Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 97

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 97


अनघाने रात्रीचे घरातले आवरले… ते रात्री लवकर झोपले. उद्या त्यांना सगळं सामान घेऊन, सकाळी लवकर नवीन घरात जायचं होतं.

आजोबा पण अनिकेत आणि अनघा गेल्यावर… तेही आश्रमात जाणार होते…

मोनिका पण झोपायला तिच्या रूममध्ये गेली होती. तिला रोनकचा कॉल आला… तिने लगेच घेतला.

“हॅलो…” मोनिका म्हणाली.

“हॅलो मोनिका…” रोनक म्हणाला.

“जेवण झालं का? काय करत होतात?” मोनिका म्हणाली.

“हो झालं… तुलाच आठवत होतो… गोड प्रसाद खाऊन गोड मुलीची खूप खूप आठवण येत आहे…” रोनक म्हणाला.

“मी गोड आहे का? लग्न झाल्यावर माझा तिखटपणा पण दिसेल,” मोनिका म्हणाली.

“बापरे… मी घाबरलो,” रोनक हसत म्हणाला.

“हसू नका… खरंच सांगते आहे,” मोनिका म्हणाली.

“मला तुला गोड करता येईल,” रोनक म्हणाला.

“कसं काय?” मोनिका म्हणाली.

“तुला गोड गोड पप्पा देऊन… ती कला माझ्यामध्ये तेव्हा येईल ना,” रोनक म्हणाला.

मोनिका लाजली…  काहीच  बोलली नाही.

“आता लाजू नको… नाहीतर तुला बघायला मला तुझ्या घरी यावं लागेल,” रोनक म्हणाला.

“आता नका येऊ… मी झोपते आहे. सकाळी लवकर दादा नवीन घरात राहायला जाणार आहे… मी पण तिथे जाईल… अनघा घरी आहे, पण दादाला ऑफिसला जायचं आहे,” मोनिका म्हणाली.

“ठीक आहे… झोप. मी पण झोपतो… गुडनाईट,” रोनक म्हणाला.

“गुडनाईट…” मोनिका म्हणाली.

कॉल कट झाला… आणि ती झोपून गेली….


पण आजोबांना झोप येत नव्हती… उद्या हे घर सोडून जायचं होतं… इथे खूप आठवणी होत्या…  ते सगळे घर  बघत होते.  त्यांच्या आणी त्यांच्या बायकोच्या आठवणी होत्या.

त्या आठवणीतच ते हरवले होते…
कधी तरी त्यांना झोप लागली…


अनघाने सगळं आवरून घेतलं होतं… अनिकेत पण उठला होता. आज अनिकेतचा डब्बा अनघा तिच्या आईकडून काढून घेणार होती… नाश्ता ते बाहेर करणार होते.

दोघांचं आवरून झालं.

“अनघा, आजोबांचा लागणारा सामान घे… आजोबांना पण आपण आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत,” अनिकेत म्हणाला.

“मी पण तिकडेच जाणार होते,” अनघा म्हणाली.

“बरं, मी पण येतो… लवकर बॅग भरून होईल, आपल्याला लवकर निघता येईल,” अनिकेत म्हणाला.

“हो, चल,” अनघा म्हणाली.

अनिकेत आणि अनघा आजोबांच्या घरी गेले… दरवाजा वाजवला… आजोबांनी लगेच उघडला.

“गुड मॉर्निंग,” अनिकेत आणि अनघा म्हणाले.

“गुड मॉर्निंग,” आजोबा म्हणाले.

अनघाने बघितलं… आजोबांनी आधीच बॅग भरल्या होत्या.
“अनिकेत, आजोबांनी आधीच बॅग भरल्या आहेत,” ती म्हणाली.

“आपलं काम वाचलं… चल, आपल्याला लवकर निघता येईल,” अनिकेत म्हणाला.

“तुम्ही दोघं काय बोलत आहात? कुठे निघायचं आहे?” आजोबा म्हणाले.

“आमच्या सोबत… नवीन घरी,” अनिकेत म्हणाला.

“खरंच?” आजोबा आनंदाने म्हणाले.

“तुम्ही बॅग का भरल्या होत्या?” अनघा विचारली.

“मी… आश्रमात जायचा विचार करत होतो…” आजोबा मान खाली घालत म्हणाले.

“आजोबा! आम्ही असताना तुम्ही आश्रमात जाणार होतात का? आम्ही तुम्हाला कधीच जाऊ देणार नाही… तुमचं सामान कमी आहे म्हणून काही बोललो नाही, मी लगेच भरून टाकलं असतं,” अनिकेत म्हणाला.

“तुम्ही जाणार… मी एकटा पडेल… म्हणून मी आश्रमात जायचा विचार केला,” आजोबा हळू आवाजात म्हणाले.

“आम्ही असताना तुम्हाला कुठेच जायची गरज नाही,” अनघा प्रेमाने म्हणाली.

“तयार व्हा… थोड्याच वेळात आपण निघू,” अनिकेत म्हणाला..

अनघा आणी अनिकेत त्यांच्या घरी  सगळे  बॅग  बाहेर  घेऊन आल्या...  त्यांनी  ते  घर  बघितले..   त्यांच्या पण  तिथे आठवणी होत्या.   सुख दुःख दोघी पण  त्यांनी तिथे अनुभवले होते. 


“आरती, सकाळी भाजी-पोळी का बनवत आहेस? तू कुठे जाणार आहेस का?” संजय म्हणाले.

“अनिकेतला डब्बा द्यायचा आहे… ते सकाळी नवीन घरी येत आहेत. अनघा कसा डब्बा बनवणार? म्हणून मीच तिला म्हटलं, मी बनवते,” आरती म्हणाल्या.

“चांगलं केलंस… बघ ना, ललिता वहिनीला काहीच वाटत नाही. पूजेला पाहुण्यासारख्या आल्या… आणि नंतर लगेच निघून गेल्या,” संजय म्हणाले.

“जाऊ द्या… त्या बाईंना काहीच समजत नाही. कधी डोळे उघडतील कोण जाणे… आता मोनिकाचं पण लग्न होऊन जाईल… अशोक भाऊजी पण अनघा आणि अनिकेतकडे राहायला जातील… आजोबा पण तिथेच असतील, चांगलंच आहे,” आरती म्हणाल्या.

“तू म्हणतेस ते पण बरोबर आहे… अशोक अनिकेतकडेच जातील. नाश्ता नसेल बनवला तर बाहेरून घेऊन येतो,” संजय म्हणाले.

“बाबा, मी आणला आहे… चला गरम आहे, आपण लगेच खाऊन घेऊ,” शुभम म्हणाला.

त्यांनी सगळ्यांनी मिळून नाश्ता करून घेतला.


“गुड मॉर्निंग बाबा,” मोनिका म्हणाली. ती लवकर तयार झाली होती.

“गुड मॉर्निंग मोनिका,” अशोक म्हणाले.

ललिताने नाश्ता आणला होता, पण डब्बा अजून तयार झाला नव्हता. मोनिका आधीच तयार झाली होती.

“आई, मी कॅन्टीनमधून खाऊन घेईन… तू नको काळजी करू,” मोनिका म्हणाली.

“तुला काही मिटिंग आहे का? तू इतकी लवकर ऑफिसला जात आहेस?” ललिता म्हणाल्या.

“मी ऑफिसला नाही जात… मी अनिकेत दादाकडे जाणार आहे,” मोनिका म्हणाली.

“मी पण येतो,” अशोक म्हणाले.

ललिता काहीच बोलल्या नाहीत… सगळ्यांनी नाश्ता करून घेतला.

अशोक आणि मोनिका अनिकेतच्या घराजवळ आले… अजून अनिकेत आणि अनघा आले नव्हते.

थोड्याच वेळात संजय आणि आरतीही आले.

काही वेळाने… अनघा, अनिकेत आणि आजोबा तिथे पोहोचले…


....

अरे तुम्ही सगळे आले. अनघा म्हणाली.

अनिकेतने घर ओपन केले. सगळे मध्ये गेले. सगळा सामान आत ठेवला. अनिकेत म्हणाला, "मी निघतो." त्याने  काल त्यांची बाईक इथेच ठेवली होती.

आरतीने अनिकेतला डब्बा दिला.

अशोकला वाईट वाटले… हे ललिताने करायला पाहिजे होते, तर अनघाच्या आईने दिला…

"दादा मी पण येते तुझ्यासोबत, मला पण सोड," मोनिका म्हणाली.

"हों चल… अनघा जास्त काही लावत बसू नको, जेवढं जमेल तेवढं कर, मी येतो," अनिकेत म्हणाला.

"जास्त काही करणार नाही… किचन लावते… बाकी नंतर बघते," अनघा म्हणाली.

"चालेल," अनिकेत म्हणाला.

मोनिका आणि अनिकेत निघून गेले.

अशोक, संजय, आरती, आजोबा आणि अनघा मस्त गप्पा मारत होते.

खूप वेळ गप्पा चालू होत्या.

"अनघा, मी जेवण बनवून आणते, तू काय करशील?" आरती म्हणाल्या.

"आई, मी आणि आजोबा तिथेच येतो. तू परत सगळं इथे का घेऊन येतेस? आजोबा चालेल ना?" अनघा म्हणाली.

"हों, आपण आता जाऊ… मी पण येतो," आजोबा म्हणाले.

ते जायला निघाले… अशोक त्यांच्या घरी निघून गेले…

अनघा त्यांच्याकडे बघत राहिली…

"अनघा, काय बघते आहेस?" आरती म्हणाल्या.

"आई, बघ ना… बाबांना घरी जायचं नव्हतं… पण त्यांना जावं लागलं…" अनघा म्हणाली.

"आपण काय करू शकतो… तुझ्या बाबांनी त्यांना ‘चला’ म्हटलं… ते घरी गेले… ते सोड… चल, जेवण बनवायचं आहे… आजोबांना भूक लागेल ना…" आरती म्हणाल्या.

"आज किचन लावून घेते… उद्या त्यांचं पण जेवण बनवते," अनघा म्हणाली.

"हों, मी येते लावायला," आरती म्हणाल्या.

ते घरी गेले.

अनघा आणि आरती किचनमध्ये गेल्या… आजोबा आणि संजय गप्पा मारत बसले…

अशोक घरी येतात… शांत बसतात…

आज किती मस्त ठरवलं होतं… अनघाला मदत करेल… आता संध्याकाळी जाईल…

ललिताला काहीच वाटत नाही… तिने अनघाला घरी बोलवायला पाहिजे होतं…
बोलून काही फायदा नाही…
अशोक मनात विचार करत होते…


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all