Login

तूच माझी राधा (शेवट ) भाग ५०

एक छोटीशी प्रेम कथा
तूच माझी राधा

भाग ५०


मागील भागात आपण पहिले कि नंदन ने श्रावणी कडून खरं काय ते समजून घेतलं .  आता त्याचं मन फक्त राधाने कोणताही विश्वासघात करू नये असं वाटतंय . आयुष्यात फक्त दुःखच पाहिलं होत . जे आईच्या बाबतीत झालं ते नको होईला असं त्याची मनापासून इच्छा होती.

अमोद आणि नंदन हे  प्रिया आणि रोहन ज्या कॅफेत होते तिथे आले . आल्या आल्या प्रियाने विचारले , " काय झालं ? श्रावणी काय म्हणाली ?"

" अगं थांब दाखवतो . " असं म्हणून त्याने तिचे रेकॉर्डिंग दाखवले .

" चला . श्रावणी चा विषय संपला . "

" हो ना  "

  हे तिघे गप्पा मारत होते पण नंदन पुढे काय होईल . याचा विचार करत होता . त्याची आता खूप इच्छा होत होती राधाला भेटावे . म्हणून पण ती .......
 
मध्येच नंदन बोलला , " रोहन , राधा कुठे आहे ?"

" अरे ती तिच्या केस च्या कामासाठी बाहेर गेलीय . चला मी निघतो . उद्या भेटूया . "

" हो चालेल . "

प्रिया मध्येच म्हणाली , " रोहन  दादा , फोन च लक्षात ठेव ."  त्याने मानेनेच होकार कळवला . आणि तो निघून गेला .

या दोघांना काही उत्तर देउ लागू नये म्हणून प्रिया पण म्हणाली . चला निघूया .


इकडे राधा नंदन च्या मावशीच्या घरी आली .  तिने खोल श्वास घेतला आणि घरात पाऊल टाकलं . पण ती घरात गेली आणि समोर मावशी आणि नंदन च्या आईला बघून अवसान गळून गेलं होतं . आता कसं होणार ? देवा कुठे अडकवलं .

हसत हसत आत आली .

" राधा , तू इकडे ? "

" हो थोडं काम होत मावशींकडे ? "

" मावशीकडे ?"

" माझ्याकडे काय काम ? ये आधी बस . मग बोलू .

चहा पाणी झाल्यावर राधाने बोलायला सुरुवात केली .

तिने थोडक्यात तिचं काय म्हणणं आहे ते सांगितलं आणि उद्या भेटू सांगून निघून गेली.  

प्रत्येक जण राधा काय निर्णय घेणार आपापल्या परीने विचार करत कधी झोपले कोणालाच कळले नाही .


सकाळी राधा लवकर निघून गेली . जाता जाता दादासाठी चिठ्ठी ठेवून गेली .

बाहेर पडल्या पडल्या पहिल्यांदा राधाने गणपती बाप्पा चे दर्शन घेतले . ठरल्या प्रमाणे मावशींच्या घरी गेली . येताना लागणारे सगळं सामान घेऊन आली होती . मावशींची थोड्या गप्पा मारून ती कामाला लागली .


तिने घर फुंलांच्या माळांनी खूप छान सजवलायला सुरवात केली .  थोड्यावेळात तीच सजवून झाल्यावर ती थोडं काम करायला बाहेर आली . नंदन साठी छान ड्रेस खरेदी केला आणि त्याच्या घरी पाठवला  . प्रियाला फोन करून तसं सांगितलं आणि त्याच्यासाठी एक अंगठी घेऊन ती परत मावशी कडे आली .

तोपर्यंत ४ वाजत आले होते म्हणून त्याने बाहेर सजवायला सुरुवात केली .  ते करता करता तिने सगळ्यांच्या फोनवर एक मसेज पाठवला .

नंदन ला तिचा मेसेज वाचून खूप आनंद झालं . किमान ती बोलत तर आहे . बघूया मॅडम काय म्हणतायत म्हणून तो आवरायला गेला .

सगळे ७ वाजता मावशीच्या घरी आले . तिथला नजारा बघून खूप  खुश झाले होते . सगळ्या झाडांना लाईटींग केली होती . समोरच्या बाजूला मोठा स्क्रीन लावला होता त्यावर कधी राधा चे कधी नंदनचे फोटो दिसत होते . तिथेच पुढे मोठा फुलांचा हार्ट केला होता . त्याच्या  वरच्या बाजूला  काही ओळी लिहिल्या होत्या .


सगळं हे बघून खूप खुश झालं . सगळे जण आजूबाजूला बघत होते राधा कुठे दिसतीय का पण ती त्यांना कुठेच दिसत नाही . तेवढ्यात आवाज येईला लागला

खळखळणाऱ्या पाण्याला मिळाली सुंदर वाट 
उथळ वाहणाऱ्या पाण्याला मिळाला एक प्रवाह
प्रवाहात  मिळाला एक नवीन टप्पा
टप्प्याला हवीय एक कायमची  साथ

असं म्हणत म्हणत राधा नंदन जवळ येऊन थांबली  
तिने सुंदर असा त्याच्या शर्टला मॅच होईल वनपीस घातला होता . नेहमीप्रमाणे साधासा मेकअप केलेला दिसत होता . तिच्या डोळ्यात एक विश्वास दिसत होता . तिच्या चेहऱ्यावर लाईट मुळे चमक आली होती आधी मेकअप आणि त्यात लाईट चा प्रकाशाने तिचा चेहरा उजळून निघाला होता .

तो आपल्यात हरवून गेलाय हे बघूनच ती गुढघ्यावर बसून म्हणाली ,
खळखळणाऱ्या पाण्याला मिळाली सुंदर वाट  उथळ वाहणाऱ्या पाण्याला मिळाला एक प्रवाह प्रवाहात  मिळाला एक नवीन टप्पा टप्प्याला हवीय एक कायमची  साथ अशी साथ जी आयुष्य भर राहील सोबत
नंदनराव होणार काय

या उथळ वाहणाऱ्या पाण्याचा सुंदर प्रवाह

असं म्हणत तिने अंगठी त्याच्या समोर केली .

नंदन ने कोणताही वेळ न घालवता तिच्या समोर हात केला . दोघं एकमेकांकडे बघत होते . तेव्हढ्यात प्रिया आणि अमोद ने एकच जल्लोष केला . तेंव्हा दोघे भानावर आले  आणि नंदन ने कोणाची पर्वा न करता तिला एक घट्ट मिठी मारली आणि कायम सोबत राहण्याचे वाचन घेतलं .

थोड्यावेळाने दोघं भानावर आले मग नंदन ने आणि राधाने  सगळ्यांना आता प्रयन्त काय झाले ते सविस्तर सांगितलं आणि आम्ही दोघे लग्न करणार आहे अशी घोषणा केली .

आपल्या पोरांचा आनंद बघून सगळे खूप खुश झाले . राधाच्या आई बाबांनी नंदनच्या आई ची माफी मागितली . मध्येच नंदन उठून राधा समोर उभा राहिला . 

एकदा सगळ्यांकडे बघितलं आणि परत राधा कडे बघून म्हणाला ,
      
       " तुझी आणि माझी  भेट झाली एका खेळातून पण  तू खेळताना तुला मी पाहिलं आणि आत मध्ये काहीतरी जाणवलं पण ते तेंव्हा नाही कळालं . त्या जाणिवेतून मी तुझ्याशी खेळायला आलो. त्यांनतर  नटखट, हसरी, गोड  आवाजाची,  थोडीशी भांडखोर,  प्रेमाने सगळ्यांची काळजी घेणारी  , जिद्द पूर्ण करणारी अशी विविध रूप तुझी पहिला मिळाली .  खरं तर मी स्वतः ला कुठे हरवून टाकलं होत तुझ्यामुळे ते थोडं थोडं वर आलं होतं . मी माणसांवर विश्वास ठेवायला लागलो . माझे बाबा गेल्यानंतर फक्त जबाबदारी ने वागायचं एवढंच माहिती होतं  . त्यासाठी सगळं सोडून दिलं . पण तुझ्याकडून शिकलो जबाबदारी असली ना ती हसतखेळत पेलता येते .  हे करताना आपल्याला योग्य निर्णय क्षमतेची, योग्य साथीची गरज असते . आणि ती आज तुझ्यामुळे मी मिळाली . माझ्या आयुष्यातील ' राधा ' आज जीवनात आली. हि ' राधा' राहील ना माझ्या आयुष्यात कायम ? "

असं म्हणत त्याने तिच्या समोर हात केला अन् तिनेही हसत हसत हसत हात हातात देत म्हणाली , " राधा  तुझीच "

समाप्त


पहिल्यांदा मी तुमची  माफी मागते .  काही कारणास्तव लिहिण्यामध्ये अडथळा आला. आणि तुम्हाला सरळ गोष्ट वाचायला नाही मिळाली .  त्याबद्द्दल ' क्षमस्व '
असं असून सुद्धा तुम्ही माझ्या पहिल्या दीर्घकथेला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार . असेच पुढेही साथ देत राहा . असेच प्रेम राहो हि सदिच्छा .