अनघा घरी आली. आज ऑफिसमध्ये खूप काम होते, त्यामुळे ती खूप दमली होती.
ती हॉलमध्ये येऊन बसली आणि अनिकेतची वाट पाहू लागली.
“आधी फ्रेश होते… तोपर्यंत अनिकेत येईल,” अनघा मनात विचार करत उठली.
ती हळूच बेडरूममध्ये गेली आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली.
थोड्या वेळाने अनघा फ्रेश होऊन बाहेर आली. तिने केस पुसत आरशात स्वतःकडे पाहिलं. थोडी दमलेली दिसत होती, पण चेहऱ्यावर शांतपणा होता.
ती बाहेर हॉलमध्ये आली आणि पाण्याचा ग्लास घेऊन बसली.
तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली.
अनघा उठली.
“अनिकेत आला असेल,” ती मनात म्हणाली आणि दरवाजा उघडायला गेली.
दरवाजा उघडताच तिच्यासमोर अनिकेत आणि आजोबा उभे होते.
“अरे आजोबा… तुम्ही?” अनघा आश्चर्याने म्हणाली.
“का गं… आम्ही येऊ शकत नाही का?” आजोबा हसत म्हणाले.
“असं नाही आजोबा… या ना आत,” अनघा हसत म्हणाली.
दोघेही आत आले. अनिकेतने बॅग सोफ्यावर ठेवली.
“आज खूप दमलो आहे,” अनिकेत सोफ्यावर बसत म्हणाला.
“तुम्ही दोघे बसा, मी पाणी घेऊन येते,” अनघा म्हणाली आणि किचनमध्ये गेली.
थोड्याच वेळात ती पाण्याचे ग्लास घेऊन आली.
“हे घ्या,” ती म्हणाली.
अनिकेत आणि आजोबांनी पाणी घेतले.
“अनघा, आज खूप काम होतं का ऑफिसमध्ये?” आजोबा विचारत म्हणाले.
“हो आजोबा, आज खूप काम होतं… त्यामुळे जरा दमले,” अनघा म्हणाली.
“अनिकेत कुठे भेटला तुम्हाला?” अनघा आजोबांना विचारत म्हणाली.
“मी तुझ्या घरी येत होतो, तर रस्त्यातच हा भेटला. मग म्हटलं सोबतच जाऊ,” आजोबा म्हणाले.
अनिकेत हसत म्हणाला, “हो… आजोबांनी मला पकडलंच.”
“बरं, तुम्ही दोघे बसा. मी चहा करून आणते,” अनघा म्हणाली आणि किचनमध्ये गेली.
थोड्याच वेळात घरात चहाचा सुगंध दरवळायला लागला…
अनघा चहा घेऊन आली.
तिने अनिकेत आणि आजोबांसमोर चहाचे कप ठेवले.
ती त्यांच्या समोर बसली.
“अनिकेत, मी उद्या तृप्ती आणि विक्रमला घरी जेवायला बोलावलं आहे,” अनघा म्हणाली.
“अगं मग छानच आहे ना,” अनिकेत हसत म्हणाला.
“पण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल ना,” अनघा विचार करत म्हणाली.
“हो… ते पण बरोबर आहे. आपण बाहेर जाऊन गिफ्ट घेऊन येऊ.
पण आधी तू खिचडी बनव. आजोबा, तुम्हाला चालेल ना?” अनिकेत म्हणाला.
पण आधी तू खिचडी बनव. आजोबा, तुम्हाला चालेल ना?” अनिकेत म्हणाला.
“मला काहीही चालेल. खिचडी पण चालेल,” आजोबा हसत म्हणाले.
“ठीक आहे. मला पण तेच बनवायचं होतं,” अनघा म्हणाली.
अनघा लगेच किचनमध्ये गेली.
तिने पटकन खिचडी लावली. कुकरमध्ये शिट्टी लागली आणि घरात छान वास पसरला.
तिने पटकन खिचडी लावली. कुकरमध्ये शिट्टी लागली आणि घरात छान वास पसरला.
तीने किचन आवरून घेतलं.
“खिचडी तयार होईपर्यंत मी पटकन तयार होऊन येते,” अनघा म्हणाली आणि तिच्या रूममध्ये गेली.
थोड्याच वेळात अनघा तयार होऊन बाहेर आली.
तोपर्यंत अनिकेतही तयार झाला होता.
“आजोबा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. गिफ्ट घेऊन येतो,” अनिकेत म्हणाला.
“हो… जा. मी घरात आहे,” आजोबा म्हणाले.
अनघा आणि अनिकेत दोघेही घराबाहेर पडले.
दोघेही तृप्ती आणि विक्रमसाठी गिफ्ट घ्यायला दुकानाकडे निघाले.
आई, आपण तृप्ती आणि विक्रम दादाला जेवायला बोलवायचं का? मोनिका म्हणाली.
“मी तिला कॉल केला होता… पण ती दोन-तीन दिवस खूप बिझी आहे,” ललिता म्हणाल्या.
“असं आहे का… ठीक आहे मग. थोड्या दिवसांनी बोलवू या,” मोनिका म्हणाली.
“हो… तेच बरं. सगळे निवांत असतील तेव्हा बोलवू,” ललिता म्हणाल्या.
मोनिका थोडा वेळ शांत बसली होती.
“आई, मी जरा माझ्या रूममध्ये जाते,” मोनिका म्हणाली.
“हो जा… आणि थोडा आराम कर,” ललिता म्हणाल्या.
मोनिका तिच्या रूममध्ये गेली.
ती बेडवर बसली आणि विचार करू लागली…
ती बेडवर बसली आणि विचार करू लागली…
रोनकबद्दल काय उत्तर द्यायचं…?
हा विचार तिच्या मनात सतत येत होता.
हा विचार तिच्या मनात सतत येत होता.
अनिकेत आणि अनघा तृप्ती आणि विक्रमसाठी छान गिफ्ट घ्यायला मॉलमध्ये गेले होते.
दोघेही वेगवेगळ्या दुकानात फिरत होते.
“अनघा, तृप्तीला काय आवडेल बरं?” अनिकेत म्हणाला.
“तृप्तीला घर सजवायला खूप आवडतं… आपण काहीतरी डेकोरेशनचा सेट घेऊ या का?” अनघा म्हणाली.
“हो, ते छान आहे… आणि विक्रमसाठी?” अनिकेत म्हणाला.
अनघा थोडा विचार करू लागली.
“विक्रमला घड्याळ खूप आवडतात… आपण छान वॉच घेऊ या का?” अनघा म्हणाली.
“परफेक्ट आयडिया आहे,” अनिकेत हसत म्हणाला.
दोघांनी एक छान शोपीस सेट तृप्तीसाठी आणि एक सुंदर घड्याळ विक्रमसाठी घेतले.
गिफ्ट छानपणे पॅक करून घेतले.
गिफ्ट घेतल्यानंतर दोघेही आनंदी झाले.
“आता घरी जाऊ या… आजोबा वाट बघत असतील,” अनिकेत म्हणाला.
“हो, आणि मला अजून उद्याच्या जेवणाची तयारी पण करायची आहे,” अनघा म्हणाली.
दोघेही गाडीमध्ये बसले आणि घरी निघाले.
अनिकेत आणि अनघा घरी आले.
आजोबा हॉलमध्ये बसले होते. दोघांना पाहून ते हसले.
“काय मग, गिफ्ट घेतले का?” आजोबा विचारत म्हणाले.
“हो आजोबा, खूप छान गिफ्ट घेतले आहे,” अनघा म्हणाली.
अनिकेतने गिफ्ट आजोबांना दाखवले.
“खूप छान आहे,” आजोबा म्हणाले.
