Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 96

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं   भाग - 96


एक दिवस असा निघून गेला आणि अनघा-अनिकेतची पॅकिंग पूर्ण झाली. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी त्यांनी नवीन घरात छोटीशी पूजा करण्याचा निर्णय घेतला होता. अनघा खास गुढी उभारणार होती, म्हणून लागणारे सगळे सामान त्यांनी आधीच आणून ठेवले होते.

संजयने गुरुजींना बोलावले होते, तसेच अनिकेतने अशोक, ललिता आणि मोनिकालाही निमंत्रण दिले होते. मोनिका हाफ डे घेऊन येणार होती, तर अनघाने दोन दिवसांची सुट्टी घेतली होती.

सकाळी अनिकेतने आजोबांना हाक मारली, “आजोबा, तयार झाला का? आपल्याला जायचं आहे.”
आजोबा हसत म्हणाले, “हो, मी तयार आहे.”

अनघाने पूजा आणि गुढीसाठीचं सगळं सामान बाहेर आणून ठेवलं होतं. ते पाहून आजोबा थोडं आश्चर्याने म्हणाले, “अनघा, हे सगळं काय आहे?”

आजोबा, सगळ्यांचे जेवण बनवून घेतले आहे… प्रसाद आहे, अनघा म्हणाली.

“अग एवढं कधी केलंस?” आजोबा आश्चर्याने म्हणाले.

“आजोबा, ही रात्री नीट झोपलीच नाही. सकाळी लवकर उठून सगळं केलं. मी तर ऑर्डर देऊ म्हणालो होतो, पण नाही… तिला सगळं स्वतःच करायचं होतं,” अनिकेत हसत म्हणाला.

“मला आवडतं हे सगळं,” "प्रसाद काय  ऑर्डर करणार होता का?', अनघा हसत म्हणाली, “चला आता, गुरुजी येऊन जातील.”

ते तिघेही मग तिथून नवीन घरी  जायला  निघाले.


आरती  झाले का?  गुरुजी येऊन  जातील,  अनघा आणी अनिकेत पण  निघाले आहे.  संजय म्हणाले.

बाबा सगळे झाले आहे.  कशाला आईला हाक  मारत आहे.  आई  किचनमध्ये  डब्बा  पॅक करत आहे.  आपल्या घरी गुढी उभारली ना.   तिने जेवण बनवले.  ते डब्बात  भरत आहे.  तिथे जाऊन  खाऊ, ताई पण  घेऊन येणार आहे.  तिने पण  बनवले आहे . शुभम  म्हणाला

चल आपण  पुढे जाऊ,   संजय  म्हणाले.

माझे पण  झाले आहे.  मी. पण  येते,  आरती  म्हणाल्या.

ते  अनघा आणी अनिकेतच्या  नवीन  घरी  जायला निघाले.

अशोक पण  खुश होते. ते आणी मोनिका कधीच  तयार होऊन  बसले होते.  ललिता पण आल्या.

चला आता  काय  बघत आहे.  माझ्या लेकाचे घर आहे.  मी येणारच, ललिता म्हणाल्या

अशोक आणी मोनिका  हसले.   काही  बोलले नाही . 
ते  पण  जायला लागेल.

अनघा  अनिकेत  पोहचेल.
सगळेच आले होते.  ते  घरात गेले..  अनघाने सगळा सामान ठेवला..   सगळे. घर  बघत होते.  साफ करून अजून  छान  दिसत  होते.

गुरुजी पण  आले.  त्यांनी आधी  गुढी उभारली.    नंतर  गुरुजींनी जशी पूजा सांगितली तशी केली..   पूजा  छान पार  पडली...

ललिता सगळे घर बघत होत्या.  किती  मोठे  घर आहे.  दोन लोक येवढ्या  मोठ्या घरात राहणार,  ललिता  मनात  विचार करत होत्या..

गुरुजी  निघून गेले..
. आजोबा पण सगळे घर बघत होते.   खूप छान घर  घेतले आहे.  अनिकेतने मला खूप आवडले.   आजोबा मनात  म्हणाले.

सगळे मस्त  गप्पा मारत होते.  अनघाने सगळ्यांना  प्रसाद  दिला...

आता जेवण  करून घेऊ,  मोनिकाला ऑफिसला जायचे आहे ना.  अनघा  म्हणाली

आरती आणी अनघा किचन मध्ये गेल्या.  त्यांच्या मागे मोनिका  पण  गेली..

त्यांनी  जेवण आणले..  सगळे  मस्त  गोल करून  जेवायला बसले.   त्यांच्या मस्त गप्पा  आणी मस्ती चालू होती..


मोनिका ऑफिसला  निघून गेली..

ललिता पण  घरी निघून गेल्या.   त्यांना  अनघाचे कौतुक  ऐकायचे होते.

अनिकेत सामान कधी टाकतो?  अशोक म्हणाले.

काही आज आणतो..  काही उद्या आणतो..  अनघा लवकर लावून टाकेल... रविवारी पर्यंत सगळं घर लावून होऊन जाईल,  अनिकेत म्हणाला.

मी पण येईल मदत करायला... लवकर लावून होईल,  अशोक म्हणाले.

आमचा सामान जास्त नाही आहे... आता हळू हळू घेऊ,  अनिकेत म्हणाला..

त्यांचे असेच बोलणे चालू होते...

अनिकेत सामान आणायला निघून गेला...


मोनिका ऑफिसमध्ये गेली. तिच्या जागेवर न जाता ती थेट रोनकच्या केबिनमध्ये गेली.

“रोनक, तुमच्यासाठी प्रसाद आणला आहे,” ती म्हणाली आणि डब्बा काढून त्याच्या हातात दिला.

रोनकने लगेच डब्बा उघडून प्रसाद खाल्ला. “मोनिका, किती छान प्रसाद केला आहे… मला खूप आवडला,” तो म्हणाला.

“अनघा खूप छान जेवण बनवते… तिनेच बनवला आहे,” मोनिका म्हणाली.

“तू पण बनवायला शिक ना, मग मी तुझी तारीफ करेल,” रोनक हसत म्हणाला.

“शिकते आहे… येईल हळू हळू,” मोनिका म्हणाली.

रोनक हसायला लागला. तो उठला आणि मोनिकाला मिठी मारली.

“आज काम नाही आहे का?” मोनिका म्हणाली.

“आता तू समोर असताना काम होईल का?” रोनक म्हणाला.

मोनिका हसायला लागली…  नंतर  तिच्या कामाला  निघून गेली.  रोनक पण  त्याचे काम करायला लागला..


अनिकेत घरी गेला. दोन-तीन बॅग भरलेल्या होत्या, त्या त्याने घेतल्या. त्याने विक्रमला कॉल केला आणि म्हणाला, “मी उद्या घर खाली करत आहे, तू इथे येऊ शकतोस” अनिकेत म्हणाला.

“अरे व्वा! हो, मी पण तृप्तीला सामान पॅक करायला सांगतो… पण मला पार्टी हवी,” विक्रम म्हणाला.

“पार्टी तुला नंतर देतो… आत्ता मोनिकाची एंगेजमेंट आहे, आणि घर घेण्यासाठी खूप खर्च झाला आहे,” अनिकेत म्हणाला.

“हो रे, समजलं… मी घर बघायला येतो,” विक्रम म्हणाला.

“हो, येऊन जा,” अनिकेत म्हणाला.

“तू आता कुठे आहेस? ऑफिसला आला आहेस का?” विक्रमने विचारलं.

“आज मी सुट्टी घेतली आहे. सकाळी नवीन घरात पूजा केली, गुढी उभारली… आता जे बॅग भरले आहेत, ते घेण्यासाठी आलो आहे,” अनिकेत म्हणाला.

“ओके, मी आता कॉल ठेवतो… काम आहे,” विक्रम म्हणाला आणि कॉल कट केला.

अनिकेत बॅग घेतो आणि नवीन घरी जायला निघतो…


अनिकेतने घेतलेले मोठं घर पाहून ललिता मनातच विचार करत होती आपल्यालाही तिथे राहायला नेतील का? अनघा तयार होईल का? आणि जर अनिकेतने सांगितलं तर मी तर लगेच हो म्हणेन… रोज अनघाच्या हातचं छान जेवण मिळेल, असं स्वप्नच तिने मनात रंगवलं.

तोवर अनिकेत बॅगा घेऊन घरी आला आणि त्या बेडरूममध्ये ठेवल्या. घरात हलकी गडबड सुरू होतीच.

अशोक म्हणाले, “आता जेवणाची ऑर्डर द्यावी लागेल ना, मी निघतो… तू जायला निघशील तेव्हा मला कॉल कर.”

“हो बाबा,” अनिकेत शांतपणे म्हणाला.

अशोक तिथून निघून गेले. थोडावेळ सगळे गप्पा मारत बसले, आणि मग संजय, आरती आणि शुभमही त्यांच्या घरी परत गेले. घरात आता थोडी शांतता पसरली होती… पण नव्या घराची सुरुवात आणि पुढच्या तयारीची उत्सुकता मात्र सगळ्यांच्या मनात होती.


अनघाने सगळे डब्बे घेऊन घेतले, किचन साफ केले आणि बेडरूममध्ये सगळं एकदा बघून घेतलं.

“अनिकेत, बाबांना कॉल करून सांगू या… आपण निघतो म्हणून,” अनघा म्हणाली.

“हो, करतो,” अनिकेत म्हणाला. त्याने अशोकला कॉल करून सांगितलं की ते निघत आहेत.

अशोक लगेच अनिकेतच्या घरी आले. “चल, आपण जेवणाची ऑर्डर देऊन येऊ,” ते म्हणाले.

अनिकेत आणि अशोक ऑर्डर द्यायला बाहेर गेले.

“अनघा, जेवणाची ऑर्डर का?” आजोबा विचारले.

“एंगेजमेंटच्या दिवशी लागेल ना म्हणून,” अनघा म्हणाली.

ललिता काही बोलल्या नाहीत… त्या शांत बसल्या होत्या.

“हो ना… आता बोलायला पाहिजे ना… मी पण काही बोलत नाही, चांगलंच आहे शांत आहेत,” अनघा हलकं हसत म्हणाली.

“हो, ते पण आहे,” आजोबा म्हणाले.

थोड्या वेळाने अनिकेत आणि अशोक परत आले.

अशोक त्यांच्या घरी निघून गेले…

आणि अनिकेत, अनघा आणि आजोबा सुद्धा घरी निघून गेले…





क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all