शीर्षक: तोडगा भाग-९
" त्या पुस्तकामध्ये असे लिहिले होते की, आपला जो नैसर्गिक स्त्रोत आहे तो जर हळूहळू करून नष्ट व्हायला लागला तर आपल्याला दुसऱ्या दुनियेची मदत घ्यावी लागेल." पृथ्वी नभाला ती इथे येण्याचे कारण सांगत होता.
"आता तुम्हाला समजलं का? हे सर्व आधीपासूनच होणार असं ठरलेलं होतं." आणखी तिला सांगत तो म्हणाला.
" बरं ,मग आता मग काय करायचं ? म्हणजे या दुनियेतून मला अशी काय मदत मिळेल की पुन्हा आमच्याकडे पाण्याची समस्या आहे ती हळूहळू दूर होईल ?" नभाने उत्सुकतेने त्याला विचारलं.
" तुम्हाला आता समस्याचं निराकरण करण्यासाठी तो मंत्र इथे मिळेल , परंतु तो मंत्र पूर्ण नाही त्या मंत्रासोबतच तुम्हाला त्या पुस्तकातील एक मंत्र असे दोन्ही मंत्र जोडून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करावी लागेल . तसेच ती प्रार्थना तुम्हाला येथे करता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला हे सगळं जिथे अस्तित्वात आहे; असं आपण मानतो त्या अंतराळात जावं लागेल." पृथ्वीने सांगितले.
" अरे पण, त्यासाठी स्पेसशिप लागेल ना ? ते माझ्याकडे कुठे आहे ? " आधी ऐकताना तिला हे सगळं वेगळं आणि एकदम छान वाटत होतं, परंतु त्याने सांगितलेल्या गोष्टी शक्य नाही ,असे वाटत असल्याने तिला वाईट वाटले.
" कुठलाही गोष्टींना जोडण्यासाठी एक मार्ग असत. तोच मार्ग तुम्हाला इथे मिळेल आणि तिथे अंतराळात तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि तिथूनच तुम्हाला दोन दरवाजे दिसतील. जो योग्य दरवाजा आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे, तेव्हाच तुम्ही तुमच्या दुनियेमध्ये पुन्हा जाणार." त्याने नीट समजावत सांगितले.
" आणि समजा मी जर चुकीचा दरवाजा उघडला तर?" तिने मनात आलेली शंका विचारली.
" तर दुर्दैवाने तुम्ही तिकडेच अडकून राहणार." त्यांनी सांगितले.
" कसं का करत नाही आपण, तुम्हाला सर्व माहीत आहे तर तुम्हीच माझ्यासोबत का अंतराळात येत नाही ? म्हणजे मला मध्ये अडकून रहावे लागणार नाही आणि मला पाण्याच्या समस्येवर तोडगा सुद्धा मिळेल." कोणीतरी आपल्यासोबत असावे म्हणून नभाने त्याला विचारले.
" ते शक्य नाही. कारण तिथे कोणीतरी एकच व्यक्ती जाऊ शकते. " चेहरा पाडून त्याने सांगितले.
" तुमच्या इथे ऑक्सिजनची समस्या आहे, मग तुम्हाला त्यावर उपाय नको आहे का? " जर पृथ्वी तिला त्यावर तोडगा सांगू शकतो तर तो स्वतःच्या दुनियेतील समस्या दूर का करू शकत नाही,असा विचार मनात येताच तिने लगेच विचारले.
" तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्या समस्येचे निराकरण केल्यानंतर तुमच्या दुनियेत असणाऱ्या ज्या ऑक्सिजन भरपूर प्रमाणात देणाऱ्या वनस्पती आहेत त्या मला मिळण्याचे वरदान आहे; पण त्यासाठी मला एक सत्कर्म करावे लागणार आहे आणि ते सत्कर्म म्हणजे मला तुमची मदत करणे; हेच आहे. म्हणूनच मी तुम्हाला मदत करत आहे." त्याने सत्य तिला सांगितले.
' पृथ्वीला माझी मदत करण्यामध्ये एवढा रस का आहे हे आता मला समजले.' मनाशी नभा म्हणाली.
" ठीक आहे, मला तिकडे जाण्यासाठी जे काय करावे लागेल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही मला पुढच्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सांगितल्या तर बरं होईल." तिने वेळ न घालवता बोलली.
थोड्याच वेळामध्ये पृथ्वीने तिला तिथे जाण्याचा तिथे जाण्याचा एक मंत्र तसेच त्या पुस्तकातील कोणता मंत्र वाचायचा तेही सांगितले आणि तिथे गेल्यानंतर तिला एकत्रित मंत्र कसा करून बोलायचं याबद्दल सुद्धा माहिती पुरवली.
" आजही तुमच्यासारखे माणसे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी ह्या जगात तयार आहेत हे बघून मनाला समाधान वाटले. जर या सर्व गोष्टींमुळे आमच्याकडे पाण्याची समस्या कमी झाली आणि तुमच्याकडची ऑक्सिजनची समस्या कमी झाली तर पुढे जाऊन त्याचा दोघांना सुद्धा फायदा होईल. "
ज्या पद्धतीने तिला पृथ्वीने सांगितलेला मंत्र आणि पुस्तकातील मंत्र तिने विचारपूर्वक योग्यरीत्या उच्चारून नभा अंतराळात पोहोचली होती. तिथे ऑक्सिजन नसल्यामुळे पुरेसा ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क पृथ्वीने नभाला दिला होता.
नभानेही जास्त वेळ न घालवता जे सांगितले आहे त्यानुसार पुन्हा तो मंत्र एकवीस वेळा उच्चारून आणि देवाला आवाहन केले होते. तसेच पुढे जे काही नैसर्गिक स्त्रोत असतील त्या सर्वांना जपण्याचे सुद्धा वचन तिने दिले होते. सर्व पूर्ण झाल्यानंतर दोन मोठे दरवाजे नभासमोर प्रकट झाले होते.
पृथ्वीने सांगितल्याप्रमाणे आता खरी कसोटी ही नभाची होती. कारण त्यातला योग्य दरवाजावर तिने निवडला नसता तर, ती तिथेच अडकून राहणार होती. त्यामुळे तिने पुन्हा देवाचे नाव घेतले त्यानंतर त्यातला एक दरवाजा तिने उघडला.
लख्ख प्रकाश नभाच्या अंगावर पडला होता, तेव्हा आपण चुकीचा पर्याय तर निवडला नाही, या भीतीने नभाच्या हृदयाची स्पंदने वाढली होती. हळूहळू करत तो प्रकाश कमी होऊ लागला आणि तेव्हा नभाच्या लक्षात आले की तिने तिच्या दुनियेचे दार उघडले होते.
क्रमशः
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करुन नक्की सांगा.
अष्टपैलू लेखक स्पर्धा
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
