ते सगळे आजोबांच्या घरात येऊन बसले
मोनिकाने रोनककडे पाहिले. रोनक खाली बघत होता. त्याचा चेहरा पडला होता. नेहमीची स्माईल पण नव्हती.
रोनकची आई मोनिकाजवळ गेल्या… तिला बसायला सांगितले.
अनघा चहा घेऊन आली. मोनिकाजवळ दिली…
मोनिकाने सगळ्यांना चहा दिला. रोनकजवळ गेली… अजूनही रोनकने वर पाहिले नव्हते.
रोनकच्या आईने त्याला चहा घेण्यासाठी सांगितले. रोनकने कप घेतला…
मोनिका जाऊन बसली.
रोनकच्या आईने मोनिकाला काही प्रश्न विचारले…
मोनिका उत्तर देत होती…
रोनक आवाज ऐकून तिच्याकडे बघतो…
आणि त्याच क्षणी… त्याच्या हातातील चहा खाली पडतो… थोडा त्याच्या पँटवर पण सांडतो…
सगळे थोडे घाबरतात…
मोनिका मात्र हसत असते…
अनिकेत लगेच उठतो…
“चल, ये…” म्हणत रोनकला बाथरूममध्ये घेऊन जातो.
“चल, ये…” म्हणत रोनकला बाथरूममध्ये घेऊन जातो.
रोनक कपडे साफ करतो…
“मी मोनिकाला बघायला आलो आहे… आणि आता मोनिका बघतो… खूपच स्तवले आहे…” रोनक मनात म्हणतो.
“रोनक, झाले का?” अनिकेत म्हणतो.
“हो…” रोनक म्हणतो.
दोघे परत हॉलमध्ये येतात…
रोनकने मोनिकाकडे एक रागीट लुक दिला…
“रोनक, आमचं बोलणं झालं आहे. तू मोनिकासोबत बोलून घे,” रोनकचे डॅड म्हणाले.
“मोनिका, त्यांना घरी घेऊन जा. तिथे बोला,” अनिकेत म्हणाला.
रोनक लगेच उठला…
मोनिका पण उठली…
दोघे अनिकेतच्या घरी गेले…
घरात शांतता होती…
दोघे एकमेकांसमोर उभे होते…
रोनकने मोनिकाला मिठीत घेतले. दोघेही काही क्षण काहीच बोलले नाहीत… फक्त शांत उभे होते.
मोनिका हलायला लागली…
“मोनिका… कसा जगत होतो मी, तुला माहिती आहे… तुला माहिती होतं तर सांगायचं ना…” रोनक हळू आवाजात म्हणाला.
“माझा आवाज ऐकून तुम्हाला किती आनंद झाला होता… तो मला कसा बघता आला असता…” मोनिका म्हणाली.
“आता मी लवकर लग्न करेन… मी तुला माझ्यापासून दूर नाही करू शकत…” रोनक म्हणाला.
“मला लवकर लग्न नाही करायचं आहे… आपण थोडं थांबलो तर…” मोनिका म्हणाली.
“मोनिका, मी नाही थांबू शकत… पण ठीक आहे… आपण लग्न करू… मी तुला स्पर्शही करणार नाही… फक्त तू माझ्या जवळ राहा…” रोनक म्हणाला.
“मी त्यासाठी नाही म्हणत आहे… अनिकेत दादाने घर घेतलं आहे… तो त्या घरात राहायला आला, सगळं नीट झाल्यावर मला लग्न करायचं आहे…” मोनिका म्हणाली.
“त्याला किती महिने लागतील?” रोनक म्हणाला.
“पाच-सहा महिने…” मोनिका म्हणाली.
“बस एवढंच ना… मग ठीक आहे…” रोनक हलकं हसत म्हणाला.
तो तिच्या जवळ जाऊ लागला…
मोनिका मागे मागे जात होती… ती भीतीला टेकली, थोडी घाबरली… तिने डोळे बंद करून घेतले…
रोनक हसायला लागला…
त्याने तिच्या कपाळावर हलकं किस घेतलं…
मोनिकाने डोळे उघडले… आणि परत त्याला मिठी मारली…
“आता तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही…” रोनक म्हणाला.
“मी पण तुम्हाला कधीच दुखावणार नाही… सॉरी… मला असं बोलायला नको होतं…” मोनिका म्हणाली.
“आता तू काहीही बोल… पण मी तुला पनिशमेंट देत जाईन… मला आवडेल तसं…” रोनक खट्याळपणे म्हणाला.
मोनिका मस्त लाजली…
“तुला लाजता येतं… आज तू खूप सुंदर दिसत आहेस… तुला साडी खूपच छान दिसते…” रोनक तिच्याकडे पाहत म्हणाला.
“आणि हो… आता पासून कधी कधी माझ्यासाठी अशी साडी घालत जा…” रोनक म्हणाला
मोनिका हलकंसं हसली… आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत उभी राहिली…
“आपण आता जायचं… खूप वेळ झाला,” मोनिका म्हणाली.
“मला तुला सोडावंसं वाटत नाही… दोन दिवस खूप एकटं वाटत होतं… आता मला खूप आनंद झाला आहे,” रोनक म्हणाला.
“हो… तो दिसत आहे,” मोनिका हलकंसं हसत म्हणाली.
“तुझ्यावर खूप प्रेम करायचं आहे… तुला कधीच एकटं पडू देणार नाही… तू पण मला साथ दे… बाकी माझ्या कोणत्याच अपेक्षा नाहीत,” रोनक म्हणाला.
मोनिकाने हलकंसं “हो…” म्हणत मान डोलावली…
दोघेही थोडावेळ शांत उभे राहिले… जणू तो क्षण थांबवायचा प्रयत्न करत होते…
नंतर दोघे बाहेर आले…
हळूहळू चालत ते आजोबांच्या घरात गेले…
सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच होत्या…
रोनक आणि मोनिका एकमेकांकडे पाहून हलकंसं स्माईल देतात…
आता निर्णय त्यांच्या डोळ्यांत दिसत होता…
“चला… रोनक आणि मोनिका आनंदी दिसत आहेत… चेहऱ्यावर स्माईल आहे… म्हणजे त्यांचा होकार आहे… लग्नाची तारीख काढून घेऊ,” रोनकचे डॅड म्हणाले.
मोनिकाला टेन्शन आले…
रोनक तिच्या जवळ उभा होता… त्याने तिचा हात हलकेच पकडला…
मोनिकाने त्याच्याकडे पाहिले…
रोनकने डोळ्यांनीच तिला शांत राहायला सांगितले…
आजोबांनी गुरुजींना बोलावले…
गुरुजी तिथेच बिल्डिंगमध्ये राहत होते…
गुरुजी लगेच तयार होऊन आले…
आजोबांनी गुरुजींना सगळं सांगितलं…
गुरुजींनी पंचांग काढलं… तारीखा बघायला सुरुवात केली…
सगळे उत्सुकतेने बघत होते…
मोनिका मात्र शांत बसली होती… तिच्या मनात विचार चालू होते…
“आत्ता सांगावं का…? की थांबावं…?”
“आत्ता सांगावं का…? की थांबावं…?”
रोनकने तिचा हात अजून घट्ट पकडला…
“गुरुजी, दोन महिन्यांनंतर एक चांगली मुहूर्त आहे… आणि चार महिन्यांनंतर अजून एक खूप उत्तम मुहूर्त आहे…” गुरुजी म्हणाले.
सगळे एकमेकांकडे बघू लागले…
“दोन महिन्यांनी करूया का?” रोनकचे डॅड म्हणाले.
मोनिकाचा चेहरा थोडा उतरला…
रोनकने ते लक्षात घेतलं…
तो लगेच म्हणाला,
“डॅड… चार महिन्यांचा मुहूर्त घ्या…”
“डॅड… चार महिन्यांचा मुहूर्त घ्या…”
सगळे त्याच्याकडे बघू लागले…
“थोडी तयारी करायला वेळ मिळेल… आणि सगळं नीट करता येईल…” रोनक शांतपणे म्हणाला.
मोनिकाच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकीशी स्माईल आली…
आजोबांनी मान डोलावली…
“हो… चार महिन्यांनी करूया… घाई नको…”
“हो… चार महिन्यांनी करूया… घाई नको…”
गुरुजींनी तारीख सांगितली…
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता…
रोनकने हलकंसं मोनिकाचा हात दाबला…
मोनिकाने त्याच्याकडे पाहिलं…
दोघांच्या डोळ्यांत एकच भावना होती…
“आपण एकत्र आहोत…”
“लग्नाची तारीख ठरली… पण मी म्हणत होतो, आपण एंगेजमेंट तर करू शकतो ना…” रोनकचे डॅड म्हणाले.
“हो… ते आपण रविवारी करून टाकू… सगळ्यांना सुट्टी असते,” अशोक म्हणाले.
“हो चालेल की… रोनक, एखाद्या दिवशी मोनिकाला शॉपिंगला घेऊन जा,” रोनकची आई म्हणाली.
“हो चालेल… आमच्याकडून पण रोनकला ड्रेस घेऊन टाका,” अशोक म्हणाले.
“सगळं ठरलं तर… आता आम्ही निघतो,” रोनकचे डॅड म्हणाले.
“कुठे निघता? आम्ही तुमच्यासाठी छान जेवण बनवलं आहे… आता आमच्या घरी जेवायला चला,” अनिकेत म्हणाला.
“अरे अनिकेत, जेवण कशाला…” रोनकचे डॅड म्हणाले.
“तुम्ही पहिल्यांदा आलात… तुम्ही असेच कसे जाणार…” अनिकेत हसत म्हणाला.
ते सगळे अनिकेतच्या घरी गेले…
अनघाने पदर खोचला… सगळं जेवण गरम केलं…
मोनिका आणि ललिता अनघाला मदत करत होत्या…
सगळे जेवायला बसले…
घरात आनंदाचं वातावरण होतं… गप्पा, हशा सुरू होता…
पण…
अनिकेत आणि अनघा मात्र ललिताकडे पाहत होते…
“आई इतकी चांगली वागत आहे… की फक्त दिखावा आहे…?”
दोघांच्या मनात एकच प्रश्न होता…
ललिता मात्र मोनिकाकडे प्रेमाने बघत होती… तिच्या प्लेटमध्ये अजून भाजी वाढत होती…
“आणखी घे ग… आज तू खूप छान दिसते आहेस…” ललिता म्हणाली.
मोनिका हलकंसं हसली…
अनघाने अनिकेतकडे पाहिलं…
अनिकेतनेही शांतपणे मान हलवली…
कदाचित…
सगळं खरंच बदलत होतं…
सगळ्यांनी जेवण करून घेतलं…
“जेवण खूपच छान होतं… अनघा, तू सगळ्यांचं जेवण बनवलंस… तुझं खूप कौतुक वाटतं… भाजी तर खूपच छान झाली होती… मी परत तुझ्या हातचं खायला येईन,” रोनकची आई म्हणाली.
“नक्की या… आणि मला तुमच्या आवडीची डिश पण सांगा,” अनघा हसत म्हणाली.
“दादा आमच्याकडे येत नाही… अनघा चांगलं जेवण बनवते म्हणून,” रोनकचे डॅड हसत म्हणाले.
“ती खरंच छान बनवते… मला आवडतं तिच्या हातचं जेवण,” आजोबा म्हणाले.
रोनकने मोनिकाकडे बघत विचारलं,
“तुला बनवता येतं ना…? आपल्या नोकर आहेत… पण कधी तरी तुझ्या हातचं खायला आवडेल…”
“तुला बनवता येतं ना…? आपल्या नोकर आहेत… पण कधी तरी तुझ्या हातचं खायला आवडेल…”
मोनिका हलकंसं हसली…
“नक्की खायला मिळेल… आता चार महिने आहेत ना… शिकून घेईन…”
“नक्की खायला मिळेल… आता चार महिने आहेत ना… शिकून घेईन…”
“मग चालेल…” रोनक हसत म्हणाला.
“आता तुम्ही सगळे आधी आमच्या घरी या,” रोनकची आई म्हणाली.
“हो, नक्की येऊ,” ललिता म्हणाल्या.
“चला आता…” रोनकचे डॅड म्हणाले.
सगळ्यांनी एकमेकांना बाय केलं… आणि ते घरी निघून गेले…
थोड्यावेळाने…
“अनिकेत, आम्ही पण निघतो,” अशोक म्हणाले.
“बाबा, काय कसं करायचं ते मला सांगा… मी येऊन जाईन,” अनिकेत म्हणाला.
“मी तुला उद्या सगळं सांगतो,” अशोक म्हणाले.
“चालेल,” अनिकेत म्हणाला.
“आम्ही निघतो…” अशोक म्हणाले.
तेही घरी निघून गेले…
घरात आता शांतता पसरली होती…
अनघा आणि अनिकेत एकमेकांकडे पाहत होते…
आजचा दिवस खूप मोठा होता…
आनंद, भावना… आणि थोडं टेन्शनही…
पण सगळ्याच्या शेवटी एकच गोष्ट होती…
“नवीन नात्यांची सुंदर सुरुवात…”
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा