मागील भागात.
“ती आली परत की तुम्ही फिरून या मस्त कुठेतरी” राजेशचे वडील.
“परत कशाला आत्ता तर जाऊन आलो होतो न” राजेश “पाहीजे तर आपण सर्व जाऊ.”
“ठिक आहे बघुया” राजेशची आई
“यिप्पी” सारिका आनंदाने ओरडली.
राजेश ने तिची केस ओढुन त्यावर पाणी ओतल, “तुला तर नंतर बघतो मी” राजेश हसत ऑफीसला जायला निघाला होता.
“जा न रे दादा, कितीवेळा सांगीतल माझ्या केसांना हात लावत जाऊ नकोस म्हणून “ सारीका चिडून बोलली.
“सोन्याची जशी केस” राजेश तिला वाकुल्या करत निघुन गेला.
आता पुढे.
राजेश बाहेर जरी शांत दिसत असला तरी त्याच्या अंगात खुप करामती होत्या. घरातल्या लोकांवर एवढे प्रँक करायचा तो कि बास रे बास. जाता जाता त्याने सारीका ची केस मुद्दाम ओढुन विस्कटून ओली केली होती. शेवटी तिच्या पायी रागिणी त्याच्यापासून काही दिवसांसाठी लांब गेली होती. मग त्याचा बदला तर त्याला घ्यायचा होता.
जस सारिकाने केस सुकवायला हेअर ड्रायर चालु केला तस सगळी पावडर तिच्या चेहरा आणि केसांवर उडाली.
“दादु आय विल किल यु” सारीका जोरात ओरडली.
तिचा आवाज ऐकून तिची आई सारीकाच्या खोलीत आली. तिचा अवतार बघुन तिचा जोरात हसायला लागली. त्यांनी लगेच तिचा फोटो काढला.
“तरीच म्हटल, राजेश ने तुझा फोटो का काढायला सांगीतला होता.” राजेशची आई.
सारीका पाय आपटत बाथरुममध्ये निघुन गेली, “तुला तर बघतेच आता, फक्त वहिनीला घरी येऊदे” सारीका मनातच भांडत बोलली.
एकदा तर राजेश च्या आईने गुलाबजाम बनवले होते. मोजकेच बनवले असल्याने सगळ्यांना ते मोजुन दिले होते.
समोरच्या टेबलावर राजेश च्या आईच्या वाटेचे गुलाबजाम ठेवलेले होते. राजेशचे बाबा आतल्या खोलीत काही कामासाठी गेले असताना, राजेश ने गुपचुप येऊन ते फस्त केले होते. आणि तो पटकन त्याच्या ऑफिसला पळून गेला होता.
इकडे दिवसभर राजेशचे वडील त्यांच्या बायकोचे बोलणे ऐकत राहीले होते. त्यांना कळतच नव्हत की गुलाबजाम खाल्ले कोणी म्हणून.
तेव्हा रागिनीने राजेशचा गुलाबजाम खाताना काढलेला व्हिडीओ त्यांना पाठवला.
“आख्खा दिवस मी शिव्या खाऊन झाल्यावर तुला आठवल का??” राजेशचे वडील लटक्या रागात सारीका ला बोलत होते.
“सॉरी बाबा, यांनीच सांगीतल होत, पण मग मलाच रहावल गेल नाही म्हणून मग आत्ता पाठवल” सारीका.
“येऊदे त्याला संध्याकाळी मग बघतो त्याला” राजेश च्या वडीलांनी ती व्हिडिओ त्यांच्या बायकोला पाठवली.
“पोराने खाल्ल न, मग काय झाल??” राजेश च्या आईने राजेशची बाजु घेतली होती.
“पण पुर्ण दिवस तर तु मलाच भांडलीस न” राजेशचे वडील.
“मला मज्जा वाटते” राजेशची आई हसत बोलल्या.
त्या दिवशी घरी परत येताना राजेश ने चांगले ५ किलो गुलाबजाम घेउन आला होता. त्या रात्री जेवणासोबत गुलाबजामची पार्टी झाली होती.
त्यांच्या घरात हे अस वातावरण नेहमीच चालायच. राजेश काही न काही मस्करी करतच रहात होता.
एवढ सगळ आनंदात असताना एक दुख: मात्र राजेश आणि रागिणीला होत की ३ वर्ष होत आले होते. पण अजुन घरात पाळणा हलत नव्हाता. पण राजेश च्या घरी याबाबत रागिणीला कधीही जाणिव करुन दिली नव्हती.
शेजारची सुमित्रा तिच्या बाळंतपणासाठी घरी आलेली होती. काही दिवसांपुर्वीच तिने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला होता. ते बघुन रागिणीला खुप भरुन आले होत. तिचे डोळे पाणावले होते. सुमित्रा ची आई आणि राजेश च्या आईने ते पाहील. रागिणी आतल्या रुममध्ये निघुन गेली होती.
अचानक झालेल्या स्पर्शाने रागिणी दचकली. राजेश च्या आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला. तस रागिणीने त्यांना मिठी मारून तिच्या अश्रूंना वाट करुन दिली.
“सॉरी न आई, माझ काय चुकतंय तेच कळत नाहीये. तुम्हाला तुमच्या वाटेचा आनंदच मला देता येत नाहीये” रागिणी रडत बोलत होती.