थोडावेळ तिघेही गप्पा मारत बसले. ऑफिसमधल्या आणि घरच्या गोष्टींच्या गप्पा चालू होत्या.
तेवढ्यात अनघा उठली.
“मी जेवण वाढते,” ती म्हणाली.
ती लगेच किचनमध्ये गेली आणि जेवण वाढून घेऊन आली.
अनिकेत आणि आजोबा टेबलाजवळ बसले.
अनघाने सगळ्यांना गरम गरम खिचडी आणि तूप वाढले.
“वा… खूप छान वास येतो आहे,” आजोबा म्हणाले.
सगळ्यांनी मस्त गप्पा मारत जेवण केले.
जेवण झाल्यावर अनघाने टेबल आवरले.
अनिकेत आणि आजोबा थोडावेळ हॉलमध्ये बसून बोलत होते.
दिवसभराचा थकवा असल्यामुळे थोड्याच वेळात सगळे झोपायला निघाले.
मोनिका रविवारी मुलगा बघण्याचा प्रोग्राम ठेवला आहे, अशोक म्हणाले.
“काय!” मोनिका थोडी आश्चर्याने म्हणाली.
“तुला काही प्रॉब्लेम आहे का?” अशोक शांतपणे विचारत म्हणाले.
“नाही… तसं काही नाही. पण पहिलीच वेळ आहे ना… म्हणून थोडं घाबरायला होत आहे,” मोनिका म्हणाली.
“हो, पहिली वेळ असते तेव्हा थोडी भीती वाटतेच. पण समोरचे लोक चांगले असतील, नीट बोलतील तर मग काहीच भीती वाटत नाही,” ललिता समजावत म्हणाल्या.
मोनिका शांतपणे ऐकत होती.
“तू काही टेन्शन घेऊ नकोस. फक्त बोलायचं… ओळख करून घ्यायची. लगेच काही ठरवायचं नसतं,” अशोक म्हणाले.
“हो बाबा…” मोनिका हळूच म्हणाली.
मोनिकाच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू होते
रोनक… आणि रविवारी येणारा मुलगा…
रोनक… आणि रविवारी येणारा मुलगा…
ती थोडी गोंधळलेली होती… पण काही बोलली नाही.
“डॅड, तुम्ही आधी माझ्याशी बोललातही नाही… आणि थेट माझ्यासाठी स्थळ कसं काय घेऊन आलात?” रोनक थोडा आश्चर्याने म्हणाला.
“आजच ते स्थळ आलं आहे बेटा. म्हणून आधी तुला सांगितलं,” रोनकचे डॅड शांतपणे म्हणाले.
रोनक काही बोलला नाही.
फोन हातात होता… पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं.
त्याच्या डोळ्यासमोर तर फक्त मोनिकाच येत होती.
तिचं हसणं… तिचं बोलणं… ऑफिसमध्ये तिचं शांतपणे काम करणं…
सगळं त्याच्या डोळ्यासमोर फिरत होतं.
रोनक मनात विचार करत होता.
“मोनिकाला कॉल करू का?… की मेसेज करू?…
तिला विचारू का… तिने माझ्या प्रपोजलबद्दल काय विचार केला आहे?”
तिला विचारू का… तिने माझ्या प्रपोजलबद्दल काय विचार केला आहे?”
पण लगेच दुसरा विचार त्याच्या मनात आला
“काही नाही… जर तिने ‘नाही’ म्हटलं तर?
किंवा अजून विचार करत असेल तर?”
किंवा अजून विचार करत असेल तर?”
रोनक थोडा गोंधळला.
त्याने मोबाईल हातात घेतला… मोनिकाचा नंबर उघडला…
पण कॉल करण्याआधीच तो थांबला.
“काय करू…?” तो स्वतःशीच हळू आवाजात म्हणाला.
क्रमश
रोनक मोनिकाला कॉल मेसेज करेल का? त्यांचे काय बोलणे होते. .....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा