Login

तोडगा भाग-३

समांतर रेषा जरी एक होत नसतील तरी दोन जग एकत्र येऊन तोडगा निघेल का सांगणारी अनोखी कथा!
शीर्षक: तोडगा भाग-३

" काय गं, आज मी तुला किती आवाज देत होते. तुझं लक्ष नव्हत."  कॉलेज सुटल्यावर पूर्वाने नभाला विचारले.

" माझी आज तब्येत ठीक नाही त्यामुळे तू माझ्याशी वाद घालू नकोस. माझे लक्ष नसेल."  असे म्हणून आपली स्कुटी घेऊन नभा घरी निघाली.

कधीही असा व्यवहार न करणाऱ्या आपल्या मैत्रिणीला बघून पूर्वा अवाक झाली होती.


घरी गेल्यावर तिने आधी ते पुस्तक ऑनलाइन अवेलेबल आहे का म्हणून तपासले, तेव्हा ते आऊट ऑफ स्टॉक होते.

' काय हे ? माझ्या वेळेसच आऊट ऑफ स्टॉक व्हायला हवे होते का?   एक तर मला एवढी उत्सुकता लागली आहे, ते पुस्तक वाचायचे आहे आणि त्यातच ते कुठेच  मला वाचायला सुद्धा मिळत नाहीये.'

तिने प्रत्येक पुस्तकांच्या साइट्स उघडून त्यावर ते उपलब्ध आहे का असे बघितले. जवळजवळ तास दोन तास आम्ही तिने ५० पेक्षा जास्त साइट्स पुन्हा पुन्हा तपासून बघितल्या होत्या आणि पदरात पडलेल्या निराशाने आपल्याला आता एक आठवडाभर थांबल्याशिवाय काही पर्याय नाही, असा तिने विचार केला.

तोपर्यंत आपण ऑनलाइनच त्याबद्दल अजून काही माहिती मिळते का म्हणून तिने अनेक प्रश्न गुगलला विचारले, परंतु त्यातूनही काही तिला समाधानकारक उत्तर मिळाली नव्हती त्यामुळे ती थोडी हिरमुसली होती.

" चल तयारी कर.आपल्याला मंदिरात जायचे आहे." तिची आई दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने म्हणाली.

तेव्हा कुठे नभाच्या लक्षात आले की, आज शनिवार आहे आणि कॉलेजला सुट्टी असल्याने आपण आईला शनिवारी जायचं असे म्हटले होते आणि आता आई आपल्याला घेतल्याशिवाय बाहेर जाणार नाही; हे सुद्धा तिला माहीत होते. त्यामुळे तिने जास्त आढेवेढे न घेता सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

तिथे गेल्यावर आईने पहिले नारळ हार वगैरे सर्व वस्तू तिथल्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी विकत घेतल्या.

" आई, हे सर्व घेण्यापेक्षा दानपेटीमध्ये पैसे टाकलेले काय वाईट आहे ? उलट ते पैसे मंदिरातील काही गोष्टींसाठी तरी वापरात येतील. ही फुले काही वेळाने तर कोमेजूनच जाणार आणि या नारळाची अर्धी वाटी ठेवणार अर्धी वाटी तू घरी घेऊन जाणार. त्यापेक्षा मी सांगते ते का ऐकत नाहीस ?"

" हे बघ तुला काही देवाधर्माचे समजत नाही. त्यामुळे तू काही मला सांगत बसू नको. मला जे करायचं ते मी करते. मी काय तुझ्याकडून पैसे यासाठी मागितले आहेत का,  त्यामुळे तू शांत बस." असे म्हणून आईने आपल्या त्या गोष्टी घेऊन मंदिरांमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या रांगेमध्ये उभी राहिली.

ते मंदिर खूप जुने होते, असे बाहेर लावलेला फलकावरून तिला समजले होते. तिथे कोरीव काम केलेले  दिसत होते आणि काही संस्कृतमध्ये लिहिलेले श्लोक सुद्धा दिला तिथे दिसले होते. सर्वांचे ती फोटो काढत होती.

मंदिरामध्ये  गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या मूर्तींचे फोटो न काढण्याबाबत सांगितले होते. तसेच मंदिरामध्ये आत जाताना प्रत्येक भाविकांचा मोबाईल हा सायलेंट किंवा स्विच ऑफ आहे का नाही, हे सुद्धा तपासले जात होते आणि तेव्हाच त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात येत होता.

हे काय कोणी या गर्दीमध्ये हरवले तर सापडणार कसे मोबाईल का स्वीच ऑफ करायचा मी तर बाबा सायलेंटच करणार सुरक्षारक्षकांशी वाद घालत नभाने आपला फोन शेवटी सायलेंटवर ठेवला.

शनिवारी सुट्टी असल्यामुळे त्या मंदिरामध्ये खूप करती होती गर्दी होती आणि त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.

" हे मंदिर पुरातन आहे आणि काही  शास्त्रज्ञसुद्धा या मंदिरामध्ये अभ्यास करण्यासाठी येत असतात. असे मी ऐकले आहे." एका मुलाचे वडील त्याच्या मुलाला सांगत होते.

" बाबा मी पण मोठे होऊन  शास्त्रज्ञच होणार आणि अनेक शोध लावणार."  तो छोटासा मुलगा आपल्या बाबांना म्हणाला.

त्या लहान मुलाचे स्वप्न ऐकून, ही लहान मुले किती निस्वार्थी आणि कोमल असतात याचे उदाहरण तिला त्या बोलण्यातून समजत होते.

काही लोक त्यांना मंदिराबद्दल ज्या गोष्टी माहिती आहेत ते सांगत होते. सगळ्याच गोष्टी खऱ्या असतील की नाही याची शाश्वती कोणी देऊ शकत नव्हते, त्यामुळे त्याला जी गोष्ट माहिती आहे ते एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करत होते.

एका ठिकाणी शिलालेख होता आणि त्यावरचा मजकूर थोडासा पुसट झालेला होता, त्याचा फोटो नभाने काढला होता 

" हा बघा हा तो दरवाजा आहे. असे म्हणतात की काही पूजा अर्चना करूनच उघडला जातो, परंतु तो मंत्र अजून पर्यंत कोणाला मिळालेला नाही आणि हा जर मंत्र कोणाला सापडला तर ह्या दुनियेतून दुसऱ्या दुनियेत जाण्यासाठी हा दरवाजा उघडतो."  कोणीतरी एक गाईड त्या दरवाजाबद्दल एका ग्रुपला माहिती देत होता.

' म्हणजे असं कुठे असतं का ?  कोणाला जर पहिलेच हे असं काही मिळालं असतं तर हा दरवाजा राहिला असता का ? म्हणजे आपल्या देशाची संस्कृती खरी काय आहे ते सांगण्यापेक्षा काय चमत्कार आहेत हे सांगण्यामध्येच लोकांना जास्त रस असतो.  त्यात पण ते खरे आहे की नाही याचा पाठपुरावा पण कोणी करत नाही.'  मनाशीच त्या गाईडने खोटे बोलले असावे असे समजून नभा म्हणाली.

" नभा जरा पूजेचे सामान पकडतेस का ? माझ्या हातात घेऊन माझा हात दुखायला लागलाय ना."  तिची आई म्हणाली.

" त्यापेक्षा शांतपणे पैसे तू दानपेटीमध्ये टाकले असते तर काय झाले असते ? "  पुन्हा नभाने आपलं दानपेटीचे तुणतुणे सुरू केले होते.

" हे बघ, तुला हातात घ्यायचं नसेल तर तसं सांग. उगाच सारखे मला तेच तेच बोलून मला चिडायला लावू नकोस.
"  तिची आई तिच्या कानाला हात लावून वाकून तिच्या कानामध्ये बोलली.

" आई,  आता मी मोठी झाली आहे. प्रोफेसर आहे . तू कायम मला अशी बोलत असते. तेही आता आपण बाहेर लोकांमध्ये आहोत हे का तुला समजत नाहीये ? "

" मग जरा मोठ्या मुलीसारखं वाग." असे म्हणून आईने हातातले पूजेचे साहित्य असणारी टोपली नभाच्या हातात ठेवून दिली.

क्रमशः

© विद्या कुंभार

अष्टपैलू लेखक स्पर्धा
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →