Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 94

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
अनिकेत, सगळं खूप छान झालं… अनघा, तू तर खूप मेहनत केलीस… तुझं खूप कौतुक होत होतं,” आजोबा म्हणाले.

“मला अनिकेतने खूप मदत केली… म्हणूनच जेवण लवकर झालं… आणि रोनक- मोनिकाचं लग्न ठरल… खूप आनंद आहे,” अनघा म्हणाली.

अनिकेत थोडा शांत झाला…

“आता मोनिका लग्न करून निघून जाईल… ती त्रास द्यायला जवळ राहणार नाही… ‘दादा दादा’ करत येणार नाही…” तो हलक्या आवाजात म्हणाला…

त्याच्या आवाजातली भावूकता लपली नाही…

अनघा त्याच्या जवळ आली…

“ती आपल्या जवळच राहील… आणि रोनक किती चांगला मुलगा आहे… ती तिथे खूप आनंदात राहील… आपल्याला अजून काय हवं… सगळ्या मुलींना एक दिवस लग्न करून जावंच लागतं… मी पण तुझ्यासोबत लग्न करून आले ना…” अनघा प्रेमाने म्हणाली.

आजोबांनीही मान डोलावली…
“अनिकेत, अनघा बरोबर बोलते…”

अनिकेत काहीच बोलला नाही…

तो फक्त शांतपणे बसला…

त्याच्या डोळ्यांसमोर मोनिकाचे लहानपण फिरत होते…
तिचं हसणं… तिचं हट्ट करणं…
आणि “दादा…” म्हणत त्याच्यामागे फिरणं…

अनघाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला…

अनिकेतने तिच्याकडे पाहिलं… आणि हलकंसं स्माईल केलं…

मनात थोडं दुःख होतं…

पण त्याच वेळी…

बहिणीच्या आनंदासाठी मनाने तयारही होत होत


मोनिका, अशोक आणि ललिता घरी आले… सगळे खूप आनंदी होते…

“आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल… एंगेजमेंटलाही सगळ्यांना बोलवूया… रोनकचं घरतले खूप छान आहे… आपल्या मोनिकाने खरंच नशीब काढलं,” ललिता म्हणाल्या.

“हो… मी त्याला कॉल करतो… वेळ कमी आहे… एंगेजमेंटची तयारी करायला हवी… हॉल बघू… साध्या पद्धतीने करू,” अशोक विचार करत म्हणाले.

“बाबा… आपण घरीच एंगेजमेंट केली तर…? आजोबांकडून मी नेहमी ऐकलं आहे… माझं फारसं मोठं नातंलग नाही आहे…” मोनिका म्हणाली.

“रोनकची फॅमिली काय बोलेल…? साधा साखरपुडा केला तर…” अशोक थोडे साशंकपणे म्हणाले.

“नाही बोलणार बाबा… ते लोक खूप साधे आहेत… त्यांना श्रीमंतीचा काहीच गर्व नाही…” मोनिका शांतपणे म्हणाली.

“हो… त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत होतं… पण तरी एकदा रोनकच्या बाबांशी बोलून घे,” ललिता म्हणाल्या.

“ठीक आहे…” अशोक म्हणाले.

“आई… मी आता फ्रेश होते… साडी काढते… थोडा आराम करते…” मोनिका म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली…

अशोक आणि ललिताही त्यांच्या रूममध्ये गेले…

मोनिका बेडवर बसली…

तिने हळूच डोळे मिटले…

आजचा दिवस तिच्यासाठी खूप मोठा होता…

रोनक… त्याचं बोलणं… त्याचा स्पर्श… त्याची काळजी… सगळं आठवत होतं…

तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं…

“आता खरंच… सगळं बदलणार आहे…”
ती मनातच म्हणाली…



आजोबा  अनिकेत आणी अनघासोबत  बोलून  आपल्या रूममध्ये आले.

