शीर्षक: तोडगा भाग -५
खरेदी करून झाल्यावर दुपारचं जेवण सुद्धा सांगितल्याप्रमाणे पूर्वाने स्वतःच्या पैशातून नभाला दिले होते.
मस्त सँडविच तसेच जेवण छान मिळाल्यामुळे नभाने पूर्वाला मदत सुद्धा केली होती.
खरेदी झाल्यावर पूर्वाशी थोडा वेळ बोलल्यानंतर आईला आवडणारे दहीवडे घेऊन ती आपल्या घरी परतली.
घरी परतल्यावर दहीवडे आणलेले पाहून आई खूप खुश झाली होती. आठवड्याभरात कोणते कपडे कॉलेजसाठी घालणार त्याचे सर्व नियोजन नभा करत होती.
ज्या कपड्यांना इस्त्रीची गरज होती, त्या कपड्यांना इस्त्री करून ते कपाटात हँगरला लावत कपाटात ठेवत होती.
ज्या कपड्यांना इस्त्रीची गरज होती, त्या कपड्यांना इस्त्री करून ते कपाटात हँगरला लावत कपाटात ठेवत होती.
दिवसभर तिला काही शोधण्याचे लक्षातच राहिले नव्हते, परंतु रात्री जेव्हा मोबाईल हातामध्ये घेतला; तेव्हा अंतराळा मधल्या सर्व गोष्टी तिने अनिमेशनद्वारे बघितल्या.
तसेच कालचे कालचक्र मंदिरातील तिने काढलेले स्थापत्यकालेच्या नमुन्याचे फोटो बघण्यात ती व्यस्त होती.
त्यातल्या एका फोटोवर तिची नजर खूप वेळ खिळली होती. त्यावर एक मंत्र दिलेला तिला दिसला होता. अचानक तिने त्याचा संबंध तिला पडलेला स्वप्नांशी लावला होता.
फोटोमध्ये आता मंत्र दिसत होता म्हणजे त्या शिलालेखावर तो मंत्र थोडासा सुरवातीचा दिसत होता. बाकीचा मंत्र हा ते व्यवस्थित जतन न केल्यामुळे पुसट झालेला होता. तिने ती इमेज नेटवर अपलोड करून सर्च केली आणि त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्यातील पूर्ण मंत्र दिसला.
जेव्हा तिने तो मंत्राचा शेवटचा भाग बघितला तेव्हा मात्र ती आश्चर्यचकित झाली होती. कारण स्वप्नामध्ये तिला एक मंत्र ती बोलत असताना दिसला होता आणि त्यातूनच दुसऱ्या जगामध्ये जाण्याचा दरवाजा उघडला होता आणि शेवटच्या मंत्रांचे शब्द जे होते, ते या मंत्राच्या शेवटच्या ओळीत सुद्धा तेच आहे, असे तिला वाटत होते.
काहीतरी वेगळा शोध आपण लावला आहे, ही भावना तिच्या मनाला सुखावत होती. तिने पुन्हा एकदा तिला हवे असणारे पुस्तक नेटवर उपलब्ध आहे का म्हणून बघितले, परंतु पुन्हा ते आऊट ऑफ स्टॉक असल्यामुळे तिचा चेहरा हिरमुसला होता.
दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण लायब्ररीमध्ये जाऊन ते पुस्तक ज्या व्यक्तीने घेऊन गेले, त्या व्यक्तीने पुन्हा आणून दिले आहे का याबद्दल चौकशी करण्याबाबत तिने ठरवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन तयारी करून कधी नव्हे ते आई सुद्धा तिला लवकर तयार झालेली बघून चकित झाली होती.
" काय गं ? आज ओरडा न खाता बरोबर वेळेत उठली आहेस ?" आईने विचारले.
" मी लवकर उठले तरी तुला त्रास आहे आणि मी उशिरा जरी उठले तरीसुद्धा तुला त्याचा त्रास आहे. मग मी काय करायचे ? तूच सांग. " आपल्या आईकडे निरागस चेहरा करून तिने विचारलं.
" लवकर उठत जा. म्हणजे तुला काही बोलणार नाही." आईने तिला नाश्ता दिला होता, तसेच तिचा डब्बा भरून बाजूला सुद्धा ठेवला होता.
नाश्ता केल्यावर नाश्ताचे कौतुक करून आईला आज घरी यायला उशीर होईल, असे तिने सांगितले.
आईला सुद्धा काहीतरी महत्त्वाचं काम असेल असे वाटून तिने त्याबद्दल फार काही विचारले नव्हते.
लवकर कॉलेजमध्ये गेल्यामुळे आपण आधी लायब्ररीमध्ये जावे आणि त्या पुस्तकाची चौकशी करावी असा विचार नभाच्या मनात आला.
तिथे गेल्यावर तिने तिथे असलेल्या लायब्ररियना त्या पुस्तकाविषयी विचारल्यावर अजून पर्यंत ते पुस्तक रिटर्न दिलेले नाही, असे सांगण्यात आले. मग नभाने ज्या व्यक्तीने ते पुस्तक घेतले आहे, त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का म्हणून विचारले, परंतु असा कोणाचाही नंबर आपण देऊ शकत नाही, असे सांगून या लायब्ररीच्या नियमानुसार त्यांनी तो कॉन्टॅक्ट नंबर देण्यास साफ नकार दिला होता.
नभाचे लेक्चरमध्ये सुद्धा लक्ष नव्हते, म्हणून तिने सेल्फ स्टडी करण्यासाठी तिच्या विद्यार्थ्यांना सांगितले होते.
तीनही लेक्चर तिने असेच सांगितल्यामुळे तिचा पूर्ण वेळ पुस्तक आणि मंदिरातील दरवाजा आणि तिला सापडलेला मंत्र या भोवतीच मन घुटमळत होते.
लंच टाईमला सुद्धा तिने जाऊन लायब्ररीमध्ये विचारपूस करून आली होती, परंतु तेव्हा सुद्धा तिच्या पदरी निराशा आली होती.
ती त्या पुस्तकाच्या मागे का लागली आहे, हे सुद्धा तिला स्वतःहूनच समजत नव्हते. कॉलेज सुटण्याच्या थोडावेळ आधी तिने पुन्हा लायब्ररीमध्ये जाऊन विचारले होते तेव्हा मात्र ते पुस्तक रिटर्न केले आहे, असे तिला समजलं.
"ज्यावेळेस पुस्तक रिटर्न करण्यात आले त्यावेळेसच मला का सांगितले नाही?" आपल्याला लगेच पुस्तक मिळाले असते आणि त्यामुळे आपण लगेच वाचायला सुद्धा सुरुवात केली असती, असे तिला वाटले म्हणून तिने तिथल्या लायब्ररियनला विचारले.
" सकाळपासून तुम्ही तीन ते चार वेळा ह्या पुस्तकासाठी इथे आला आहात आणि तुम्ही या पुस्तकासाठी संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या आसपास तुम्ही पुन्हा विचारायला याल ह्याची मला खात्री होती, म्हणूनच मी तुम्हाला ते सांगितलं नाही." असं त्यांनी हसूनच उत्तर दिले.
ते पुस्तक तिने आठवड्यासाठी मागून घेतले आणि तशी तिने त्या पुस्तकाची एन्ट्री करून ती बाजूलाच असणाऱ्या वाचनकक्षामध्ये गेली.
जवळजवळ रात्रीचे नऊ वाजायला आले होते आणि लायब्ररी बंद होणार होती. त्यामुळे दोन-तीन वेळा सांगून सुद्धा नभाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. ती जवळ जवळ तीन ते चार तास झाले ते पुस्तक वाचण्यात गुंग होती.
मध्येच काही गोष्टी कळल्या नाहीत, तर ती त्या नेटवर सुद्धा सर्च करून त्याबद्दल माहिती घेत होती.
" हे बघा मॅम, आम्ही तुम्हाला आता शेवटचं सांगत आहोत. आम्हाला लायब्ररी बंद करायची आहे. नाहीतर आम्हाला तुमची तक्रार करावी लागेल."
तक्रार हा शब्द ऐकल्यावर पटकन उठत जातानाची डिजिटल एन्ट्री परत लायब्ररी मधून बाहेर जाताना करुन नभा तिथून निघाली.
क्रमशः
© विद्या कुंभार
अष्टपैलू लेखक स्पर्धा
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
