Login

तूच माझी राधा भाग ४९

एकमेकांसाठी चाललेली धडपड
तूच माझी राधा

भाग ४९

प्रिया आणि राधा घरातून बाहेर पडल्या . तर हे तिघे श्रावणीला कसं बोलतं  करायचे याचा विचार करत होते ?  तेवढ्यात रोहन ला एक मेसेज आला . तो मेसेज वाचून रोहन म्हणाला , " नंदन , तुम्ही ठरवा . मला एक काम आलाय ते करून येतो . रात्री एकत्र जेवायला भेटू . "

" चालेल . भेटू . आम्ही पण निघतो . " अमोद कडे बघून म्हणाला , " चल , निघूया . "

दोघेही श्रावणी होती त्या मॉल मध्ये आले . नंदन ने शांत पणे श्रावणीला फोन केला

" हाय श्रावणी , "

" हाय . अरे आज कसा काय फोन केलाय ?"

" अगं तुला भेटावेसे वाटले म्हणून फोन केला . तू कुठे आहे ?"

" अरे , मी आपल्या आवडत्या मॉल मध्ये . "

" अच्छा . मी पण तिथेच आहे फूड कोर्ट ला भेटू . ये तिथे . "

" हो आलेच . "

श्रावणी मनात विचार करतच चालत निघाली . " आज याला का भेटायचे असेल ? हा मिळत नाही म्हणून मी लंडन ला निघालीय आणि आज याला भेटायचे आहे . राधा ने सोडून दिले कि काय ? अरे वा असं झालं तर किती मस्त . मी इथेच राहणार . आणि मी आणि नंदन एकत्र . वा . "

विचार चालू होतास कि तिला नंदन चा आवाज आला , " श्रावणी "

" आले नंदन . "

नंदन आणि श्रावणी एका टेबलावर बसले होते . तर त्याच्या मागे अमोद असा बसला होता कि तो श्रावणीला दिसणार नाही पण तिचे बोलणे रेकॉर्डिंग होईल .

नंदन ने बोलायला सुरुवात केली . नंदन ने बोलत बोलत तिने राधा बरोबर काय केलं ते काढून घेतले . आणि शेवटी म्हणाला, " हे बघ , श्रावणी आत्ता तुझ्या तोंडाने राधा ला काय सांगितले आहे ते काबुल केलाय आणि तू लंडनलाचाललीयस . तर तिकडेच राहायचे . परत माझ्या आणि राधाच्या मध्ये आली ना  आता पर्यंत मैत्रीण म्हणून शांत होतो पण पुढच्या वेळी मी तो विचार बाजूला ठेऊन तुझी वाट लावायला सुद्धा मागे पुढे पहाणार नाही . कळलं का ?  आणि हो आज पासून तुझा आणि माझा कायमचा संबंध संपला .  परत कधीच माझ्याशी संपर्क करायचा नाही .  निघ आता . "

बिचारी श्रावणी शॉक मध्येच निघून गेली . आपण काय  विचार करून आलो आणि इथे काय झालं ???

ती गेल्यावर नंदन डोळे मिटून तिथेच  बसून राहिला . तिच्या शेजारी अमोद येऊन बसला .पण त्याला कळलेच नाही . त्याने हळूच  त्याच्या खांद्यावर ठेवला  आणि आवाज दिला , " नंदन "

त्याने खोल श्वास घेतला आणि डोळे उघडले .  " अरे , बघितलं . आपलीच माणसं कसं करतात . म्हणून मी इतके दिवस या सगळ्यापासून लांब होतो .  पण  आता राधा ने  शेवट पर्यंत साथ देवो हीच अपेक्षा . पण ...... "

" पण काय ?"

" त्याच्याआधी तिने होकार तर दिला पाहिजे ना ? "

" देईल . तू नको वाईट विचार करू . "

" चल जाऊया घरी . "

" थांब .  कॉफी घेऊ . "

" हो चालेल .   बरं तू एकदा प्रिया ला फोन करून विचार त्या कुठे आहेत ? "

" हो विचारते . "  असं म्हणत तो कॉफी आणायला गेला .

इकडे प्रिया आणि राधा एका कॅफेमध्ये बसले होते . राधा ने मेसेज करून रोहन ला पण बोलावले होते . आता तिघे मिळून पुढे काय करायचे ते ठरवतं होते .

राधाने प्रिया आणि रोहन ला ती काय आणि कसे करणार ते सांगितले .

" दादा , तू उद्या आई आणि बाबांना बोलावून घे . आधी पुण्यात बोलावं मग सांगेल पुढे काय ते ?"

" त्या आधी मला तू सांग तू काय निर्णय घेतला आहे . आणि त्यांना का बोलवायचे आहे ? "

मध्येच प्रिया म्हणाली , "  राधा , खरचं सांग दादांशी लग्न करणारास का नाही ?"

" मी सांगतीय तेवढं करा . बाकीचे उद्या कळेल . "

" अगं पण ....... " प्रियाचा फोन वाजला . अमोद चाच होता .

राधा ने तिला इथलं काही सांगू नको अशी खूण केली. तिने मानेनेच होकार कळवला .

प्रिया आल्यावर राधा म्हणाली , " प्रिया , तू पण काकूंना आणि मावशींना आता काय सांगू नको मी स्वतः काय सांगायचे ते सांगेन . "

" बरं ऐका , तुम्ही दोघे घरी जावा . माझं थोडं केस च काम आहे . मी थोड्यावेळाने घरी येते . " असं बोलून राधा गेली पण .

ती गेलेली बघून रोहनने लगेच नंदन ला फोन लावला .

" हॅलो . मी रोहन बोलतोय . "

" बोल . काय झालं ?"

" इथे काही विशेष नाही . तुम्ही कुठे आहात ? झालं का काम ?"

" हो झालं . राधा पण आहे का  ?"

" नाही . आपण आता कुठे भेटू शकतो . मी आणि प्रिया येतो . "

" थांबा . आम्हीच येतो . लोकेशन पाठवा . "

" बरं चालेल .  या आम्ही वाट बघतो . "

असं बोलून फोन ठेवला . परत विचारात गुंतले .


बघूया पुढच्या भागात राधा काय करतीय ते .