आजोबा डायरी घेऊन शांतपणे बसले होते…
जुन्या पानांवर बोटं फिरवत… काहीतरी शोधत होते…

त्यांच्या चेहऱ्यावर थोडी उत्सुकता… थोडा विचार…

“कुठे लिहून ठेवलं होतं बरं…” ते स्वतःशीच पुटपुटले…

काही वेळाने…

त्यांना एक नंबर दिसला…

“अरे हो… हाच तो…” आजोबांच्या चेहऱ्यावर अचानक आनंद उमटला…

त्यांनी पुन्हा एकदा नंबर नीट पाहिला…

तो एका आश्रमाचा नंबर होता…

आजोबांनी लगेच मोबाईल उचलला…

कॉल करावा का… थोडं थांबावं… असा विचार त्यांच्या मनात चालू होता…

त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती…

जणू काही…

या नंबरमागे त्यांच्या मनातलं एक मोठं रहस्य लपलेलं होतं…


आजोबांनी आश्रमात कॉल केला…

“नमस्कार…” तिकडून लगेच आवाज आला…

“नमस्कार… मला आश्रमात राहायला यायचं आहे… माझं कोणी नाही आहे…” आजोबा शांतपणे म्हणाले…

तिकडचा माणूस लगेच म्हणाला,
“हो, तुम्ही केव्हाही येऊ शकता… तुम्हाला लागणारं सामान आणि पैसे घेऊन या… बाकीची माहिती आम्ही मोबाईलवर पाठवतो…”

“ठीक आहे… मी आलो की सगळं घेऊन येईन…” आजोबा म्हणाले…

“चालेल…” असं म्हणत त्याने कॉल कट केला…

कॉल संपला…

आजोबा काही क्षण मोबाईलकडे बघत राहिले…

नंतर त्यांनी हळूच एक दीर्घ श्वास घेतला…

“आता माझी सोय झाली… मी एकटा राहणार नाही…” ते मनात म्हणाले…

पण त्यांच्या डोळ्यांत एक हलकीशी ओल होती…

जणू.. ते स्वतःलाच समजावत होते…
कारण खरं तर…
त्यांचं “कोणी नाही” असं नव्हतंच…
पण तरीही…
ते एकटेपण अनुभवत होते…



“अनिकेत, आपण सामान पॅक करायचा का? आता गुढीपाडवा येतोय… आपल्या मराठी नवीन वर्षाला आपण नवीन घरात जाऊया… तुला काय वाटतं? मोनिकाच्या लग्नाची तयारी पण करता येईल… बाबांना तिथे येणंही सोपं जाईल…” अनघा म्हणाली.

“अरे हो… हा विचार मी केला नाही… तू बरोबर म्हणतेस… आपण थोडं थोडं सामान पॅक करू… आणि त्या घराची साफसफाई पण करून घेऊ… बाबांना सांगतो… माणसं लावून साफ करून घेतील… पैसे मी पाठवतो,” अनिकेत म्हणाला.

“हो…” अनघा आनंदाने म्हणाली.

“चल मग… जे रोज लागत नाही ते आधी पॅक करू,” अनिकेत म्हणाला.

“हो चालेल…” अनघा म्हणाली.

ती कपाट उघडून कपडे काढू लागली…
जे वापरात नव्हते ते बॅगमध्ये भरू लागली…
अनिकेतही तिची मदत करत होता…
दोघांच्या चेहऱ्यावर नवीन सुरुवातीचा आनंद दिसत होता…


---

तिकडे…

आजोबाही त्यांच्या घरात बसून सामान पॅक करत होते…

जुनी वस्तू हातात घेताना… आठवणी जाग्या होत होत्या…

“हे ठेवायचं… आणि हे… देऊन टाकायचं…” ते स्वतःशीच बोलत होते…

बाकीचं सामान गरीब लोकांना द्यायचं ठरवलं होतं…

“घर रिकामं झालं… तर भाड्याने देता येईल…” त्यांनी मनात विचार केला…
पण त्या विचारामागे… एकटेपण लपलेलं होतं…


---

तिकडे…

रोनक आपल्या रूममध्ये बसला होता…

आजचा दिवस त्याच्या आयुष्यातला सगळ्यात वेगळा होता…

“मला वाटलंच नव्हतं… ती मुलगी मोनिका असेल… आणि तीच माझी होणार… मला माझं प्रेम मिळालं…”

तो स्वतःशीच हसत होता…

“तिला खूप खुश ठेवेन…”

त्याने मोबाईल हातात घेतला…
“कॉल करू का…? काय करत असेल ती…?”
शेवटी त्याने तिला कॉल केला…

मोनिका झोपली होती…

मोबाईल वाजत होता…
ती अर्धवट झोपेतच मोबाईल उचलते…
कॉल कोणाचा आहे तेही न बघता…

“हॅलो…” ती झोपाळू आवाजात म्हणाली…

“तुझा नवरा बोलतो आहे… बायको, मिठीत ये ना… एक किस हवा आहे…” रोनक हसत म्हणाला.

“काय!” मोनिका खडकन उठून बसली…
ती अजून झोपेतच होती… कोण बोलतंय हेच तिला कळलं नव्हतं…

तिने पटकन मोबाईलकडे पाहिलं…

“रोनक…!” ती हलकीशी लाजली…

“किती झोप काढतेस… माझी झोप उडवली आहे…” रोनक म्हणाला.

“सकाळी लवकर उठले होते… आणि रात्री तुमचाच विचार करत होते… नीट झोप लागली नाही…” मोनिका हळू आवाजात म्हणाली.

“म्हणजे तुला माहिती होतं… मीच तुला बघायला येणार आहे?” रोनक म्हणाला.

“हो… सकाळी तर सांगितलं ना… मी बाबांना सगळं सांगितलं… त्यांनी आजोबांशी बोललं… आणि मग आजोबांनी तुमच्या बाबांना कॉल केला… सगळं प्लॅन होतं…” मोनिका म्हणाली.

“मला वेडं केलंस… किती त्रास दिलास… आता माझ्याकडे ये… तुला कसा त्रास देतो ते बघ…” रोनक खोडकरपणे म्हणाला.

“तुम्ही असं बोलणार असाल तर… मी लग्नच करणार नाही…” मोनिका थोडी घाबरून म्हणाली.

“काय? लग्न नाही करणार? आता तुझं काहीच ऐकणार नाही… उचलून घेऊन जाईन…” रोनक हसत म्हणाला.

“असं कसं उचलून नेणार…?” मोनिका म्हणाली.

“ते मी बघून घेईन…” रोनक म्हणाला.

मोनिका शांत झाली…

“अगं काय झालं? मी मजाक करत होतो…” रोनक लगेच म्हणाला.

थोडा वेळ शांतता…

“मुलींना आई-बाबांना सोडून का जावं लागतं…? लहानपणापासून वाढतात… आणि अचानक घर सोडून जातात…” मोनिका भावूक होऊन म्हणाली…

रोनकचा आवाज मऊ झाला…

“आपल्याला मुलगी झाली ना… आपण तिला आपल्याजवळच ठेवू… मी घरजावई घेऊन येईल…” तो हसत म्हणाला.

“तुम्ही कुठल्या कुठे पोहोचला…” मोनिका हसली.

“तू हसावी म्हणून… आणि ऐक… तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आई-बाबांना भेटायला जाऊ शकतेस… त्यांना आपल्या घरी बोलवू शकतेस…” रोनक प्रेमाने म्हणाला.

“हं…” मोनिका शांतपणे म्हणाली.

“उद्या शॉपिंगला जायचं का?” रोनक म्हणाला.

“हो… ऑफिसवरून जाऊ… आणि तुम्ही मला घरी सोडणार ना?” मोनिका म्हणाली.

“नक्की…” रोनक म्हणाला.

दोघं अजून थोडा वेळ गप्पा मारत राहिले…

हसत… लाजत…

आणि शेवटी…

दोघांनी कॉल ठेवला…

दोघांच्या चेहऱ्यावर एकच स्मित होतं…

“प्रेम हळूहळू… पण सुंदरपणे वाढत होतं…”




क्रमश

आजोबा आश्रमात  जातील का? अनिकेत आणी अनघाला. समजल्यावर  काय  होईल?.....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all