तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 99
“आज अनिकेत, आपण बाहेर जेवायला जाऊ… मजा येईल,” आजोबा म्हणाले.
“हों, चला,” अनिकेत म्हणाला.
“अशोक, ललितालाही सांग… आणि संजय, तुम्ही पण चला,” आजोबा म्हणाले.
“तुम्ही जा… आम्ही घरी जातो,” संजय म्हणाले.
“तुम्ही पण दिवसभर काम करत आहात… आरतीला आराम नको का?” आजोबा म्हणाले.
संजय काहीच बोलले नाहीत…
“आम्ही तयार होऊन येतो,” शुभम म्हणाला.
“आम्ही पण घरी जाऊन येतो,” अशोक म्हणाले.
ते सगळे त्यांच्या त्यांच्या घरी गेले.
अनघा आणि अनिकेत त्यांच्या रूममध्ये गेले.
अनघा कपाट उघडून कपडे काढू लागली. “आज काय घालू?” ती म्हणाली.
अनिकेत हसत म्हणाला, “तू काहीही घाल… तू सुंदरच दिसतेस.”
“बस करा आता… रोजच तेच डायलॉग,” अनघा हसत म्हणाली.
“अरे खरंच सांगतो आहे,” अनिकेत म्हणाला.
अनघा एक छान ड्रेस काढते. “हा चालेल का?” ती विचारते.
“परफेक्ट,” अनिकेत म्हणाला.
दोघेही तयार व्हायला लागले… बाहेर जायची हलकीशी उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती…
अशोकने ललिताला सांगितले, “आपण हॉटेलमध्ये जातो आहे… अनिकेत सगळ्यांना घेऊन जाणार आहे… तू येणार आहेस का?”
“हों… मी पण येईल,” ललिता म्हणाल्या.
“मग तयार हो,” अशोक म्हणाले.
मोनिका तर आल्या बरोबर तिच्या रूममध्ये निघून गेली होती… ती पण तयार व्हायला लागली होती.
संजय आणि त्यांचे कुटुंबही घरी गेले… सगळे तयार झाले आणि परत अनिकेतकडे आले.
अशोक आणि ललिता पण तयार होऊन आले होते.
अनघा आणि अनिकेत, तसेच आजोबा पण तयार होते… सगळे छान दिसत होते.
घरात एकदम उत्साहाचं वातावरण झालं होतं.
सगळे एकत्र बाहेर पडले… गप्पा मारत, हसत…
ते सगळे हॉटेलला जायला निघाले…
ते सगळे एक छान अशा हॉटेलला पोहचले. बाहेरूनच हॉटेल खूप सुंदर दिसत होते. लाईट्स, डेकोरेशन सगळं खूप आकर्षक होतं.
मॅनेजरने एवढे लोक एकत्र येताना पाहिले आणि तो खूप खुश झाला.
“वेलकम सर… किती लोक आहेत?” मॅनेजर हसत विचारतो.
अनिकेत म्हणाला, “आम्ही सगळे एकत्र आहोत… थोडी मोठी जागा मिळेल का?”
“हो सर, नक्की… तुम्हाला लगेच टेबल अरेंज करून देतो,” मॅनेजर म्हणाला.
त्याने लगेच स्टाफला सांगितले. मोठं टेबल लावलं गेलं. सगळे आरामात बसले.
सगळे बसल्यावर वेटरने मेन्यू कार्ड दिलं.
“काय ऑर्डर करायचं?” अनिकेत म्हणाला.
“आज सगळ्यांच्या आवडीचं ऑर्डर करूया,” आजोबा आनंदाने म्हणाले.
सगळे आपापल्या आवडीचे पदार्थ सांगू लागले.
मोनिका आणि अनघा एकमेकांकडे बघत हसत होते… अनिकेत त्यांना बघून हळूच स्माईल देत होता.
ललिता सगळ्यांकडे बघत होती… तिच्या चेहऱ्यावरही आज थोडं समाधान दिसत होतं.
सगळे मस्त गप्पा मारत होते… हसत होते…
थोड्याच वेळात गरम गरम जेवण टेबलवर येऊ लागलं… आणि सगळ्यांचा आनंद अजून वाढला..
सगळे मस्त गप्पा मारत बसले होते. वातावरण एकदम हलकं-फुलकं झालं होतं. मोनिका आणि शुभम तर वेगळीच मस्ती करत होते एकमेकांना चिडवत, हसत, सगळ्यांना हसवत होते.
हॉटेल खूप छान होतं. लाईट्स, म्युझिक आणि सगळीकडे छान वातावरण होतं.
थोड्याच वेळात वेटर जेवण घेऊन आला. त्याने एक एक करून सगळ्यांसमोर डिशेस ठेवायला सुरुवात केली. गरमागरम पदार्थांचा वास सगळीकडे पसरला.
सगळ्यांना जेवण दिलं गेलं आणि वेटर निघून गेला.
“वा… खूप छान दिसतं आहे,” अनघा म्हणाली.
“आज तर सगळं स्पेशल आहे,” आजोबा हसत म्हणाले.
सगळ्यांनी निवांतपणे जेवण सुरू केलं. गप्पा, हसणं, आणि मध्येच मस्ती सगळ्यांमध्ये एक वेगळाच आनंद होता.
जेवण खूपच छान झालं. सगळ्यांनी पोटभर जेवलं.
जेवण झाल्यावर ते सगळे थोडावेळ हॉटेलमध्येच फिरले. कोणी फोटो काढत होते, कोणी गप्पा मारत होते…
मोनिका आणि शुभम पुन्हा मस्ती करत होते… अनिकेत आणि अनघा त्यांना बघून हसत होते.
थोड्यावेळाने सगळे एकत्र बाहेर आले.
आणि मग सगळे हळूहळू आपल्या घरी निघून गेले… त्या दिवसाच्या छान आठवणी मनात घेऊन…
असेच दिवस हळूहळू पुढे सरकत होते.
अनघा, तिचे आई-बाबा, अशोक आणि आजोबा सगळ्यांनी मिळून नवीन घरातलं सगळं सामान व्यवस्थित लावून टाकलं होतं. घर आता पूर्णपणे सजलं होतं प्रत्येक गोष्ट नीट जागेवर, एकदम घरासारखं वाटायला लागलं होतं.
अनघाही आता परत ऑफिसला जायला लागली होती. घर आणि काम दोन्ही सांभाळत होती, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.
उद्या मोनिका आणि रोनकची एंगेजमेंट होती… त्यामुळे सगळ्यांच्या मनात उत्साह होता.
अशोक अनिकेतकडे आले होते. दोघं बसून एंगेजमेंटच्या तयारीबद्दल बोलत होते. जेवणाची ऑर्डर दिली होती, त्याचीही एकदा खात्री करून आले होते. काही कमी-जास्त राहिलं नाही ना, सगळं व्यवस्थित आहे ना याची काळजी घेत होते.
अनघाने घर पूर्णपणे साफ करून घेतलं होतं. सगळं नीट लावून ठेवलं होतं. उद्याच्या कार्यक्रमासाठी घर तयार होतं.
मोनिका तर पूर्णपणे स्वप्नात हरवली होती… उद्या तिची एंगेजमेंट… तिच्या चेहऱ्यावर सतत एक गोड स्माईल होती. कधी ती स्वतःशीच हसत होती, कधी आरशात स्वतःकडे बघत होती.
तिकडे रोनकही शांत बसलेला नव्हता. तोही विचारात गुंतला होता
“उद्या एंगेजमेंट कशी होईल… मोनिका माझी होईल… तिला काही स्पेशल गिफ्ट घ्यावं का… काय आवडेल तिला…”
असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते.
दोघांच्या मनात एकच भावना होती, उद्या त्यांचं नातं आणखी एक पाऊल पुढे जाणार होतं… आणि त्या विचारानेच दोघंही मनोमन खुश होते…
अनघा शांतपणे बसून मोनिकाच्या हातावर मेहंदी काढत होती. तिचे हात खूपच सुंदर दिसत होते नाजूक डिझाईन, बारीक रेषा… सगळं अगदी परफेक्ट.
शुभमही तिथेच बसला होता आणि त्याला गप्प बसायचं नव्हतंच.
“ताई, मोनिका ताईच्या हातावर रोनक जीजूचं नाव लिही… बघ मग मेहंदी कशी छान रंगते,” शुभम खोडकरपणे म्हणाला.
मोनिका त्याच्याकडे बघत चिडून म्हणाली, “शुभम, तू गप बस ना… तुझे काम कर. कशाला माझ्या मागे लागला आहेस?”
“अरे, मी तर मदतच करतो आहे… जीजूचं नाव असेल तरच खरी मेहंदी!” शुभम पुन्हा चिडवत म्हणाला.
मोनिका लाजतच अनघाकडे बघू लागली.
अनघा हसत म्हणाली, “लिहू का नाव?”
“नको… काहीही नको लिहू!” मोनिका पटकन म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावरची लाज सगळं सांगत होती.
शुभम अजूनच हसायला लागला. “ताई, बघ ना कशी लाजते आहे!”
सगळे त्यांची मस्ती बघून हसत होते.
अनघा शांतपणे मेहंदी काढत होती, पण हलकंसं स्माईल तिच्याही चेहऱ्यावर होतं.
घरात एकदम आनंदाचं वातावरण होतं, मस्ती, हसणं आणि लग्नाची गोड चाहूल…
रोनकच्या घरी पण एंगेजमेंटची तयारी जोरात सुरू होती. त्याची मॉम सगळी गिफ्ट्स, कपडे आणि मोनिकासाठी घेतलेल्या वस्तू नीट पॅक करत होत्या. प्रत्येक वस्तू त्यांनी खूप प्रेमाने निवडली होती साडी, ज्वेलरी, छोट्या छोट्या गिफ्ट्स… सगळं एकदम छान पॅक करून तयार ठेवलं होतं.
“मोनिकाला हे खूप आवडेल,” त्या स्वतःशीच हसत म्हणत होत्या.
तिकडे रोनक मात्र पूर्णपणे विचारात हरवला होता. त्याच्या डोक्यात फक्त मोनिका होती
“उद्या ती कशी दिसेल… कोणती साडी घालेल… केस कसे ठेवेल…”
तो स्वतःच त्या विचारात हसत होता.
त्याने मोबाईल हातात घेतला…
“कॉल करू का तिला?” तो मनात विचार करू लागला.
“पण ती कुठे असेल आता? नक्की अनिकेतकडेच असेल… तिथे सगळे असतील… नीट बोलताही येणार नाही…”
त्याने थोडं नाराज होत मोबाईलकडे पाहिलं.
“ती माझ्यासोबत नीट बोलतच नाही… लगेच कॉल ठेवते…”
तो हलकंसं हसला…
“उद्या बघतोच… किती पळते ते…”
असं म्हणत त्याने मोबाईल बाजूला ठेवला, पण चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती… कारण उद्या त्याची मोनिका त्याच्या आयुष्यात आणखी जवळ येणार होती…
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा