तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 87
मोनिका झोपायला तिच्या रूममध्ये आली होती.
ती बेडवर बसली होती. थोडा वेळ मोबाईल पाहत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. मेसेज आला होता.
मोनिकाने मोबाईल हातात घेतला आणि मेसेज पाहिला.
मेसेज रोनकचा होता.
मेसेज पाहून ती थोडा वेळ शांत बसली.
तिच्या मनात खूप विचार सुरू झाले.
तिच्या मनात खूप विचार सुरू झाले.
“रिप्लाय द्यावा का…? की नको द्यायला?” ती स्वतःशीच विचार करत होती.
रोनकने इतक्या दिवसांनी मेसेज केला होता.
ऑफिसमध्ये दोघे रोज भेटत होते, पण दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नव्हतं.
ऑफिसमध्ये दोघे रोज भेटत होते, पण दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नव्हतं.
मोनिका काही क्षण मोबाईलकडे पाहतच राहिली.
शेवटी तिने हलकंसं स्मित केलं…
आणि टाईप केलं
आणि टाईप केलं
“हॅलो…”
तिने मेसेज पाठवला.
मेसेज पाठवल्यावर तिचं हृदय थोडं जोरात धडधडत होतं.
मेसेज पाठवल्यावर तिचं हृदय थोडं जोरात धडधडत होतं.
तिथे रोनक मोबाईल हातात घेऊनच बसला होता.
मोनिकाचा रिप्लाय पाहताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं.
त्याला खूप छान वाटलं.
तो लगेच मोबाईल हातात घेऊन पुढचा मेसेज टाईप करायला लागला.
रोनकने मेसेज केला
“कॉल करू का?”
मोनिकाने थोडा वेळ मोबाईलकडे पाहिलं आणि रिप्लाय केला
“हो…”
“हो…”
रोनकने लगेच मोनिकाला कॉल केला.
मोनिकानेही लगेच कॉल उचलला.
मोनिकानेही लगेच कॉल उचलला.
“हॅलो… जेवण केलं का?” मोनिका म्हणाली.
“हॅलो मोनिका… माझं झालं. तुझं झालं का?” रोनक म्हणाला.
“हो…” मोनिका म्हणाली.
थोडा वेळ दोघंही शांत होते.
मग रोनक हळू आवाजात म्हणाला,
“मोनिका… तू काय विचार केला आहे? डॅडने माझ्यासाठी स्थळ आणलं आहे… पण मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे.”
“मोनिका… तू काय विचार केला आहे? डॅडने माझ्यासाठी स्थळ आणलं आहे… पण मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे.”
मोनिका काही क्षण शांत राहिली.
“मी काही विचार करू शकत नाही आहे… कारण बाबांनी माझ्यासाठी पण एक स्थळ आणलं आहे. ते रविवारी मला बघायला येणार आहेत. मला काहीच समजत नाही आहे,” मोनिका म्हणाली.
“मोनिका, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मी फक्त तुझ्या उत्तराची वाट बघत आहे… मला तूच हवी आहेस,” रोनक भावुक होऊन म्हणाला.
मोनिका थोडं नाटक करत म्हणाली,
“मी काय उत्तर देऊ… रविवारी सांगते. बाबा काय म्हणतात त्यावर.”
“मी काय उत्तर देऊ… रविवारी सांगते. बाबा काय म्हणतात त्यावर.”
तिला माहिती होतं, रविवारी बघायला येणारा मुलगा रोनकच आहे.
रोनक थोडा घाबरला.
“मोनिका… जर तुझ्या बाबांना तो मुलगा आवडला आणि त्यांनी तुला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितलं तर?” रोनक म्हणाला.
मोनिका हळू आवाजात म्हणाली,
“मग मला बाबांचं ऐकावं लागेल… आणि त्या मुलासोबत लग्न करावं लागेल.”
“मग मला बाबांचं ऐकावं लागेल… आणि त्या मुलासोबत लग्न करावं लागेल.”
“मोनिका! तू काय बोलते आहेस? मी मरून जाईन… मला तूच हवी आहेस, तुझ्याशिवाय मी कोणाचा विचार नाही करू शकत,” रोनक भावनेत म्हणाला.
“असं कसं बोलता तुम्ही… किती मुली आहेत… त्यांच्यासोबत लग्न करा ना,” मोनिका म्हणाली.
हे ऐकून रोनकला खूप राग आला.
“मला नाही करायचं लग्न!” तो रागात म्हणाला.
आणि त्याने रागात कॉल कट करून टाकला.
इतकंच नाही तर त्याने मोबाईलही स्विच ऑफ केला. बाजूला ठेवून दिला.
मोनिका घाबरली.
तिने पुन्हा कॉल लावून पाहिला… पण मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता.
तिने दोन-तीन वेळा कॉल केला… पण काही उपयोग झाला नाही.
मोनिका हळू आवाजात म्हणाली,
“मी उगाचच जास्त बोलले… असं बोलायला नको होतं.”
“मी उगाचच जास्त बोलले… असं बोलायला नको होतं.”
तिने लगेच मेसेज टाईप केला
“सॉरी…”
पुन्हा एक मेसेज
“खरंच सॉरी…”
तिने चार-पाच वेळा सॉरी… सॉरी… असे मेसेज पाठवले.
मग ती बेडवर आडवी पडली.
तिला झोपायचा प्रयत्न करत होती…
पण तिच्या मनात सतत रोनकचाच विचार चालू होता.
पण तिच्या मनात सतत रोनकचाच विचार चालू होता.
“ते इतके रागावले असेल का…?”
हा विचार तिच्या मनातून जातच नव्हता.
मोनिका विचार करत करतच झोपून गेली.
मोनिका विचार करत करतच झोपून गेली.
---
सकाळी अनघा लवकर उठली. ती घरातली कामं आवरायला लागली.
तेवढ्यात अनिकेतही उठला. तो अनघाला हाक मारू लागला.
“अनघा… जरा इकडे ये ना,” अनिकेत म्हणाला.
अनघा लगेच त्याच्याजवळ आली.
“अनिकेत, काय झालं?” अनघा म्हणाली.
“आज संध्याकाळी आपण बाहेरून जेवण मागवू या. तू जास्त त्रास घेऊ नकोस. ऑफिसमधून आल्यावर सगळं तुलाच बनवावं लागेल,” अनिकेत म्हणाला.
अनघा म्हणाली,
“मी तर आज हाफ डे घेऊन येणार होते.”
“मी तर आज हाफ डे घेऊन येणार होते.”
अनिकेत हसत म्हणाला,
“तू हाफ डेने ये… पण तरीही जेवण बाहेरूनच आणू. तू आराम कर.”
“तू हाफ डेने ये… पण तरीही जेवण बाहेरूनच आणू. तू आराम कर.”
अनघा मस्त हसली.
“ठीक आहे… आता मी नाश्ता बनवते,” ती म्हणाली.
“मी पण आवरतो,” अनिकेत म्हणाला.
अनघा किचनमध्ये गेली.
तिने नाश्ता आणि अनिकेतचा डब्बा बनवला.
तिने नाश्ता आणि अनिकेतचा डब्बा बनवला.
थोड्याच वेळात आजोबाही त्यांच्या घरून आले.
“गुड मॉर्निंग आजोबा,” अनघा म्हणाली.
“गुड मॉर्निंग,” आजोबा हसत म्हणाले.
नाश्ता तयार झाला.
अनघाने नाश्ता टेबलवर आणून ठेवला.
अनिकेत आणि आजोबांना वाढला… आणि तीही त्यांच्यासोबत बसली.
अनिकेत आणि आजोबांना वाढला… आणि तीही त्यांच्यासोबत बसली.
सगळे मिळून नाश्ता करत होते.
तेवढ्यात आजोबा म्हणाले,
“काल माझं माझ्या भावासोबत बोलणं झालं… त्यांनी रविवारी मुलगा-मुलगी भेटण्याचा प्रोग्राम ठेवला आहे.”
“काल माझं माझ्या भावासोबत बोलणं झालं… त्यांनी रविवारी मुलगा-मुलगी भेटण्याचा प्रोग्राम ठेवला आहे.”
“वा! मस्तच आहे. मोनिकाला चांगला जीवनसाथी मिळेल,” अनिकेत म्हणाला.
“हो ना…” अनघा हसत म्हणाली.
थोड्यावेळाने अनिकेत म्हणाला,
“चला, आता ऑफिसला जायची वेळ झाली.”
“चला, आता ऑफिसला जायची वेळ झाली.”
नाश्ता झाल्यावर अनघाने सगळं आवरलं.
थोड्याच वेळात अनघा आणि अनिकेत दोघेही ऑफिसला निघाले.
अनघा आणि अनिकेत गाडीत बसून ऑफिसला निघाले.
रस्त्यात दोघंही गप्पा मारत जात होते.
“अनघा, आज तू हाफ डे घेणार आहेस ना?” अनिकेत म्हणाला.
“हो… दुपारपर्यंत काम करून निघेन. मग घरी जाऊन थोडी तयारी करते,” अनघा म्हणाली.
“पण मी सांगितलं आहे ना… जास्त काम करू नकोस. आपण जेवण बाहेरून मागवणार आहोत,” अनिकेत हसत म्हणाला.
“माहिती आहे… पण थोडंफार तरी करावंच लागेल,” अनघा म्हणाली.
अनिकेत तिच्याकडे पाहून म्हणाला,
“तू सगळ्यांची किती काळजी घेतेस.”
“तू सगळ्यांची किती काळजी घेतेस.”
अनघा हलकंसं हसली.
“तृप्ती आणि विक्रम येणार आहेत… म्हणून मला छान वाटतंय,” ती म्हणाली.
“हो… आणि मला पण विक्रमसोबत थोडं बोलायचं आहे,” अनिकेत म्हणाला.
“कशाबद्दल?” अनघा उत्सुकतेने म्हणाली.
अनिकेत थोडं हसला.
“असं काही खास नाही… फक्त गप्पा,” तो म्हणाला.
दोघंही हसत होते.
असं बोलता बोलता ऑफिस जवळ आलं.
अनिकेतने गाडी पार्क केली.
दोघेही गाडीवरून उतरले आणि अनघा ऑफिसमध्ये गेली
अनिकेत पण तिथून त्यांच्या ऑफिसला निघून गेला
मोनिकाने कसेतरी स्वतःला आवरले. तिचा मूड अजिबात नव्हता.
तिने मोबाईल पाहिला…
पण रोनकने अजून तिच्या मेसेजला रिप्लाय दिला नव्हता.
मोबाईलही त्याने अजून ओपन केला नव्हता.
पण रोनकने अजून तिच्या मेसेजला रिप्लाय दिला नव्हता.
मोबाईलही त्याने अजून ओपन केला नव्हता.
मोनिकाला खूप वाईट वाटत होतं.
ती मनातच म्हणाली
“मी उगाच तसं बोलले… असं बोलायला नको होतं.”
“मी उगाच तसं बोलले… असं बोलायला नको होतं.”
तेवढ्यात ललिताने किचनमधून हाक मारली.
“मोनिका, ये नाश्ता करायला.”
ललिताने मोनिकाचा आवडता नाश्ता बनवला होता.
मोनिका टेबलाजवळ आली.
तिने कसेतरी थोडा नाश्ता खाल्ला.
तिने कसेतरी थोडा नाश्ता खाल्ला.
“आई, आज मी दादाकडे जाणार आहे. तृप्ती आणि विक्रम दादा येणार आहेत,” मोनिका म्हणाली.
ललिता म्हणाल्या,
“तृप्तीला इथे येण्यासाठी वेळ नव्हता… आणि तू तिकडे जात आहेस?”
“तृप्तीला इथे येण्यासाठी वेळ नव्हता… आणि तू तिकडे जात आहेस?”
मोनिका शांतपणे म्हणाली,
“आई, अनघाने खूप आधी विचारलं होतं. तेव्हा तृप्तीने ‘हो’ म्हटलं होतं.”
“आई, अनघाने खूप आधी विचारलं होतं. तेव्हा तृप्तीने ‘हो’ म्हटलं होतं.”
ललिता काही बोलल्या नाहीत.
तेवढ्यात अशोक म्हणाले,
“चला… आधी आपण सगळे नाश्ता करून घेऊ.”
“चला… आधी आपण सगळे नाश्ता करून घेऊ.”
ललिता नाश्ता घेऊन आल्या.
सगळ्यांनी मिळून नाश्ता केला.
थोड्यावेळाने मोनिका उठली.
“मी ऑफिसला निघते,” ती म्हणाली.
“ठीक आहे… काळजी घे,” अशोक म्हणाले.
मोनिका तिची बॅग घेऊन ऑफिसला निघून गेली…
पण तिच्या मनात अजूनही एकच विचार चालू होता
रोनक अजूनही रागात असेल का…?
रोनक अजूनही रागात असेल का…?
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा