Login

तूच माझी राधा भाग ४७

एकत्र येण्यासाठी चाललेली धडपड
 तूच माझी राधा

भाग ४७

राधा ने फोन ठेऊन थोडा वेळ विचार केला आणि एक फोन लावला . थोडं बोलून ठेवून दिला . रोहन ला एक मेसेंज करून बाहेर पडली . तिच्या डोक्यात नंदन चे बोलणं फिरत होत . ती विचार करू लागली , " खरच आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो तेंव्हा मी त्याच्यावर किती उखडले होते पण त्याने किती शांत पणे माझा राग कमी केला . आपण त्याला काय काय बोललो पण त्याने तर... "

तेवढ्यात राधाचा फोन वाजला, " हॅलो "  " हॅलो मॅम . काम झालाय तुम्ही भेटता का ?"
" हो . लगेच आपल्या नेहमीच्या ठिकणी ये . मी येते  तिथे "  असं बोलून ती निघाली.थोड्यावेळात राधा ठरलेल्या ठिकाणी पोचली . तिथे तो माणूस आधीच आलेला होता .  राधा त्याला बघून म्हणाली , " बोल बंड्या , काय माहिती काढून आणली आहे ?"

" मॅडम , हि जी बाई आहे ना ती उद्या लंडन ला निघालीय ."
" का ?"
" मॅडम , ती जॉब साठी चाललीय . आणि तिचा कोणातरी बॉयफ्रेंड आहे तो पण म्हणे तिकडे आहे म्हणून आणि अजून एक तिने आधी एका मुलाच्या मागे लागायचा प्रयत्न केला होता पण तो काय पूर्ण झाला नाही  . शेवटी आता हा नवीन मुलगा धरलाय . तिला  आई एकटीच आहे . पण ती कधीही आईच ऐकत नाही . "

" अच्छा . बरं आता अजून दोन काम कर ." त्याने मानेनेच होकार कळवला .  

ते बघून राधा ने त्याला काम सांगून निघून गेली .  तिने पुढे येऊन नंदन ला फोन लावला. इकडे हे सगळे जण पुढे काय करता येईल हे ठरवत होते.  फोन टेबलावर च असल्यामुळे जेंव्हा  नंदन चा फोन वाजला तेंव्हा सगळ्यांनी  फोन कडे एकदा तर नंदन कडे एकदा बघत होते कारण फोनवर राधा चा नाव झळकत होत.नंदन सकट सगळे आश्र्चर्य चकित झाले . नंदन ने सगळ्यांकडे एकदा बघितले आणि फोन उचलला .

" हॅलो  बोल ना राधा " हे जरा अडखळतच म्हणाला .

" फोन स्पीकरवर टाक . "

" का ?"

" मला माहितीय दादा आणि तुम्ही सगळे एकत्र आहात . "  असं म्हंटल्यावर सगळे एकमेकांकडे बघू लागले .

 " तुमचं एकमेकांकडे बघून झाले असेल तर फोन स्पीकरवर टाकतो का ?" हे ऐकून तर सगळ्यांचे डोळे च मोठे झाले .

शेवटी रोहनने डोळ्यांनीच फोन स्पिकवर टाकायला सांगितला  नंदन ने त्याचप्रमाणे केले.

" हॅलो राधा , मी रोहन . का फोन केला होता ? आणि तुला कसं माहिती आम्ही एकत्र आहोत . मी  निघालो तेंव्हा तू झोपली होतीस . "

" ते फार महत्वाचे नाहीये. मी काय सांगतीय ते महत्वाचे आहे . "
मधेच नंदन बोलला , " काय बोलायचे आहे ?"

" आताच्या आता तुम्ही सगळे माझ्या घरी ये . मग बोलू . आणि प्रिया तू डोकं शांत ठेव . भावावर चिडून काही होणार नाहीये. त्यामुळे शांतपणे त्यांच्याबरोबर घरी ये . " असं म्हणून तिने फोन ठेवून दिला आणि घराकडे निघाली . इकडे ह्यांचे आश्चर्याने डोळेच मोठे झाले होते .  सगळे विचार करत होते हिला कसे कळले.

आमोद विचार करतच म्हणाला," नंदन आपल्याला आता निघायला पाहिजे पुन्हा राधा चिडायची अवघड असतं हे तुलाही माहिती"

"हो बरोबर आहे तुझं चला निघूया."

सगळे राधाकडे जायला निघाले तोपर्यंत राधा ही घरी पोहोचली होती .  ती मस्तपैकी सगळ्यांना खाण्यासाठी गरम गरम मॅगी आणि कॉफी करत होती.

सगळे घरी पोहोचल्यावर रोहनने आपल्या किल्लीने दार उघडले तर घरभर मॅगीचा वास पसरला होता. हा वास घेऊन प्रिया जोरात ओरडली, " वहिनी मला पण मॅगी."

वहिनी ऐकून सगळ्यांनी तिच्या डोक्यात मारले तर रोहन म्हणाला, " तुम्ही बसा. मी बघतो आत मध्ये जाऊन. "

सगळे काळजीत बसले. नंदनला तर राधाला कधी बघतोय. अस झालं होतं. तरी पण तो शांत बसला होता.

इकडे आमोद आणि प्रिया  मगाशी पडलेल्या प्रश्नावरच चर्चा करत होते . त्यांना काही समजतच नव्हतं तिला आपण एकत्र आहोत हे कसं माहिती .

रोहन राधाला आवाज देत आत आला , " राधा , ए राधा ."

" अरे दादा  आलात का तुम्ही ? "

" हो तू काय करतीय ? आम्हाला कशाला बोलवलंय ?"

" हो हो सांगते . चल सगळ्यांना एकत्रच सांगते . " ती गॅस बारीक करून बाहेर आली.

आल्या आल्या तिचे  पहिले लक्ष नंदन कडेच गेले . दोघेही एकमेकांकडे बघत होते . पण राधाने बघून न बघितल्या सारखं केलं .

" हॅलो , प्रिया , हॅलो अमोद "

दोघेही एकदम बोलले , " हॅलो "

प्रिया म्हणाली , " काय ग  तू आम्हाला कशाला बोलावले ?"

मध्येच रोहन म्हणाला , " आधी हे सांग तुला कसे माहिती आम्ही एकत्र आहोत ?"

" देणार सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आधी आपण मी मॅग्गी केलीय ती खाऊ या मग बोलू या . "


नंदन  म्हणाला , " आधी आपण बोलूया मग काय खायचे ते खाऊया . "


राधा चिडतच म्हणाली , " नाही . मी सांगतीय तसेच होणार . "


" हे बघ राधा , आधीच माझं डोकं गरम आहे तू अजून राग आणू नको . "


" मी राग आणतीय ? आपण आधी असं वागायचं कशाला ज्याचा राग येईल ?"


" मी काय वागलो ?"


बघूया पुढच्या भागात ह्यांचे भांडण काय वळण घेतंय ते ???

क्रमश :