Login

तोडगा भाग-१०(अंतिम)

समांतर रेषा जरी एक होत नसतील तरी दोन जग एकत्र येऊन समस्येवर तोडगा निघेल का सांगणारी अनोखी कथा!

शीर्षक: तोडगा भाग-१० (अंतिम)

नभा जशी तिथून गेलेली होती तसेच सर्व तिला दिसत होतं. मग हे सर्व खरे आहे का नाही, अशी तिला शंका होती;  परंतु आपण आपले सर्व प्रयत्न केले यांचे तिला समाधान वाटले.

अचानक आकाशात ढगांची भरती झाली आणि धो धो करत कित्येक वर्षांनी असा पाऊस पडायला सुरुवात झाली होती.  आता पाण्याचे संवर्धन आणि त्याची जनजागृती करणे गरजेचे होते, ते काम तिने हातामध्ये घेण्याचे त्यावेळेस ठरवले होते.

नभाला पृथ्वीच्या दुनियेतील काही माहिती नव्हते, परंतु जसे आपल्याला त्यावरचा तोडगा मिळाला तसेच त्याला सुद्धा मिळाला असावा असा तिने विचार केला आणि जर मिळाला नसेल तर लवकरात लवकर मिळावा म्हणून मनोमन तिने प्रार्थना केली होती.

इकडे पृथ्वीच्या दुनियेमध्ये सुद्धा ऑक्सिजनची पातळी हळूहळू वाढायला लागली होती. त्यामुळे लवकरच आता लोकांना ऑक्सिजन सिलेंडर वापरण्याची गरज नाही असे पृथ्वीला दिसू लागले होते आणि त्यासाठी त्याने देवाचे आणि नभाचे आभार मानले होते.

वृक्षसंवर्धनासाठी सामाजिक चळवळ करण्याचा निर्णय घेतला होता, म्हणूनच वृक्ष लागवड करण्यावर जास्त जोर दिला होता.

नभाने तिच्या दुनियामध्ये जलप्रदूषण होणार नाही यासाठी कोणते पर्याय वापरण्यात यावे, याबद्दल सरकारला पत्र लिहिले होते  आपल्या पातळीवर कोणत्या गोष्टी सहज करू शकतो यासाठी तिने वेगवेगळ्या गोष्टी जसे की तिने धार्मिक गोष्टी ज्या नदी, खाडी आणि समुद्र वगैरे ठिकाणी टाकाव्या लागतात तिथे न टाकता त्याचे सुद्धा खत कसे बनवू शकतो, हे प्रत्येकाला पटवून देण्यासाठी तिने घरोघरी जाऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच आतापर्यंत पाण्यावर लोकांनी किती खर्च केला याचा सुद्धा अंदाजे पैशाचा आकडा सांगून आपल्याला हे कसे रोखता येईल, तसेच आता आपल्याला पुन्हा एकदा पाण्याचा साठा उपलब्ध झाल्यामुळे निसर्गचक्र कसे  नियमित व सुरळीत राहील आणि त्याला आपल्याकडून कसा धक्का लागता कामा नये यासाठी तिने कळकळीची विनंती करून पुन्हा असे होऊ नये  म्हणून स्वतः जातीने लक्ष घातले होते.

आधी तर लोक आता पाण्याचा साठा प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून त्याचा अपव्यय करायचा प्रयत्न करत होते, ते पाहिल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल तसेच यासाठी त्यांना आता जेलमध्ये सुद्धा जावे लागेल; यासारखे कायदे करण्याची मागणी तिने सरकारकडे केली होती.

सरकारला सुद्धा लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये आधी अडचणी येत असल्यामुळे जास्त पैसे त्यामध्ये खर्च होत असल्यामुळे त्यांना सुद्धा यात त्यांचे भले दिसत होते, म्हणून त्यांनी दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्याचे आदेश दिले.

याबाबत सगळीकडे पाण्याचे ठराविक वेळेत आणि ठराविक प्रमाणातच पाणी सोडले जाईल असे सांगण्यात आले आणि कृतीतही आणले गेले. यामुळे लोकांना त्याची किंमत सुद्धा राहील, पुन्हा आपल्यावर पाण्याची आणीबाणी याचे संकट येऊ नये याची लोकांना सुद्धा भीती होती म्हणून त्यांनी सुद्धा त्याचे पालन करण्याचे ठरवले होते. ठिकठिकाणी तर जाहीर सभा घेऊन लोकांनी शपथ घेऊन पाण्याचा गैरवापर करणार नाही असे म्हटले.

लहानपणापासूनच पाण्याचे महत्त्व त्यांना समजावे आणि पुढे जाऊन त्यांना चांगल्या सवयीला लागाव्यात म्हणून सरकारने काही उपाययोजना केल्या होत्या. तसेच मुलांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना काही प्रात्यक्षिके आणि वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून त्यांना पाण्याचे महत्त्व समजावे हा उद्देश हळूहळू सफल होत होता.

तिकडे पृथ्वीच्या दुनियेमध्ये सुद्धा लोकांना पैसे देऊन ऑक्सिजन सिलेंडर घ्यावे लागत होतं, हा भूतकाळ माहीत असल्यामुळे त्यांनी वर्तमान आणि भविष्यकाळात कसावर याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच त्यांनी वृक्ष लागवडी सोबतच मोठमोठे कारखाने किंवा फॅक्टरी असते त्या सर्वांना शहर आणि गावा बाहेर स्थलांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केल्या होत्या.  त्याचा परिणाम असा झाला की नाईलाजाने सर्व कारखाने आणि इंडस्ट्रियल प्लांट्स ज्याच्यामुळे प्रदूषण होत होते ते गावाच्या आणि शहराच्या बाहेर स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर शुद्ध हवेचा मोकळा श्वास प्रत्येकजण तिथे घेत होते.

वेगवेगळी झाडे आणि औषधी वनस्पती ज्या नामशेष झालेल्या होत्या, त्या अचानक सापडल्यामुळे आता पुन्हा तिकडे हिरवळ दाटून आली होती. हा सर्व लोकांना चमत्कारच वाटत होता, त्यामुळे सगळेजण देवाचे आभार मानत होते.


नभा आणि पृथ्वीने संपुष्टात आलेल्या गोष्टी पुन्हा त्यांना  उपलब्ध केल्यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा होत होता, तसेच त्यामुळे होणारे आजार या सर्वांना आळा बसला होता.

तोडगा काढण्यासाठी नभाला तिच्या दुनियेतून समांतर  असणाऱ्या पृथ्वीच्या दुनियेत जावे लागले होते आणि पुन्हा त्यांच्या दुनियेत समस्या निराकरण करण्यासाठी अंतराळाचा त्याबद्दल मनोभावे ती परत मिळावी म्हणून इच्छा प्रगट केल्यामुळे तसेच दोघांच्याही मनाचे भाव हे खरे तसेच दोघांचेही शुद्घ भावना, ही लोकहितासाठी असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे लाईक आणि कॉमेट करुन नक्की सांगा.

अष्टपैलू लेखक स्पर्धा
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →