तूच माझी राधा
भाग ४८
नंदन म्हणाला , " आधी आपण बोलूया मग काय खायचे ते खाऊया . "
राधा चिडतच म्हणाली , " नाही . मी सांगतीय तसेच होणार . "
" हे बघ राधा , आधीच माझं डोकं गरम आहे तू अजून राग आणू नको . "
" मी राग आणतीय ? आपण आधी असं वागायचं कशाला ज्याचा राग येईल ?"
" मी काय वागलो ?"
" तू ..... "
प्रिया मध्येच म्हणाली , " आता दोघेही शांत . आणि राधा तू सांग आम्हाला इथे कशाला बोलावले ?"
राधा शांत होऊन म्हणाली , " सगळं सांगते . " तीने एक मोठा श्वास घेऊन सोडला आणि सगळ्यांकडे बघून म्हणाली , " आपण जेंव्हाऑफिस मध्ये खूप दिवसांनी भेटलो तेंव्हा मी जरी आपल्याला ओळखत नाही असं दाखवत होते तरी आत मधून तुम्हाला बघून खूप आनंद झाला होता . त्या दिवसानंतर मनात खूप खळबळ उडाली होती . ती शांत करण्यासाठी मी दादा ला आज सगळं सांगायला बोलावले होते .
नंदन त्या दिवशी मी तुला एवढाच सांगितलं होत कि माझ्याकडून काही उत्तर येणार नाही त्यामागे एक कारण होत ते कारण म्हणजे तुमची खास मैत्रीण श्रावणी.... "
नंदन डोळे मोठे करून म्हणाला , " माझी खास वगैरे काही मैत्रीण नाहीये . ती फक्त मैत्रीण होती आता ती पण नाहीये . "
" हो हो कळलं . लगेच एवढे चिडू नका . "
" ए बाई , पुढे बोल . " रोहन म्हणाला
" हां तर श्रावणी , तीने मला फोन केला होता
" हॅलो , राधा "
" हॅलो कोण बोलतायत? तुम्हाला माझं नाव कसे माहिती ?"
" मी श्रावणी , नंदन ची मैत्रीण . "
" बोल , माझ्याकडे काय काम आहे ?"
" माझं नंदन वर प्रेम आहे तर तू आमच्या मध्ये येऊ नको . "
" तुमचं नंदन वर प्रेम आहे ना मग मला काय सांगताय ? "
" कारण तू लग्नाला नकार देयचा . "
" हे मला नंदन ने सांगायला पाहिजे त्याचंही तुमच्यावर प्रेम आहे मग मी नकार देईन . "
" तो का सांगेल तुला . "
" मग मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा "
" तू विश्वास ठेव अगर ठेवू नको . तू फक्त नकार दे . "
" नाही दिला नकार तर ..."
" तर मी तुझ्याआई वडिलांना तुमच्या कोकणच्या घरापर्यंत पोचू नाही देणार याची व्यवस्था करेन आणि एक हे कोणालाही कळता कामा नाही . "
हे ऐकून सगळे स्तब्ध झाले . कोणाला काय बोलावं ते सुचत नव्हतं . सगळे खूप वेळ शांत बसून होते .
नंदन आणि अमोद ला आपली मैत्रीण असं वागेल हे पचतच नव्हतं . काय खरं काय खोटं तेच समजत नव्हतं . दोघेही एक प्रकारे च विचार करत होते , " ह्या गोष्टीचा शोध घ्यावाच लागेल . "
बराच वेळाने रोहन म्हणाला , " राधा , मग तू आज हे कसं काय सांगितलं ?"
" मगाशी मी झोपेतून उठल्यावर तुला फोन केला होता . पहिल्यांदा तू कट केला . पण मी परत लावला तर तुझ्याकडून चुकून चालूच राहिला . मग काय मी तुमचे सगळे बोलणे ऐकले . "
नंदन मध्येच ओरडला , " काय , तू आमचं बोलणं ऐकले . "
" हो. त्यात ओरडण्या सारखं काय आहे ?"
" अगं तुला कळत नाही का तू माझी बाजू ऐकली आता तू निर्णय घेऊ शकते ."
ते ऐकून राधा शांत च झाली . नंदन तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता . त्याची धडधड वाढली होती. मनात आलं , ' हिने अजून नकार दिला तर ???? '
कोणाला काय बोलावे या वर काही काळातच नव्हतं . म्हणून सगळेच शांत बसून होते . काही काळानंतर रोहन म्हणाला , " मी आपल्याला कॉफी आणतो . तुम्ही बसा . "
कोणाला काय बोलावे या वर काही काळातच नव्हतं . म्हणून सगळेच शांत बसून होते . काही काळानंतर रोहन म्हणाला , " मी आपल्याला कॉफी आणतो . तुम्ही बसा . "
सगळ्यांनी होकार कळवला . जाता जाता रोहनने अमोद आणि प्रिया ला डोळ्यांनी खून करून काही तरी बोला असं सांगितले .
" राधा , ए राधा "
" नंदन ,ए नंदन "
प्रिया आणि अमोद दोघांनाही आवाज देत होते पण या दोघांचे लक्ष च नव्हते . दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते पण मनात वेगळे विचार चालू होते .
" देवा , आता काय सांगू यांना ? हे कसे बघतायत मला . मलातर काही सुचतच नाही . "
" हि अजून तयार नाही का ? नसू दे मी आता हिला कुठेच पाठवणार नाही . बघतो आता कसे लग्न करत नाही ते ?"
रोहनने आतूनच आवाज दिला , " राधा , ए राधा अगं कॉफी कुठेय ?"
तो आवाज ऐकून दोघेही भानावर आले . मी आलेच म्हणत ती पळतच आत गेली .
अमोद ने खांद्याने नंदन ला धक्का मारला . अन प्रिया जोरात म्हणाली , " दादा , काय होतंय ? आम्ही इथेच आहोत ?"
" ए गप्प . तू नको ते विचार करू नको . "
रोहन आणि राधा कॉफी घेऊन आले . कॉफी पित पित राधा म्हणाली , " मगाशी मी तुमचं बोलणं ऐकल्यावर माझ्या माणसांकडून श्रावणी ची माहिती गोळा केली . ती माहिती सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावले होते . "
प्रिया म्हणाली , " अगं अजून काय केलाय तिने ? आता मी तिला तर इतकी मारेन ना कि ............... ?
" अगं हो शांत हो जरा . तिने अजून काही नाही केलं पण ती पुढे जाऊन काही करू नये म्हणून आपण एक काम करूया ?"
सगळे एकदम बोलले , " काय काम ? "
" ती उद्या लंडन ला चाललीय तर नंदन तुम्ही आणि अमोद ने तिच्याकडून सगळं वदवून घ्यायचे. ती खरं सांगत नाही तो पर्यंत तिला लंडनला जाऊ द्यायचे नाही . "
मध्येच रोहन म्हणाला , " राधा , आता याची काय गरज आहे ? "
" आहे . कारण , ती आता नंदन ला सोडून दुसऱ्या मुलाच्या मागे चालली आहे . तिथे जाऊन कोणाचं आयुष्य बरबाद करू नये आणि ....... "
" आणि काय ?" नंदन म्हणाला .
" काही नाही . चला कामाला लागा . प्रिया चाल तो पर्यंत माझे एक काम आहे ते करून येऊ . "
प्रिया म्हणाली , " हो चल पण कुठे जायचंय ? "
" कळेल तुला . तू फक्त चल . आणि दादा तू यांच्याबरोबर जा . "
" आणि हो अमोद , श्रावणी आता तिची खरेदी करायला या दोघांच्या आवडतीचा माँल मध्ये गेलीय . " हे बोलताना तिने नंदन कडे बघितले .
नंदन तर मनातच म्हणाला , " देवा , राग लवकर काही जात नाही वाटतं . पण मी घालवणार नक्की . "
बघूया पुढच्या भागात प्रिया आणि राधा कुठे गेलेत ?
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा