तूच माझी राधा
भाग ४६
नंदन आईला सगळं सांगून शांत तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसला होता . आईपण मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत काही काळ शांत बसली आणि नंतर म्हणाली , " बाळा , आता योग्य निर्णय घेऊन तिला तिच्यामर्जीने तुझी कशी होईल याचा विचार कर आणि पाऊल उचल . मी कायम तुझ्याबरोबर आहे . " असं म्हणून आईने त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि जायला लागली .
दारापाशी गेल्यावर आई मागे वळून धमकी वजा म्हणाली , " मला राधा च सून म्हणून हवी आहे . त्यामुळे तयारीला लागा . " आणि निघून गेली .
नंदन तर डोक्याला हात लावून बसला होता . मनात विचार करत होता , " तिला तर मी माझी करणारच पण हि तीन माकडं माझ्यावर रागावलीयत आधी त्यांना शांत करावे लागेल ."
असं म्हणून तो घरच्या बाहेर पडला . त्याने प्रिया आणि अमोद चे लोकेशन चेक केलं तर ते अमोद च्या घरीच दाखवत होते त्यामुळे लगेच तिकडे निघाला .
इकडे राधा ची झोप पूर्ण झाली म्हणून ती उठून बाहेर आली तर रोहन नव्हता .
राधा चहा करता करता विचार करू लागली . " खरं काय आहे ? आज नंदन आपल्यामागे आला काय ? हे खरं कि श्रावणी ने सांगितलं ते खरं . याच खरं उत्तर कसं मिळेल ?"
राधा चहा करता करता विचार करू लागली . " खरं काय आहे ? आज नंदन आपल्यामागे आला काय ? हे खरं कि श्रावणी ने सांगितलं ते खरं . याच खरं उत्तर कसं मिळेल ?"
विचारात तिने चहा करून खिडकीत येऊन बसली . ती कितीवेळ बसली तिला कळलेच नाही . दादा पण कुठे गेलाय काय माहित . असं म्हणून तिने दादाला फोने केला तर तो उचलताच नव्हता .
इकडे नंदन आमोद च्या घरी पोचला . त्याने दारातून आत पाऊल टाकतानाच मोठा श्वास घेतला आणि मनाला सांगितलं आज जे होईल ते चांगल च होणार आहे . आणि मी तसं करणार पण आहे .
"अमोद , अमोद , प्रिया प्रिया " आवाज देत तो घरात शिरला .
दोघेही त्याचा आवाज ऐकून बाहेर आले . त्याच्यामागे रोहन पण आला . रोहन बाहेर येत असतानाच राधा चा फोन येत होता पण त्याने नंदन समोर उचलाच नाही .
प्रिया चिडतच म्हणाली , " काय रे कशाला ओरडतोयस आमच्या नावाने ? इथे कशाला आलाय जा ना तिच्या मागे ?"
" मी तुमच्याशी बोलायला आलोय ."
मध्येच अमोद म्हणाला , " आमच्याशी काय बोलायचे आहे ?"
प्रिया म्हणाली , " अरे आपणच तिघे वेडे हे दोघ एकत्र यावे म्हणून आपण प्रयन्त करतोय आणि हा त्या श्रावणी बरोबर .... "
"श्रावणी बरोबर काय ..."
"काही नाही. "
"आता का शांत बसली. काही माहित नाही आणि उगाच बोलते . आमोद तुला पण अस वाटतं का ?"
"त्याला काय विचारतो. तो तर तुझा चमचा ... "
" चमचा वैगरे काही नाही . आता माझं पूर्ण बोलणं होईपर्यंत गपचूप बसायचे . जरा आवाज काढला तर तुझं आणि अमोद च लग्न लावून देणार नाही कळलं का ?"
असं म्हंटल्यावर प्रिया एकदम गप्प बसली .
परत रोहनचा फोन वाजला तो नंदन चा आवाज ऐकून त्याने फोन कट करायला गेला तर चुकून तो उचला गेला पण त्याला काळलच नाही . त्याला वाटलं कट झालाय म्हणून त्याने तो खिशात टाकला .
नंदन ने बोलायला सुरुवात केली .
" हे बघा , तुम्हाला जसं वाटतंय तसं माझे आणि श्रावणीचे काही नाहीये . आम्ही जेंव्हा तुमच्याकडे फिरायला आलो होतो रोहन तेंव्हा तिने मला तिथे सांगितलं होत तिचे माझ्यावर प्रेम आहे . पण त्याचवेळी मी तिला सांगितलं माझ्यामनात तुझयाबद्दल काहीच नाही . आणि माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे . "
प्रिया हे ऐकून जोरात म्हणाली , " म्हणजे अजून दुसरं कोणीतरी ? "
" ए गप्प सांगितलं ना .. "
अमोद ने तिचा हात दाबून तिला शांत केलं . आणि नंदन कडे बघून म्हणाला , " मग काय झालं ?"
" मग ती खूप चिडली माझ्यावर . मग ती निघून गेली . पण तिचे आख्खी सहल होईपर्यंत माझ्यावर लक्ष होत . "
" हो पण ती दुसरी कोण आहे ? " प्रिया म्हणाली .
" ती दुसरी कोण नाही तर राधा च आहे ?"
" काय ???" तिघेही एकदम ओरडले .
" ओरडू नका . "
अमोद म्हणाला , " पण तू तर त्या सहलीत च पहिल्यांदा तिला भेटला मग ... "
" हो मी तिला पहिल्यांदा भेटलो . पण म्हणतात ना प्रेम होईल एक क्षण पुरेशा असतो . तसंच काहीसे माझ्या बाबतीत झालं. मी राधा ला पहिल्यांदा पाहिलं आणि तिच्याशी भांडलो ना तेंव्हा जाणवलं हि माझी आहे . पण मी तेंव्हा काही म्हणालो नाही कारण मला ह्याला काय म्हणतायत ते कळतच नव्हतं. पण मी राधाला माझ्याच घरी बघितले तेंव्हा मनाला जो काय आनंद झाला होता ना तो कोणालाच कळणार नाही . पण त्या आनंदावर या श्रावणीने येऊन विरजण टाकलं . "
हे बोलून थोडा वेळ तो शांत बसला .
सगळेही शांत झाले .
इकडे राधा ने हे ऐकून फोन ठेऊन दिला . ती विचार करू लागली , " आपण कोणावर विश्वास ठेऊन हे काय करून बसलो ? आता काय करू ?
"
"
बघूया पुढच्या भागात राधा आणि नंदन कसा सोडवतायत गुंता ?
क्रमश :
सौ . चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा