Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 88

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
मोनिका ऑफिसमध्ये पोहोचली.

ती आत आली आणि सरळ रोनकच्या केबिनकडे पाहायला गेली.
पण अजून रोनक आला नव्हता.

मोनिकाला थोडं वाईट वाटलं.

ती शांतपणे तिच्या जागेवर जाऊन बसली आणि काम करायला लागली.
पण तिचं लक्ष कामात पूर्ण लागत नव्हतं… मध्येच ती रोनकच्या केबिनकडे पाहत होती.


---

तिथे अनघा तिच्या केबिनमध्ये काम करत होती.
तिला आज दुपारपर्यंत काम पूर्ण करायचं होतं, कारण तिला हाफ डे घेऊन घरी जायचं होतं.

ती पूर्ण लक्ष देऊन काम करत होती.
म्हणूनच तिचं मोनिका आणि रोनककडे अजिबात लक्ष नव्हतं.


---

दुसऱ्या ऑफिसमध्ये विक्रमही त्याच्या कामात व्यस्त होता.

काम करताना अचानक त्याच्या मनात एक विचार आला.

तो मनात म्हणाला
“आज अनिकेतसोबत घराबद्दल बोलून घेऊ का?”

त्याने पुढे विचार केला

“आपलं घर आता थोडं लहान पडतंय… भविष्यात अजून प्रॉब्लेम होईल.”

विक्रम विचार करत होता
“अनिकेतने घर बघायला हवे आता.… त्याला सांगितले तर, कदाचित तो घर खाली करू शकेल.”

तो ठरवत होता की आज संध्याकाळी जेव्हा अनिकेतला भेटेल तेव्हा या विषयावर बोलायचं.


दुपार उलटून गेली होती…
पण रोनक अजूनही ऑफिसमध्ये आला नव्हता.

मोनिकाचं मन अजिबात शांत नव्हतं.

तिला तर जेवणही गेलं नव्हतं.
तिने तिचा डब्बा तिच्या मैत्रिणीला देऊन टाकला होता.

ती काम करत बसली होती, पण तिचं लक्ष सतत रोनकच्या केबिनकडे जात होतं.


---

अनघा आज डब्बा आणला नव्हता.
ती तिच्या केबिनमध्ये बसून काम करत होती.

तिला आज काम लवकर पूर्ण करून निघायचं होतं, म्हणून ती पूर्ण लक्ष देऊन काम करत होती.
म्हणून तिचं मोनिकाकडे लक्ष गेलं नव्हतं.

थोड्याच वेळात अनघाचं काम पूर्ण झालं.

ती बॅग घेऊन निघायला लागली.

तेवढ्यात मोनिकाचं लक्ष अनघाकडे गेलं.

अनघाही मोनिकाकडे पाहत होती.

अनघा उठली आणि मोनिकाजवळ आली.

“मोनिका, मी आता निघते… तू नंतर ये,” अनघा म्हणाली.

मोनिका लगेच म्हणाली,
“अनघा… आज रोनक ऑफिसमध्ये आले नाहीत का?”

अनघा शांतपणे म्हणाली,
“त्यांची आज बाहेर मीटिंग होती, म्हणून ते आज ऑफिसमध्ये आले नाहीत. उद्याही कदाचित मीटिंग आहे… त्यामुळे उद्या पण येणार नाहीत.”

हे ऐकून मोनिकाच्या मनात एकदम हलकं वाटलं.

ती मनात म्हणाली
“म्हणजे ते रागाने ऑफिसला आले नाहीत असं नाही… ते खरंच मीटिंगला गेले आहेत.”

पण लगेच दुसरा विचार तिच्या मनात आला.

“मग मी त्यांना बोलू कसं…?
त्यांना कॉल करू का?”
मोनिका मनात विचार करतच बसली होती.

अनघा म्हणाली,
“ठीक आहे… मी निघते.”

“हो…” मोनिका म्हणाली.

अनघा ऑफिसमधून निघून गेली.

मोनिका पुन्हा तिच्या कामाकडे वळली.

ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली
“आता काम करते… आणि घरी जाताना त्यांना कॉल करते.”


अनिकेत ऑफिसमध्ये बसून काम करत होता… पण त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते.

तो मनात म्हणत होता
“आज विक्रम येईल… आणि तो नक्की घराबद्दल बोलेल.
घर खरंच लहान पडत आहे… आता काय करू?
मला लवकर चांगलं घर मिळेल का?”

तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला.

स्क्रीनवर नाव दिसलं, संजय.

अनिकेतने लगेच कॉल उचलला.

“हॅलो बाबा,” अनिकेत म्हणाला.

“हॅलो अनिकेत,” संजय म्हणाले.

“काय झालं… कॉल कशासाठी केला होता?” अनिकेतने विचारलं.

संजय म्हणाले,
“इथे एक छान आणि मोठं घर आहे. चार रूम आहेत… आणि किंमत पण कमी आहे. म्हणून तुला बघायला बोलावतो.”

हे ऐकून अनिकेतला थोडा आनंद झाला.

तो म्हणाला,
“मी एकटा येऊन बघून जातो… अनघाला नंतर दाखवतो.”

संजय लगेच म्हणाले,
“अरे अनघाला पण घेऊन ये… ती पण घर बघून घेईल.”

अनिकेत म्हणाला,
“घेऊन आलो असतो… पण आज तृप्ती आणि विक्रम घरी जेवायला येणार आहेत.”

“बरं… मग तू आधी येऊन घर बघून जा. नंतर अनघा बघून घेईल,” संजय म्हणाले.

“ठीक आहे बाबा,” अनिकेत म्हणाला.

थोडावेळ दोघे अजून बोलले…

आणि मग कॉल कट झाला.

फोन ठेवून अनिकेत थोडा विचार करत बसला.

तो मनात म्हणाला
“जर हे घर खरंच चांगलं असेल… तर आमचा प्रॉब्लेम सुटेल.”

अनिकेत मनात म्हणाला,
“अनघाला कॉल करून सांगतो… नाहीतर ती माझी वाट बघत बसेल.”

त्याने लगेच अनघाला कॉल केला.

तेवढ्यात अनघा घरी पोहोचली होती.
ती बॅग ठेवत होती, इतक्यात तिचा मोबाईल वाजला.

तिने मोबाईल पाहिला, अनिकेतचा कॉल होता.
तिने लगेच कॉल उचलला.

“हॅलो अनिकेत,” अनघा म्हणाली.

“हॅलो अनघा… घरी पोहोचलीस का?” अनिकेतने विचारलं.

“हो, आत्ताच आले,” अनघा म्हणाली.

अनिकेत म्हणाला,
“मला तुझ्या बाबांचा कॉल आला होता. त्यांनी एक घर बघितलं आहे. घर मोठं आहे… चार रूम आहेत… आणि किंमतही कमी आहे. म्हणून मी आज जाऊन बघून येतो.”

अनघा म्हणाली,
“उद्या गेला असतास तर चाललं असतं ना?”

अनिकेत म्हणाला,
“आज विक्रम येणार आहे. तो घराबद्दल बोलला तर… आणि हे घर खरंच चांगलं असेल, तर आपण लवकर घर ठरवू शकतो. उद्या मी तुला पण घर बघायला घेऊन जाईन.”

“बरं… चालेल,” अनघा म्हणाली.

मग अनघा म्हणाली,
“तू जेवणाची ऑर्डर केली आहे ना? नाहीतर मी बनवायला घेते.”

अनिकेत म्हणाला,
“मी ऑर्डर दिली आहे. येताना घेऊन येतो. तू फक्त गोड काहीतरी बघ. आणि मोनिका येणार होती ना… ती आली का?”

अनघा म्हणाली,
“ती ऑफिस संपल्यावर येणार आहे.”

“ठीक आहे… मला थोडं काम आहे. नंतर बोलू,” अनिकेत म्हणाला.

आणि त्याने कॉल कट केला.

अनघाने मोबाईल ठेवला.

ती मनात म्हणाली,
“जर हे घर खरंच चांगलं असेल… तर आपला मोठा प्रॉब्लेम सुटेल.”

मग अनघा घर आवरायला लागली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली.


मोनिकाचं काम पूर्ण झालं होतं.
ती तिच्या जागेवर शांत बसली होती.

ऑफिसमध्ये सगळे आपापल्या कामात व्यस्त होते… पण मोनिकाचं लक्ष कामात नव्हतं.

तिच्या मनात सतत रोनकचाच विचार चालू होता.

तेवढ्यात तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं.

ती काही क्षण मोबाईलकडे पाहत राहिली…
मग तिने हळूच मोबाईल हातात घेतला.

तिचं हृदय थोडं जोरात धडधडत होतं.

ती मनात म्हणाली
“कॉल करू का…? की नको…?”

थोडा वेळ विचार केल्यानंतर तिने रोनकचा नंबर उघडला.

आणि शेवटी धाडस करून कॉल लावला.

मोबाईल कानाला लावून ती शांतपणे उभी राहिली.

फोन वाजत होता…

ट्रिंग… ट्रिंग…

मोनिकाचं हृदय अजूनच जोरात धडधडत होतं.

ती मनातच म्हणाली
“रोनक… प्लीज फोन उचला…”

फोन रिंग होत होता…
पण रोनक कॉल घेत नव्हता.

मोनिकाने एकदा कॉल केला…
दोनदा केला…
तीनदा केला…

पण तरीही रोनकने कॉल उचलला नाही.

मोनिकाचं मन अजूनच बेचैन झालं.

ती पुन्हा एकदा नंबर डायल करते…
पुन्हा रिंग वाजते…

पण यावेळीही कोणी कॉल घेत नाही.

आता मोनिकाच्या डोळ्यांत पाणी यायला लागलं.

तिला खूप रडायला येत होतं…
पण ती ऑफिसमध्ये होती.

आजूबाजूला सगळे लोक बसले होते.

म्हणून ती रडूही शकत नव्हती.

तिने पटकन डोळे पुसले.

ती मनात म्हणाली
“रोनक खूप रागावला आहे… म्हणून ते माझा कॉल घेत नाही.”

तिला तिचीच चूक वाटत होती.

“मी उगाच तसं बोलले…
त्यांना दुखावलं.”

ती शांतपणे तिच्या जागेवर बसली…
मोबाईल हातातच होता.

तिच्या डोळ्यातून हळूच एक अश्रू गालावरून खाली आला.

ती लगेच उठली आणि वॉशरूमकडे गेली,
जेणेकरून कोणी तिचं रडणं पाहू नये.



क्रमश

रोनक कुठे असेल?, मोनिकाचा कॉल का उचलत नाही आहे? ....


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all