अनघा आणी अनिकेत घरी आले, अनिकेतने आजोबांना आवाज दिला. आजोबा पण त्यांच्या घरातून आले
अनघा घर कसे वाटले? आजोबा म्हणाले
आजोबा घर खूप छान आहे, मला खूप आवडले. मग आम्ही बुक पण केले. अनघा म्हणाली.
आजोबा गप झाले. अनघाने आजोबांसाठी जेवण वाढून आणले. आजोबा जेवत होते. अनघा आणी अनिकेत आजोबांसोबत गप्पा मारत होते.
आजोबांचे जेवण झाले. अनघाने सगळे आवरले.
अनघा उद्याचे तुझ्याकडून होईल ना, आजोबा म्हणाले.
हों आजोबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सगळे करेल, अनघा म्हणाली.
थोडावेळ बोलतात. आजोबा अनघा आणी अनिकेतला गुडनाईट बोलून, त्यांच्या घरी निघून जातात.
अनघा आणी अनिकेत पण रूममध्ये येतात. बेडवर आडवे होतात.
अनिकेत आपले घर झाले , आपण आपल्या घरात राहायला जाणार, मंडेला लोनचे रोनक सोबत बोलते. अनघा म्हणाली.
मी पण लोनचे बघतो. मोनिकाच्या लग्नात पण लागतील, बाबांनी मोनिकाच्या लग्नाची सोय करून ठेवली असेल, तरी मला थोडी फार मदत करायला हवे ना. अनिकेत म्हणाला...
आता आपल्याकडे आहे. तेवढे आपण देऊन टाकू, बाकीचे लॉन मधून येतील ते, अनघा म्हणाली.
हों ते तर द्यावी लागतील, उद्या काय करणार आहे. अनिकेत म्हणाला...
पनीर मटारचा रेडिमेट मसाला आणला आहे. ते लगेंच होईल, बाकी हळू हळू करू, सगळ्यात आधी आजोबांच्या घर साफ करून येईल, अनघा म्हणाली..
तू थकून जाशील, किती काम करणार, अनिकेत म्हणाला.
एक दिवस केले तर काही होत नाही. माझ्यासाठी तू आहे ना. अनघा म्हणाली.
मी काय करणार, अनिकेत म्हणाला.
अनघा अनिकेतच्या कुशीत जाते. असे मला मिठीत घे, माझा थकवा, निघून जातो अनघा म्हणाली.
अनिकेत हसायला लागला..
फक्त मिठीत घ्यायचे आहे का? अजून काही करायचे आहे. अनिकेत खट्याळ हसत म्हणाला.
अनघाने अनिकेतच्या टीशर्ट मध्ये तोड घातले....
मोनिकाला झोप येत नव्हती. रोनकसोबत बोलू का? ते झोपले असतील का?, त्यांना राग असेल, बोलणार नाही, माझी अजून चिडचिड होईल, मोनिका मनात म्हणाली
झोपायचा प्रयत्न करू लागली......
झोपायचा प्रयत्न करू लागली......
आजोबाना झोप येत नव्हती. अनिकेत आणी अनघा आता इथून नवीन घरी राहायला निघून जातील, मी परत एकटा होईल, मी कोणत्या आश्रमात जाऊ का? तिथेच राहील, सगळ्यांची आठवण आली की त्यांना भेटायला बोलवत जाईल, उद्याच चांगले आश्रम बघतो. आजोबा मनात म्हणाले..
ललिता लवकर उठल्या होत्या. सगळे आवरून घेतात. मोनिका चांगला मुलगा मिळायला हवा, त्यांना असे वाटतं होते. मोनिका सुखी आणी खुश राहायला पाहिजे. त्या काम करत मनात विचार करत होत्या.
अशोक पण आवरून बसले होते. मुलीच्या लग्नाचे बघणे, किती जड जाते. तिला लहानची मोठी करा. आपल्याजवळ ठेवा नंतर तिच्या आयुष्यात एक राजकुमार येतो. तो लग्न करून त्यांच्या घरी तिला घेऊन जातो. अशोक मनात विचार करत होते.
मोनिका उठली. तिने तिचे आवरले.
रूमच्या बाहेर आली. ललिता किचनमध्ये होत्या. आई नाश्ता झाला का? मोनिका म्हणाली
रूमच्या बाहेर आली. ललिता किचनमध्ये होत्या. आई नाश्ता झाला का? मोनिका म्हणाली
नाश्ता झाला आहे. बाबांना हाक मार, ललिता म्हणाल्या.
मोनिकाने अशोकला हाक मारली.
अशोक आले. ललिता नाश्ता घेऊन आली.. त्यांनी नाश्ता करून घेतला. .
मोनिका तयारी करायला तिच्या रूममध्ये निघून गेली.
रोनकची मॉम नोकरांना नाश्ता सांगून आल्या होत्या.
रोनकचे डॅड पण तयार होऊन आले होते. त्यांना त्यांच्या भावाला भेटायचे होते. खूप दिवस झाले होते. ते भेटले नव्हते. ते विचार करत होते.
रोनक उठ, आपल्याला दादाकडे जायचे आहे. मुलींवाले येऊन जातील, आपण उशिरा जाऊ, ते चांगले दिसते का? रोनकची मॉम म्हणाली.
रोनक इच्छा नसताना उठतो. आणी आंघोळी जातो.. लवकर आवरून नाश्ता करायला जातो. ते नाश्ता करून घेतात.
अनघा आणी अनिकेत आजोबांचे घर आवरत होते. आजोबा पण त्यांना मदत करत होते.
अनघा आता खूप झाले, खूप छान घर आवरले.
आता जेवणाचे बघून घे, तू पण छान तयार होऊन ये, आजोबा म्हणाले
आता जेवणाचे बघून घे, तू पण छान तयार होऊन ये, आजोबा म्हणाले
मोनिका तयार होऊन येते, तिने लाल रंगाची साधीच साडी नेसलेली असते. केस मोकळे सोडले असतात. गळ्यात नाजूकसा हार घातलेला असतो. हातात बांगड्या, ती खूप सुंदर दिसत होती.
अशोक आणि ललिता तर मोनिकाकडे बघतच राहिले होते.
“मोनिका खूप सुंदर दिसत आहे,” ललिता म्हणाल्या.
अशोक पण हसत म्हणाले.
“थँक्यू,” मोनिका म्हणाली.
“चला आता आपण निघू,” अशोक म्हणाले.
ते अनिकेतकडे जायला निघाले.
“अनघा झाले का? मोनिकाचा मेसेज आला आहे, ते निघाले,” अनिकेत म्हणाला.
“हो झाले…” अनघा जे बनवले होते त्यांच्याकडे बघत म्हणाली. पनीर मटर मसाला, जिरा राईस, चपात्या, पापड, गुलाबजामून बनवले होते.
“आता तू आवरून घे, मी आहे बाहेर,” अनिकेत म्हणाला.
अनघा बेडरूममध्ये गेली… कपाट उघडले, छान साडी काढली… त्यावर मॅचिंग दागिने पण काढले… साडी नेसायला घेतली… ती लवकर तयार झाली…
.....
“रोनक झाले का? आपल्याला निघायचे आहे,” रोनकचे डॅड म्हणाले.
रोनकची मॉम तयार बसली होती. रोनक पण तयार होऊन आला, पण चेहऱ्यावर स्माईल नव्हती.
“चला आता,” रोनकचे डॅड म्हणाले.
ते गाडीत बसले… आजोबाकडे जायला निघाले…
अशोक, ललिता आणि मोनिका अनिकेतकडे आले..
“अनिकेतकडे का आलो आहे?” ललिता म्हणाल्या.
“तो मुलगा इथे येणार आहे. काही बोलू नको, मोनिकाचा विचार कर. चांगले स्थळ आहे. हातातून जाता कामा नये,” अशोक म्हणाले.
“ठीक आहे,” ललिता म्हणाल्या.
ते अनिकेतकडे आले. अनघाने पाणी आणून दिले. त्यांनी घेतले.
“मोनिका, तू खूप छान दिसत आहेस,” अनिकेत म्हणाला. त्याने मोनिकाला मिठी मारली.
“दादा रडू नको… नाहीतर मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुमच्याजवळच राहीन,” मोनिका म्हणाली.
“मला आनंद झाला आहे. मी का रडू?” अनिकेत तिला चिडवत म्हणाला.
मोनिका आता अनिकेतला मिठी मारते.
“का करावं लागतं लग्न…? का मी तुमच्याजवळ राहू शकत नाही?” मोनिका म्हणाली.
“का करावं लागतं लग्न…? का मी तुमच्याजवळ राहू शकत नाही?” मोनिका म्हणाली.
“तो रोनक तुझी वाट बघत असेल. तू आमच्याकडे राहशील का?” अनिकेत म्हणाला.
मोनिका काहीच बोलत नाही.
अनघा चहा करून घेऊन येते. सगळे घेतात.
“अनिकेत, ते निघाले आहेत. थोड्या वेळात येतील,” आजोबा म्हणाले.
“येऊ द्या आजोबा, सगळं रेडी आहे,” अनिकेत म्हणाला.
“मोनिका छान दिसत आहे,” आजोबा म्हणाले.
मोनिका स्माईल देते.
“तिकडे बघण्याचं होऊ दे. नंतर त्यांना इकडे घेऊन येईन,” आजोबा म्हणाले.
“चालेल आजोबा,” अनिकेत म्हणाला.
आजोबा निघून गेले…
अनिकेत मुलगा कसा आहे? चांगला आहे ना? ललिता काळजीने विचारतात.
“आई, मुलगा खूप चांगला आहे. त्यांची कंपनी आहे. स्वभाव खूप छान आहे. आपली मोनिका तिथे सुखात राहील, आनंदात राहील. आपल्या जवळ पण राहील, जास्त लांब जाणार नाही,” अनिकेत म्हणाला.
“मग चांगले आहे,” ललिता म्हणाल्या.
ते अशाच गप्पा मारत होते…
रोनक आणि त्यांची फॅमिली आजोबांकडे आली.
आजोबांनी कॉल करून सांगितले. अनघा पाणी घेऊन गेली. त्यांच्या सोबत बोलली… परत घरी आली.
आजोबा आणि त्यांचे भाऊ बोलत होते.
रोनक तर फक्त त्यांचे बोलणे ऐकत होता. कोण मुलगी असेल… कशी असेल… मॉम-डॅड काय म्हणतील… तो विचार करत होता.
“दादा, मुलीला बोलवायला सांग,” रोनकचे डॅड म्हणाले.
आजोबांनी कॉल करून सांगितले,
“या आता…”
“या आता…”
अनिकेत, अनघा, अशोक, ललिता आणि सगळ्यात मागे मोनिका होती…
सगळे हळूहळू घरात आले.
रोनकचे डॅड, मॉम आणि रोनक आणी आजोबा बसले होते.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा