शीर्षक: तोडगा भाग-८
" ओ मिस, डी डी एस म्हणजे? " त्याने न समजून विचारले.
" दुसऱ्या दुनियाचे सदस्य." त्याच्या मागे पळून थकल्यामुळे मोठा श्वास घेत ती म्हणाली.
" हे घ्या." त्याने छोटासा ऑक्सिजन सिलेंडर तिला देत सांगितले.
" ह्याचे पैसे ? " तिने विचारले.
" खात्यात लिहून ठेवा आणि नंतर द्या." तो हसत म्हणाला.
तिला त्याच्या वागण्याचे वेगळे वाटले. मघापासून तिचा मोठा होणारा श्वास त्याने पाहिला होता, म्हणून तिला मदत केली होती.
"भूक लागली असेल मिस ?" त्याने विचारले.
"हो, खूप आणि माझे नाव मिस नभा. तुमचे काय ? " तिला त्यांचे नाव जाणून घेण्याची इच्छा होती.
" पृथ्वी. " तो म्हणाला.
' इकडे पण आमच्यासारखी नावे असतात? ' तिने स्वतःशीच प्रश्न केला.
त्याने तिचा हात पकडला आणि एका स्टोअरमध्ये जाऊन प्रोसेस फूड होते. तर तिथल्या मशीनमध्ये कार्ड स्वाइप करुन आणि काही बटणे दाबून त्याला गरम करायला सांगितले.
" खूपच जास्त आधुनिकीकरण आहे तुमच्या दुनियेत! " ती आता आजूबाजूचा परिसर न्याहाळत म्हणाली.
" तुमची दुनिया पण काही कमी नाही." त्यानेही तिला सांगितले.
" तुला खरंच माझ्या दुनियेविषयी माहीत आहे? " तिला अजून पण विश्वास बसत नव्हता.
"हो, जास्त नाही पण जेवढे स्वप्नात आणि त्यानंतर स्वतः काही अंदाज लावून मला तसे वाटते. " त्याने सांगितले.
"तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, हे एक बरे झाले. तुम्ही त्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या का? " तिने विचारले.
"हो, आमच्या दोन पिढ्यांनी पाणी संवर्धनासाठी खूप कष्ट घेतले होते; पण त्याचवेळी हवा प्रदूषित होणार नाही ह्यासाठी उपाय केले असते तर सर्वजण आज ऑक्सिजन मास्क घालून फिरत नसते. " त्याने नाराजीने सांगितलं.
" मला जरा पाणी प्यायला मिळेल का? फुकट पाणपोई एकेकाळी आमच्याकडे होत्या. आता त्या पण टाळेबंद झालेत. पाण्याला सोन्याचा भाव आहे." ती चेहरा पाडून सांगत होती.
" हो थांबा,पाणी देतो." असे म्हणून त्याने त्याच्या बॅग मधून पाण्याची बाटली काढली.
तिने त्याच्याकडे थोडे पाणी हवे करत अर्धी पाण्याची बॉटल रिकामी केली. त्याला ती पुन्हा परत करताना तिला आपण एवढे पाणी प्यायले त्याचे वाईट वाटले.
तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव बघून त्याने तिला जास्त विचार करू नका असे सांगितले.
" पृथ्वी तुम्हाला काय वाटत ? मी तुमच्या दुनियेत का आली असेल? " तिला पडलेला प्रश्न त्याला विचारला.
" मलाही आधी तोच प्रश्न पडला होता , जो तुम्हाला आता पडला आहे. मला वाटते तुमच्या आणि माझ्या दुनियेत जी काही समस्या आहे त्यावर कदाचित उपाय आपल्याला सापडेल असे वाटते. तुम्ही मदत कराल का ? " त्याने विचारले.
" हो पण कशी करणार? " तिने विचारले.
" मला सांगा तुमच्या दुनियेत इथे जशी वृक्षतोड केली आहे तसे केले आहे का? " त्याने विचारले.
" म्हणजे वृक्षतोड केली आहे पण जास्त नाही. आमच्याकडे वृक्ष संवर्धनासाठी काही संस्था कार्यरत आहेत त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत." तिने माहिती दिली.
" हे बरे आहे. तुम्ही माझी मदत करू शकता. त्याबदल्यात मी पण तुम्हाला मदत करेन." तो म्हणाला.
"तुम्ही काय पाण्याचे टँकर आमच्या दुनियेत सोडणार का? " अशी थट्टा करत ती हसायला लागली.
"ते शक्य नाहीये ,पण मला मदत करता येईल ती मी नक्की करेन. " तो ठामपणे म्हणाला.
"नेमकी तुम्ही काय मदत करणार आहात? " त्याने विचारले.
" आपण ज्या पुस्तकामुळे भेटलो. ते पुस्तक तुम्ही पूर्ण वाचले आहे का? " त्याने विचारले.
" नाही. थोडे अजून वाचायचे बाकी आहे." नभाने खरे काय ते सांगितले.
" मग आधी ते राहिलेले पुस्तक वाचा. तोपर्यंत मी जरा झोपतो." दोघेही एका रस्त्याच्या बाकावर बसून बोलत होते.
आपण नेमके काय वाचले नाही, ह्याचा विचार करत तिने आपल्या बॅगेमधून ते पुस्तक काढले आणि वाचण्यास सुरुवात केली. बाजूला पृथ्वी बसूनच झोपलेला आहे हे सुद्धा तिला माहीत नव्हते एवढी ती ते पुस्तक वाचण्यात गुंग होती.
" पृथ्वी ss " करुन जोरात ती ओरडली.
"क.. काय झालं मिस नभा ?" घाबरूनच तो ताडकन उठून तिला विचारू लागला.
"अरे, यात तर पुढे जाऊन पाऊस नाही पडला तर ऋतुचक्र फिरवून पाऊस पाडू शकतो, असे सांगितले आहे." ती खूश होत म्हणाली.
" हे तुम्ही शांतपणे पण सांगू शकला असता." ऑक्सिजन मास्क मध्ये जाणारा ऑक्सिजन त्याची पातळी वाढवत त्याने सांगितले.
"मी हे आधीच वाचले असते, तर इथे यायची मला गरजच लागली नसती. " ती म्हणाली.
"अगदी चूक." तो म्हणाला.
"ते कसे काय? " तिने विचारले.
क्रमशः
© विद्या कुंभार
कथेचा भाग वाचल्यावर लाईक आणि कमेंट नक्की करा.
अष्टपैलू लेखक स्पर्धा
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
