तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 89
रोनक दिवसभर मिटिंगमध्ये व्यस्त होता.
त्याचा मोबाईल बॅगमध्येच होता.
त्याचा मोबाईल बॅगमध्येच होता.
एक मिटिंग संपायच्या आधीच दुसरी सुरू होत होती.
त्याला मोबाईल बघायलाही वेळ मिळत नव्हता.
त्याला मोबाईल बघायलाही वेळ मिळत नव्हता.
मोनिकाने जे बोललं होतं… त्याचा त्याला मनात त्रास होत होता,
पण कामाच्या बाबतीत तो कधीच हलगर्जी करत नव्हता.
पण कामाच्या बाबतीत तो कधीच हलगर्जी करत नव्हता.
मिटिंगमध्ये तो पूर्ण लक्ष देऊन बोलत होता.
सगळ्यांचं ऐकत होता… आणि काम व्यवस्थित पार पाडत होता.
सगळ्यांचं ऐकत होता… आणि काम व्यवस्थित पार पाडत होता.
शेवटी त्याच्या सगळ्या मिटिंग संपल्या.
त्याने त्याची बॅग घेतली आणि त्या कंपनीतून बाहेर पडला.
बाहेर ड्रायव्हर गाडी घेऊन वाट बघत होता.
रोनक गाडीत जाऊन बसला.
त्याने बॅग बाजूला ठेवली… पण मोबाईल काढून पाहिलाच नाही.
त्याने बॅग बाजूला ठेवली… पण मोबाईल काढून पाहिलाच नाही.
गाडी सरळ घरी निघाली.
---
घरी पोहोचल्यावर त्याने बॅग बेडवर ठेवली.
त्याचे आई आणि बाबा त्याची वाट पाहत होते, कारण परवा मुलगी बघायला जायचं होतं.
रोनक आधी फ्रेश होऊन बाहेर आला.
तेवढ्यात त्याची आई म्हणाली,
“रोनक… आपल्याला परवा लवकर दादाकडे जायचं आहे.”
“रोनक… आपल्याला परवा लवकर दादाकडे जायचं आहे.”
रोनक थोडा थकलेला आवाजात म्हणाला,
“हो जाऊ… उद्या पण खूप मिटिंग आहेत. परवा जायचं आहे ना… तर काकांना सांगा, मुलीकडून होकार देऊन द्या.”
“हो जाऊ… उद्या पण खूप मिटिंग आहेत. परवा जायचं आहे ना… तर काकांना सांगा, मुलीकडून होकार देऊन द्या.”
हे ऐकून त्याचे बाबा म्हणाले,
“अरे आधी मुलीला बघू तरी दे… असं कसं होकार घ्यायचा?”
“अरे आधी मुलीला बघू तरी दे… असं कसं होकार घ्यायचा?”
रोनक म्हणाला,
“तुम्ही ठरवा… मला थोडा आराम करायचा आहे. डोकं खूप दुखतंय.”
“तुम्ही ठरवा… मला थोडा आराम करायचा आहे. डोकं खूप दुखतंय.”
“ठीक आहे… तू आराम कर,” त्याची आई म्हणाली.
रोनक त्याच्या रूममध्ये गेला.
तो बेडवर बसला… आणि विचार करू लागला.
तो मनात म्हणत होता
“मी असं कसं बोलू शकतो…?
मी मोनिकाशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार करू शकत नाही.”
मी मोनिकाशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार करू शकत नाही.”
त्याच्या डोळ्यासमोर सतत मोनिकाचाच चेहरा येत होता.
“तिच्यावर कितीही रागावलो तरी…
तिचा विचार केल्याशिवाय माझा दिवस जात नाही.”
तिचा विचार केल्याशिवाय माझा दिवस जात नाही.”
तो हळूच डोळे बंद करतो…
पण डोळे बंद केले तरी मोनिकाचाच चेहरा दिसत होता.
रात्रीही तो मोनिकाचाच विचार करत होता.
त्याचं डोकं खूप दुखत होतं.
त्याने डोक दुखायची गोळी घेतली…
आणि थोड्याच वेळात झोपून गेला.
मोनिकाने वॉशरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर थंड पाणी मारलं.
तिने स्वतःला थोडं शांत केलं… आणि खोल श्वास घेतला.
मग ती परत तिच्या जागेवर आली.
तिने मोबाईलकडे एकदा पाहिलं… पण लगेच तो बॅगमध्ये ठेवून दिला.
ती मनात म्हणाली
“आता मोबाईलकडे बघायचं नाही… नाहीतर पुन्हा त्यांचाच विचार येईल.”
“आता मोबाईलकडे बघायचं नाही… नाहीतर पुन्हा त्यांचाच विचार येईल.”
म्हणून तिने स्वतःचं लक्ष कामाकडे वळवलं.
ती फाईल उघडून काम करू लागली,
पण तिच्या मनात कुठेतरी रोनकचाच विचार चालू होता.
पण तिच्या मनात कुठेतरी रोनकचाच विचार चालू होता.
---
दुसरीकडे अनघाने घरी सगळं आवरून घेतलं होतं.
किचन, हॉल… सगळं नीट लावून झालं.
आजोबा तिच्या जवळ सोफ्यावर बसले होते.
अनघा कधी किचनमध्ये जात होती… कधी हॉलमध्ये काही लावत होती.
तेवढ्यात आजोबा हसत म्हणाले,
“अनघा, तू दिवसभर ऑफिसमध्ये काम करतेस… आणि घरी आल्यावरही कामच करत असतेस.”
“अनघा, तू दिवसभर ऑफिसमध्ये काम करतेस… आणि घरी आल्यावरही कामच करत असतेस.”
अनघा हसली.
“काही नाही आजोबा… घरचंच काम आहे,” ती म्हणाली.
काम करता करता ती आजोबांशी गप्पाही मारत होती.
घरात छान शांत आणि आनंदाचं वातावरण होतं.
आता फक्त तृप्ती, विक्रम आणि मोनिका येण्याची वाट बघायची होती.
अनिकेत अनघाच्या घरी आला.
आरतीने त्याला पाहताच हसून पाण्याचा ग्लास आणून दिला.
“घे अनिकेत, पाणी पिऊन घे,” आरती म्हणाली.
“हो आई,” अनिकेत म्हणाला आणि त्याने पाणी घेतले.
पाणी पिऊन झाल्यावर तो संजयकडे वळून म्हणाला,
“बाबा, चलायचं का? आपण ते घर बघून घेऊ.”
“बाबा, चलायचं का? आपण ते घर बघून घेऊ.”
“हो चल,” संजय म्हणाले.
दोघेही तिथून घर बघायला निघाले.
ते घर अनिकेतच्या घराजवळच होतं.
ते घर अनिकेतच्या घराजवळच होतं.
घर बघत असताना अनिकेत म्हणाला,
“बाबा… मी माझ्या बाबांना पण बोलवू का?”
“बाबा… मी माझ्या बाबांना पण बोलवू का?”
संजय हसत म्हणाले,
“अरे बोल ना… विचारतोस काय?”
“अरे बोल ना… विचारतोस काय?”
अनिकेतने लगेच अशोकला कॉल केला आणि त्यांना तिथे बोलावलं.
थोड्याच वेळात अशोकही तिथे आले.
घर बघून अशोक म्हणाले,
“अनिकेत, घर तर खूप छान आहे… मोठं आहे. पण पैसेही जास्त लागतील.”
“अनिकेत, घर तर खूप छान आहे… मोठं आहे. पण पैसेही जास्त लागतील.”
अनिकेत शांतपणे म्हणाला,
“ते बघू बाबा… पण तुम्हाला घर आवडलं का?”
“ते बघू बाबा… पण तुम्हाला घर आवडलं का?”
अशोक घर पुन्हा एकदा पाहत म्हणाले,
“घर खरंच छान आहे… आणि आपल्या घराजवळही आहे.”
“घर खरंच छान आहे… आणि आपल्या घराजवळही आहे.”
“हो,” अनिकेत म्हणाला.
थोडावेळ तिघेही घर आणि पैशांबद्दल चर्चा करत होते.
मग अनिकेत म्हणाला,
“ठीक आहे… आता आपलं बोलणं झालं आहे. मी उद्या अनघाला घेऊन येतो. तिलाही घर बघू दे.”
“ठीक आहे… आता आपलं बोलणं झालं आहे. मी उद्या अनघाला घेऊन येतो. तिलाही घर बघू दे.”
मग तो पुढे म्हणाला,
“आता मी निघतो… आज तृप्ती आणि विक्रम घरी जेवायला येणार आहेत. बाबा, मोनिका पण येणार आहे.”
“आता मी निघतो… आज तृप्ती आणि विक्रम घरी जेवायला येणार आहेत. बाबा, मोनिका पण येणार आहे.”
अशोक म्हणाले,
“हो… सकाळी तिने सांगितलं होतं. पण अनिकेत, एवढे पैसे मॅनेज कसे करणार?”
“हो… सकाळी तिने सांगितलं होतं. पण अनिकेत, एवढे पैसे मॅनेज कसे करणार?”
अनिकेत म्हणाला,
“मी आणि अनघा लोन घेणार आहोत. बाबांनी काही पैसे दिले आहेत… आणि माझी थोडी सेव्हिंग पण आहे.”
“मी आणि अनघा लोन घेणार आहोत. बाबांनी काही पैसे दिले आहेत… आणि माझी थोडी सेव्हिंग पण आहे.”
“बरं… ठीक आहे,” अशोक म्हणाले.
थोड्याच वेळात अनिकेत तिथून निघून गेला, कारण त्याला अजून संध्याकाळची तयारी करायची होती.
थोड्यावेळाने मोनिका घरी आली.
अनघाने दरवाजा उघडला आणि हसत म्हणाली,
“ये मोनिका.”
“ये मोनिका.”
मोनिका आत आली.
अनघाने लगेच तिला पाण्याचा ग्लास आणून दिला.
अनघाने लगेच तिला पाण्याचा ग्लास आणून दिला.
मोनिका सोफ्यावर बसली.
तेवढ्यात अनिकेतही घरी आला.
अजून तृप्ती आणि विक्रम आले नव्हते.
अनघाने अनिकेतलाही पाणी आणून दिलं.
पाणी पिऊन झाल्यावर अनघा उत्सुकतेने म्हणाली,
“घर कसं आहे?”
“घर कसं आहे?”
अनिकेत हसत म्हणाला,
“छान आहे. मी सगळं घर बघितलं. बाबांना पण तिथे बोलावलं होतं.”
“छान आहे. मी सगळं घर बघितलं. बाबांना पण तिथे बोलावलं होतं.”
मग तो पुढे म्हणाला,
“घर मोठं आहे… चार रूम आहेत. आणि मला तर खूप आवडलं. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे… तिथून तुझं घर आणि माझं घर दोन्ही जवळ आहेत.”
“घर मोठं आहे… चार रूम आहेत. आणि मला तर खूप आवडलं. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे… तिथून तुझं घर आणि माझं घर दोन्ही जवळ आहेत.”
अनघा आनंदाने म्हणाली,
“खरंच?”
“खरंच?”
“हो… उद्या तुला पण घेऊन जाईन. तूही बघून घे,” अनिकेत म्हणाला.
मोनिका शांतपणे त्यांच्या गप्पा ऐकत होती.
पण तिच्या मनात अजूनही रोनकचाच विचार चालू होता.
पण तिच्या मनात अजूनही रोनकचाच विचार चालू होता.
तेवढ्यात अनघा म्हणाली,
“आता फक्त तृप्ती आणि विक्रम येण्याची वाट बघायची आहे.”
“आता फक्त तृप्ती आणि विक्रम येण्याची वाट बघायची आहे.”
घरात सगळे शांतपणे गप्पा मारत बसले होते.
आजोबा त्यांच्या घरातून हळूहळू अनघा आणि अनिकेतच्या घरी येत होते.
दरवाज्याजवळ येताना त्यांनी अनिकेतचं बोलणं ऐकलं
तो घराबद्दल सांगत होता.
तो घराबद्दल सांगत होता.
आजोबा मनात विचार करू लागले
“घर चांगलं आहे… दोघांचं आयुष्य पुढे चाललं आहे.
उद्या हे दोघे कदाचित इथून निघून जातील…
मग मला कोणासोबत वेळ घालवता येईल?”
उद्या हे दोघे कदाचित इथून निघून जातील…
मग मला कोणासोबत वेळ घालवता येईल?”
त्यांच्या मनात थोडी उदासी आली.
पण लगेच ते स्वतःलाच म्हणाले
“नको… त्यांना कधीच कळू देऊ नये की मी उदास आहे.
जोपर्यंत ते माझ्यासोबत आहेत…
तोपर्यंत त्यांच्या सोबत आनंदाने राहायचं.
आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी जपून ठेवायच्या.”
जोपर्यंत ते माझ्यासोबत आहेत…
तोपर्यंत त्यांच्या सोबत आनंदाने राहायचं.
आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी जपून ठेवायच्या.”
असं मनात म्हणत आजोबा घरात आले.
“आजोबा आले!” अनिकेत आनंदाने म्हणाला.
आजोबा हसत म्हणाले,
“हो… मला कुठे तुमच्याशिवाय करमतं?”
“हो… मला कुठे तुमच्याशिवाय करमतं?”
अनिकेत लगेच म्हणाला,
“बरोबर बोललात आजोबा… तुमच्याशिवाय आम्हालाही करमत नाही.”
“बरोबर बोललात आजोबा… तुमच्याशिवाय आम्हालाही करमत नाही.”
हे ऐकून आजोबा हसायला लागले.
तेवढ्यात तृप्ती आणि विक्रमही आले.
अनघा आणि अनिकेत दोघांनी त्यांचं स्वागत केलं.
“या, या…” अनघा हसत म्हणाली.
अनघा लगेच पाणी घेऊन आली.
सगळे सोफ्यावर बसले.
विक्रमने मोनिकाकडे पाहून विचारलं,
“मोनिका, कशी आहेस?”
“मोनिका, कशी आहेस?”
मोनिका थोडं हसत म्हणाली,
“मी मस्त आहे…”
“मी मस्त आहे…”
पण तिच्या आवाजात थोडी उदासी होती.
तेवढ्यात तृप्ती उठली आणि मोनिकाला मिठी मारली.
“किती दिवसांनी भेटलो आपण,” तृप्ती हसत म्हणाली.
मग सगळे मिळून मस्त गप्पा मारत बसले.
घरात हसण्याचा आणि बोलण्याचा छान माहोल तयार झाला होता.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा