई गेल्यावर तिच्या वडीलांना दुसर लग्न करण्याचे सल्ले खुप लोकांनी दिले. पण त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल होत.

तेव्हापासून तिच्या मोठ्या काकूंनी रागिणीला पोटच्या मुलीसारख जपल होत. गावाला तिचे मोठे काका, काकु हे रागिणीच्या घराच्या बाजुलाच रहात होते. जस रागिणी ची आई देवाघरी गेली, तस त्यांनी दोन्ही घर एकत्र करून घेतले होते. त्यामुळे घरही जरा ऐसपैस झाल आणि दोन्ही कुटुंब एकत्र रहायला लागले. रागिणीच्या वडीलांचे ही रागिणी बद्दल निश्चित झाले होते.

तिच्या मोठ्या काकांना दोन मुल. मोठा रमेश आणि लहान सविता. दोघांची लग्न झालेली होती. दोघही रागिनी पेक्षा मोठे त्यामुळे घरातल शेंडे फळ म्हणून तिचे खुप लाड झाले होते.

तिन वर्षापुर्वी राजेशच स्थळ चालुन आल होत रागिणी साठी, चांगल घर असल्याने लगेच रागिणी चे हात पिवळे करण्यात आले होते.

तिच्या घरी तिला बघायला आलेला राजेश आणि त्यांचा घरी असणारा राजेश बघुन तिला समाधान वाटल होत. कारण बघायला लागला राजेश तिला एकदम खडूस दिसला होता. तिला वाटल होत की \"खुप अटिट्युड आहे त्याला.’ पण लग्नानंतर सासरी गेल्यावर राजेशच दुसर रुप बघुन तिला स्वप्नातला राजकुमार आल्याची फिलींग तिला आली होती.

राजेशला त्याच्या सासरी जायला ह्या तीन वर्षात जास्त जमले नव्हते. कारण त्यांच लग्न झाल्या झाल्या लॉक डाऊन लागल होता. त्यामुळे त्याचा स्वभाव अजुनही तिकडच्यांना कळला नव्हता.

राजेश त्याच्या घरच्या सर्व मंडळी सकट गावाला पोहोचला होते. दुसऱ्या दिवशी ते रागिणीच्या माहेरी जाणार होते.

राजेश च्या गावी देखील त्याचे लहान काका काकु रहात होते. शेताच्या मध्यभागी त्यांच घर होत. राजेश च्या वडीलांना शहरात नोकरी लागल्याने ते शहरात रहायला आले होते. बाकी त्यांच मन कर गावाकडे अडकून रहात होत.

राजेश च्या काकांना दोन्ही मुलच होती. एक महेश आणि दुसरा आदेश. त्यामुळे गावी आल्यावर देखील सारीका चे भरपुर लाड व्हायचे.

मग राजेश, महेश आणि आदेश एका साईडला पडायचे आणि पुर्ण घरात फक्त सारीका चा जप असायचा. तिघांचाही खुप जीव होता सारीका वर. पण भांडण झाल्याशिवाय भावा बहिणीच नात पुर्ण होत का??

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →